भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम
रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ऐतिहासिक नगरीत मौर्य क्रांती महासंघ , महाराष्ट्र राज्य व्दारा धनगर जागृती परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले यांनी प्रसारमाध्यमांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.” एकट्याने नाही तर एकीने लढू या”,” माझे शिक्षण माझ्या समाजा साठी” या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात मौर्य क्रांती महासंघ कार्यरत आहे, धनगर समाजाच्या विविध विषयांवर समाजातील तज्ज्ञ, विचारवंत या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.या पूर्वी मौर्य क्रांती महासंघाची दोन अधिवेशनाचे आयोजन जेजुरी या ठिकाणी करण्यात आले होते.
आता तिसरे अधिवेशन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे होत आहे, सुरुवातीला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे, धनगरी ओव्या, गजी नृत्य, लेझीम, धनगर समाजाच्या पारंपरिक कला, देवदेवतांच्या नावे घोषणा, मान्यवरांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार, आदी भरगच्च कार्यक्रम या तिसऱ्या अधिवेशनात होणार असून पुढील कार्यासाठी काही ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.आरक्षण अमंलबजावणी चा प्रश्न, शेळ्या मेंढ्या च्या चराऊ कुरणाचा प्रश्न, शिष्यवृत्ती, शासकीय आर्थिक योजनांचा लाभ,व धनगर समाजाच्या इतर समस्याचा या अधिवेशनात विचार विनिमय करण्यात येणार आहे.लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षात होळकर शाहीच्या पदकमलानी पावन अशा दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या चांदवड नगरीत होत असलेल्या तिसऱ्या अधिवेशनात सत्यशोधक विचाराचे अनुयायी मारोतरावजी पिसाळ यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रबोधनकार पुरस्कार प्रत्येक अधिवेशनात वेगवेगळ्या मान्यवरांना दिला जातो.
या वर्षी या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील नामवंत वक्ते प्रबोधन कार,प्रा.आर.एस.यादव सर यांना देण्यात येणार असल्याचे मौर्य क्रांती महासंघाने जाहीर केले आहे.या धनगर समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.
Leave a Reply