दि. ११/११/२०२४ रोजी वसुधा वैभव नाईक यांनी फलटण येथील मुधोजी बालक व प्राथमिक मंदिरास भेट दिली.स्वतः त्या शाळेमध्ये १९७० ते १९७५ या पाच वर्षात त्या शिकत होत्या.जवळजवळ ५० वर्षाने त्या शाळेला भेट देत होत्या. त्यांच्या स्वतःच्या नाती सोनाक्षी,समीक्षा आणि त्रिशिका यांना त्यांची शाळा दाखवण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. तिथे समजलं की शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. तेथील बाल वर्गातील मुलांना खाऊ वाटण्यात आला.
बाल वर्गाला तिथे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पहिली ते चौथी मध्ये १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर एक आगळा वेगळा आनंद मिळाला. नयनातून अश्रू वाहू लागले. हे आनंदी अश्रू शाळेने कर्म दिले त्या शाळेसाठी होते. शिक्षकांसाठी होते. बाजारे गुरुजींसाठी होते.बालक मंदिराच्या मुख्या.रजपूत मॅडम यांनी पूर्ण शाळेची माहिती दिली. जुनी शाळा,नवी बिल्डिंग यातला फरक सांगितला. वसुधा व त्यांच्या नातींचे स्वागत खूप छान केले. प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना खाऊ देण्यासाठी त्यांनी मदत केली. शाळेचा सर्व स्टाफ हेल्पफुल आहे.वीर मॅडम यांचे सहकार्य छान लाभले. सर्व स्टाफ मदतीसाठी पुढे आहे.
मधोजी प्राथ. विभागाचे मुख्या.शिंदे सर यांच्याशी फोनवर बोलणे झाले. सर देखील हेल्पिंग नेचरचे छान वाटले. सुनील पाडवी यांनी सहकार्य केले. बाकी शिक्षक स्टाफ सगळा उत्तम आहे. वसुधा यांनी आपला वर्ग कोणता होता हे आपल्या नातींना दाखवले व त्या वर्गातल्या त्याच बेंचवर त्यांनी बसून छान फोटोंचा आनंद घेतला.
दिवाळी सुट्टीनंतर शाळेचा आज पहिला दिवस होता. तरी देखील बरेच विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. शाळेचा पहिला दिवस, अमृत महोत्सव आणि त्यात लहान मुलं बघितली की वसुधाला आनंद होतो. वसुधा यांनी नातींच्या हातून मुलांना खाऊ वाटला.मुले खूष, शिक्षक खूष, वसुधा खूष….
रजपूत मॅडमने वसुधा यांचा बायोडाटा घेतला. या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून निश्चितच आपल्याला या शाळेत पुन्हा मानाने बोलवले जाईल. असे त्यांनी आश्वासन दिले. शाळेत ठेवले पहिले पाऊल जेव्हा नयनांच्या कडा पाणावल्या तेव्हा वसुधाचे कर्मभूमीला लागले पाय,
आनंदाचा झरा ती फलटणातून घेऊन जाय
मनी आस तिला बालांना भेटण्याची
स्वतःच्याच शाळेत मन रमवण्याची
नातींना घेऊन आली शाळा दाखवायला
शाळेचे वातावरण पाहून मन लागले बोलायला
जा तुझ्या वर्गात जाऊन बस बाळा
हीच तर तुझी होती प्राथमिक शाळा
जीवन कसे जगायचे हा धडा शिकवला
आता वसुधाने समाजात पाय घट्ट रोवला
शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे आज
वसुधाच्या डोक्यावर ज्ञानाचा चढतोय सुरेख साज
हा दिवस खूप खास वसुधासाठी
कार्य उत्तम चालू आहे तिथे समाजासाठी