Engage Your Visitors!

कवी, साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” जाहीर

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा सलग तीन वेळा काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था शाखा शिरूर अनंतपाळ लातूर येथे पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी भारत सरकार यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांनी साहित्यिक हैट्रीक मिळवून साहित्यिक मेजवानीचा स्वाद घेतला, राष्ट्रीय शिक्षक दिना निमित्त आयोजित श्री अनंतपाळ लातूर राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ, लातूर येथे येथे दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” २०२४ यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या अगोदर अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी भारत सरकार यांना संस्थेने पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार २०२२ रोजी दिला होता, दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट वकील पुरस्कार २०२३ चा पुरस्कार दिला होता, त्यानंतर यंदाचा त्यांची साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेता दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी, भारत सरकार यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” २०२४ यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे श्री अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलनाचे आयोजक श्री. गोविंद श्रीमंगल यांनी जाहीर केले.

अॅड.उमाकांत मधुकर आदमाने, नोटरी, भारत सरकार सध्या शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालयात पुणे येथे वकिली व्यवसाया बरोबरच नोटरीचे काम करतात त्यांची आणखी एक नवी ओळख म्हणजे सुंदर कवी, लेखक, साहित्यीक आणि उत्तम निवेदक आहेत. त्यांनी आगामी काळात खुप सुंदर विषयावर कविता सादर करून कवी रसिकांची मने जिंकली, अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी, भारत सरकार वकिली व्यवसाया बरोबरच नोटरी व्यवसाय देखील प्रामाणिक पणे करतात. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे, आता देखील श्री अनंतपाळ, लातूर येथील होणा-या तिसऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी कवी संमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा आंतरराष्ट्रीय शताब्दी सन्मान

काव्य ,गायन, व्यंगचित्र, संपादन, अभिनय , ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण, शीळवादन आदि विविध क्षेत्रात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या दैदीप्यमान कारकिर्दीबद्दल सनफ्लाॅवर USA संस्थेतर्फे नुकतेच आंतरराष्ट्रीय शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार सनफ्लाॅवर,USA च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक सौ.वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना प्रदान करण्यात आला.

प्रास्ताविक आणि संयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैभव नाईक यांनी केले.डाॅ.मधुसूदन घाणेकर सातत्याने देशविदेशात गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ आपल्यामधील कलागुणांना विश्वाभिमुख करीत आहेत आणि त्यांच्या याच योगदानासाठी डाॅ.घाणेकर यांना सन्मानित केले असल्याचे सौ.वसुधा नाईक यांनी सांगितले.याप्रसंगी श्रीमती विद्या नाईक, हेमंत फुले, वैशाली फुले आदि मान्यवर उपस्थित होते. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच इंटरनॅशनल सुपरस्टार ॲवाॅर्डही प्राप्त झाल्याबद्दल सौ.वसुधा नाईक यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भारतीय अध्यात्माविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार,कालांतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

अकोला(दि.४): बीड जिल्ह्यातील ‘श्रीप्रभूप्रसाद मासिक’ आणि ‘कालांतर’ दिनदर्शिका समूहाच्या वतीने नुकताच ‘भाऊबीज’ दीपोत्सवाच्या पावन पर्वावर श्री जगद्गुरु पलसिध्द महास्वामीजी धर्मपीठ,साखरखेर्डा येथे शिवाचार्यरत्न,वेदांताचार्य,सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी,ष.ब्र.१०८ श्री सद्गुरु सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते,भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली सोसे तसेच श्रीप्रभूप्रसाद समूहाचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कालांतर-२०२५’ या वीरशैव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि ‘श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४’ अतिशय उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

यावेळी प्रारंभी दीपप्रज्वलनाने व स्वागत मंत्रोपचाराने कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘कालांतर’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि श्रीप्रभूप्रसाद समूह,बीडच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणार्‍या श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक तपोनिधी पुरस्कार-२०२४ हा सन्मान वेदांताचार्य सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांना, श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक पांथस्त पुरस्कार-२०२४ हा सन्मान श्री ष.ब्र.१०८ श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांना,तर श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४ हा सन्मान भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली आतिश सोसे यांना शाल,श्रीफळ,मानपत्र, स्मृतिचिन्ह व ‘कालांतर’दिनदर्शिका व ग्रंथ भेट देऊन आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी पाहुण्यांची यथोचित भाषणे झाली.तेव्हा सद्गुरु श्री सिध्दचैतन्य स्वामीजी यांनी साखरखेर्डा धर्मपीठाला असलेला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास,तथा या प्राचीन,पुरातण व पवित्र वास्तूची माहिती विषद केली.नामदार प्रतापराव जाधव यांनी या पावन भूमीचे व गुरुमाऊलीचे दीपावलीच्या प्रसंगी होणारे दर्शन सद्भाग्य असल्याचे सांगून या धर्मपीठाकरिता मी आजवर व यापुढेही सतत प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘कालांतर’ही दहा कर्तबगार बहिणींना अर्पण केलेली दिनदर्शिका निश्चितच स्तुत्य उपक्रम असून प्रख्यात लेखिका व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या भगिनी प्रा.दीपालीताई सोसे यांच्यावरील परिचयात्मक लेख वाचून त्यांच्या कार्याने प्रभावित झालो असून श्रीप्रभूप्रसादचे संस्थापक परमेश्वर लांडगे यांनी दहा ताईंना प्रातिनिधिक स्वरूपात दिलेली ही भाऊबीजेची भेट संस्मरणीय व कौतुकास्पद असल्याची भावना याप्रसंगी नामदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.यावेळी ज्येष्ठ लेखक सुरेश सोसे,प्रा.अशोक सारडा,संतोष गाडेकर,कमलकिशोर लढ्ढा,विलास लांडगे,बालकलाकार अद्विक सोसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना कलावंत पुरस्कार जाहीर

प्रमोद पंडित अभिनेते दिग्दर्शक अपंग सेवा दल जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर पाथरे बु तालुका राहाता जिल्हा अहमदनगर येथील अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना कलावंत विचार मंच आणि कमल फाउंडेशन यांच्या संयुक्त् विद्या माने साहित्यिक आणि कलावंतांना दिला जाणारा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे याविषयीचे निवड पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे प्रमोद पंडित यांना ,कलावंत सेवेबद्दल हा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार ऑक्टोबर 2024 ला नाशिक दिला जाणार आहे त्यांचे अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे