भारतासह 20 देशात स्वखर्चाने मानवधर्म:सर्वश्रेष्ठ धर्म या प्रसारासाठी विश्वजोडो अभियानासह विनामूल्य चालता बोलता हिंडता फिरता असा ‘ सबकुछ.मधुसूदन ‘ हा विश्वविक्रम एकपात्री कार्यक्रम करुन हजारो रसिकांना दिलासा दिला. डाॅ.घाणेकर यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल डाॅ.मधुसूदन घाणेकर गौरव समिती तर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना जाहिररित्या , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ.न.म.जोशी यांच्या शुभहस्ते ‘ विश्वगुरु ‘ ही उपाधि प्रदान करण्यात आली.
सदर उपाधि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी वैश्विक शक्तिला प्रदान केली. ” दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय, भारतीय अध्यात्म, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय मजदूर संघ यांचे संस्कार घडल्यानेच सातत्याने विश्वजोडो अभियानाच्या माध्यमातून भेटेल त्या रसिकाला निरपेक्ष आनंद देण्याचे भाग्य मला मिळाले ” असे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सन्मानाला उत्तर देताना सांगितले. ” आनंदाचे वितरण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डाॅ.मधुसूदन घाणेकर होय. आयुष्यभर जो दुस-याला निरपेक्ष आनंद सातत्याने देत रहातो तोच खरा विश्वगुरु असतो,डाॅ.घाणेकर.
हे ‘ विश्वगुरु ‘ चेच कार्य करीत आहेत, असे गौरवोदगार डाॅ.न.म.जोशी यांनी उपाधि प्रदान करताना काढले. या प्रसंगी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त मिलिंद लेले , ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाईक, आंतराष्ट्रीय कीर्तिच्या शीळवादक अनघा सावनूर आगाशे, भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष भारती महाडिक , मधुरंग संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.मेघना मधुसूदन घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
याच सोहळ्यात डाॅ.घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाचा 600 वा अंक, डाॅ.घाणेकर यांचा मधुउवाच हा विश्वविक्रमी 50वा काव्यसंग्रह आणि हाहाहाहीहीहीहूहूहू व्यंगचित्र संग्रह याचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. वर्ल्ड क्वीन बीजच्या,अध्यक्ष सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले.डाॅ.घाणेकर यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन आणि प्रास्ताविक वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक यांनी केले.
स्वागत गीत मनीषा सराफ यांनी सादर केले. मिलिंद लेले, आघाडीच्या कवयित्री आणि निवेदिका ऋचा थत्ते, सौ.मेघना घाणेकर अनघा सावनूर आगाशे, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक -अध्यक्ष प्रिया दामले आदिंचीही भाषणे झाली. काव्यशिल्पच्या माजी अध्यक्ष अपर्णा आंबेडकर, महिला सन्मानच्या सचिव दीपाराणी गोसावी, युवा विश्वच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई , मंदा नाईक, मधुकर्णिका सारिका सासवडे आदिंनी डाॅ.घाणेकरांवर आधारीत स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ‘ सबकुछ मधुसूदन ‘ ह्या एकपात्री कार्यक्रमाचा 81, 000 वा प्रयोग सादर करुन उपस्थितांची मने जिंकली !
आभार प्रदर्शन वसुधा नाईक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष भागवत, माधुरी भागवत, योगेश हरणे , गौरव पुंडे, अजया मुळीक, मुकुंद भागवत आदिंनी विशेष योगदान दिले.
Leave a Reply