जुन्या गाण्यांनी आठवणी उजळून येतात. जुनी गाणी ऐकल्याने बहरतात आठवणी आणि त्यातून प्राप्त होत रहाते. चिरतारुण्य ! आणि म्हणून आयुष्याच्या तिन्हीसांजवेळी प्रत्येक ज्येष्ठाने गात रहावे, गुणगुणत रहावे ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे गायक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. सांजभेट संस्थेतर्फे ‘ गाते रहो ‘ ही संगीत संध्या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले.
अनघा सावनूर आगाशे (स्वरचित महात्मा फुले यांच्यावरील गीत), शलाका गाडगीळ(हृदयी प्रित जागते )अशोक चव्हाण (ओ मेरे सनम) मनीषा सराफ (त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे गं ) , अशोक चव्हाण (वो दिल कहाॅसे लाऊ ), माणिक कुलकर्णी (क्या फूल चढाऊ ),मधुकर्णिका (फुललेरे कमळ फुललेरे ), पद्मा वेदपाठक (आकाश पांघरुन जग शांत झोपले रे ) बाबा ठाकूर (ऐंशी वर्षाची असून म्हातारी) आदिंनी स्वरसंध्या गाजवली.
समारोपात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी जुन्या गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आंतरराष्ट्रीय प्राप्त झालेली काही किशोरकुमार , हेमंतकुमार यांची गाणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप शुक्ल यांनी आभार मानले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते सर्व गायक गायिकांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
Leave a Reply