Engage Your Visitors!

नाशिकच्या गोदा घाटावर छटपूजा उत्साहात साजरी

उत्तर भारतीयांचा सर्वात मोठा धार्मिक महोत्सव म्हणजे छट्पर्व. हा महोत्सव चार दिवस असतो. 5 नोव्हेंबर पासून सुरू झालेला हा छटपूजेचा उत्सव आठ नोव्हेंबर पर्यंत असतो. कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या षष्ठीला छटपूजा करतात. या दिवशी संपूर्ण गोदागाट उत्तर भारतीयांच्या गर्दीने गजबजून गेला होता. छट मातेची मनोभावे पूजा अर्चा करून व्रतस्थ भाविकांनी पाण्यात उभे राहून प्रार्थना केली. आणि शुक्रवार दिनांक आठ सकाळी उगवत्या सूर्याला अर्धे देऊन व्रताची  सांगता केली.

कार्तिक महिन्याच्या षष्ठीला सूर्यास्त होण्याच्या अगोदर छटपूजेसाठी उसाचे तोरण बांधतात. त्याच्याखाली सफरचंद, केळी,पेरू, मोसंबी इत्यादी फळे तसेच नारळमध ई. देवीची प्रतिमा असलेल्या टोपलीत ठेवतात. दीप प्रज्वलित करून पूजा करतात आणि सूर्य असताना जाताना सूर्याला अर्धे देऊन सूर्याची आरती करतात.

कांदिवली पश्चिम येथे उत्तर भारतीय महिलांद्वारा ” छटपूजा” मोठ्या उत्साहात पार पडली

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

कांदिवली पश्चिम येथील बजरंग सोसायटी जवळ, महावीर शाळे शेजारी असलेल्या मैदानात श्री.बजरंग एस,आर,ए, सोसायटी, श्री.साईकृपा एस.आर.ए.सोसायटी, आणि जनता कल्याण कारी एस.आर.ए.सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागातील उत्तर भारतीय महिला भगिनी करिता छटपूजा चे आयोजन करण्यात आले होते.गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सूर्यास्ता वेळी पाण्यात उभे राहून महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात छटपूजा केली.

या ठिकाणी पाण्याचा मोठा कृत्रिम तलाव बनविण्यात आला होता.मुलांच्या कल्याणासाठी, प्रगती साठी,व ज्यांना संतान नाही ते यावेळी नवस बोलतात,व काही महिला भगिनीं नवस पूर्ण करण्यासाठी छटपूजा करतात.आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या नंतर जल अर्ज करुन छटपूजा पूर्ण करतात,व उपवास सोडतात.कृत्रिम तलावाच्या भोवती जागोजागी ऊस उभा करून पणत्या लावून महिला भगिनीं पाण्यात उभ्या राहून छटपूजा करत होत्या.धार्मिक गाणी गायली जात होती,या प्रसंगी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कांदिवली पोलिस ठाणे येथून पोलिस अधिकारी व पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या विभागातील अनेक मान्यवर पुरुष व महिला उपस्थित होते.बजरंग सोसायटी चे चेअरमन रविंद्र राऊत यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे मुख्य प्रवर्तक विजय पाल जी, यांचा सत्कार करुन स्वागत केले.तसेच ललन राव यांनी श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव भारत कवितके यांचा सत्कार करुन स्वागत केले.या प्रसंगी रविंद्र राऊळ,ललन राव,टिंकू खान, विजय पाल, भारत कवितके, कुमार सुगावे, निजामुद्दीन, राजेश यादव, प्रविण पाल, प्रभात पाल,सह तिन्ही सोसायटी चे पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.छटपूजा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील पुरुष व विशेषतः महिला भगिनीं परिश्रम घेतले.

 

श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार,कालांतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

अकोला(दि.४): बीड जिल्ह्यातील ‘श्रीप्रभूप्रसाद मासिक’ आणि ‘कालांतर’ दिनदर्शिका समूहाच्या वतीने नुकताच ‘भाऊबीज’ दीपोत्सवाच्या पावन पर्वावर श्री जगद्गुरु पलसिध्द महास्वामीजी धर्मपीठ,साखरखेर्डा येथे शिवाचार्यरत्न,वेदांताचार्य,सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी,ष.ब्र.१०८ श्री सद्गुरु सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते,भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली सोसे तसेच श्रीप्रभूप्रसाद समूहाचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कालांतर-२०२५’ या वीरशैव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि ‘श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४’ अतिशय उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

यावेळी प्रारंभी दीपप्रज्वलनाने व स्वागत मंत्रोपचाराने कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘कालांतर’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि श्रीप्रभूप्रसाद समूह,बीडच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणार्‍या श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक तपोनिधी पुरस्कार-२०२४ हा सन्मान वेदांताचार्य सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांना, श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक पांथस्त पुरस्कार-२०२४ हा सन्मान श्री ष.ब्र.१०८ श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांना,तर श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४ हा सन्मान भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली आतिश सोसे यांना शाल,श्रीफळ,मानपत्र, स्मृतिचिन्ह व ‘कालांतर’दिनदर्शिका व ग्रंथ भेट देऊन आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी पाहुण्यांची यथोचित भाषणे झाली.तेव्हा सद्गुरु श्री सिध्दचैतन्य स्वामीजी यांनी साखरखेर्डा धर्मपीठाला असलेला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास,तथा या प्राचीन,पुरातण व पवित्र वास्तूची माहिती विषद केली.नामदार प्रतापराव जाधव यांनी या पावन भूमीचे व गुरुमाऊलीचे दीपावलीच्या प्रसंगी होणारे दर्शन सद्भाग्य असल्याचे सांगून या धर्मपीठाकरिता मी आजवर व यापुढेही सतत प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘कालांतर’ही दहा कर्तबगार बहिणींना अर्पण केलेली दिनदर्शिका निश्चितच स्तुत्य उपक्रम असून प्रख्यात लेखिका व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या भगिनी प्रा.दीपालीताई सोसे यांच्यावरील परिचयात्मक लेख वाचून त्यांच्या कार्याने प्रभावित झालो असून श्रीप्रभूप्रसादचे संस्थापक परमेश्वर लांडगे यांनी दहा ताईंना प्रातिनिधिक स्वरूपात दिलेली ही भाऊबीजेची भेट संस्मरणीय व कौतुकास्पद असल्याची भावना याप्रसंगी नामदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.यावेळी ज्येष्ठ लेखक सुरेश सोसे,प्रा.अशोक सारडा,संतोष गाडेकर,कमलकिशोर लढ्ढा,विलास लांडगे,बालकलाकार अद्विक सोसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आकाश रमेश एडपेल्लीवार यांच्या घरात गणेशोत्सवाची गाजलेली भव्यता: दिव्य सजावट आणि भक्तिपूर्वक विसर्जन

आकाश रमेश एडपेल्लीवार यांच्या घरात या वर्षी गणेशोत्सवाला विशेष महत्त्व देण्यात आले. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी अत्यंत मनोभावे करण्यात आली होती. घराच्या सजावटीत पारंपारिक रंगत, आकर्षक लाइटिंग आणि सुंदर रांगोळीने गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी खास वातावरण तयार करण्यात आले.

सर्वप्रथम, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा मूळ आकर्षक प्रतिमा घरात मोठ्या भक्तिभावाने स्थापित करण्यात आली. सजावटीसाठी विविध रंगांचे फुलांचे हार, रंगीत दिवे आणि सोनेरी वस्त्रांचा उपयोग करण्यात आला. घराच्या प्रवेशद्वारावर पारंपारिक रांगोळीने गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात आले, तर घरातील प्रत्येक कोपऱ्यात देवी-देवतांच्या चित्रांसह रंगीत झालर लावण्यात आल्या.

गणपती बाप्पांच्या स्थापनानंतरच्या दीन, भक्तिरसात झुळझुळ करणाऱ्या भजनांची आणि आरतीची आयोजन करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि भक्तांनी आनंदात घेतलेल्या मंगलाचरणाने वातावरण गाजले.

आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनाची

अमरावतीच्या सौरभ अभ्यंकरने ‘मोरया’ गाण्याने ‘भूमी’ प्रोजेक्टमध्ये दिला धमाका

अमरावती शहरातील बिच्छू टेकडी या झोपडपट्टीतील सौरभ अभ्यंकर हा आपल्या अमरावतीचे नाव आपल्या रॅप संगीताच्या माध्यमातून पूर्ण भारतभर उंचवत असताना त्यांनी आणखी एक दिग्गज संगीतकार जोडी सोबत म्हणजे सलीम सुलेमान यांच्यासोबत “भूमी” या संगीत प्रोजेक्टमध्ये काम केले आहे या प्रोजेक्टमध्ये भारतातील नव्हे तर जगभरातील दिग्गज व सुप्रसिद्ध गायक संगीतकार आहेत जसे की सोनू निगम, श्रेया घोषाल सुनिधी चौहान, विशाल दादलानी इत्यादी या सोबतच लॉरेन अलर्ड, टेलर जॉन्स असे जगप्रसिद्ध असलेले गायक या प्रोजेक्टमध्ये आहे.

या नवीन गाण्यासाठी म्हणजेच “भूमी” या प्रोजेक्ट मधील “मोरया” या गाण्यांमध्ये “कोंबडी पळाली” व “ऐका दाजीबा” फेम वैशाली सामंत व हिंदी सिनेसृष्टी मध्ये हीप-हॉप संगीतने धूम करणारे करण कंचन व आपला अमरावतीचा सौरभ अभ्यंकर यांनी मिळून गणपतीच्या गाण्याने सुरुवात करत “भूमी” या प्रोजेक्टच्या शुभारंभ केला. सोबतच या गाण्याच्या व्हिडिओमध्ये लाईट डिझायनिंग चे काम अमरावती मधीलच अजय इंगळे व रोहित वगारे यांनी केले आहे हे गाणे सलीम सुलेमान यांच्या “you tube” चैनल वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे गाणे सोशल मिडीयावर ट्रेंडीगवर सुरु आहे.

या गाण्याचे प्रमोशनसाठी कलर्स मराठी या चॅनेलवर सुरू असलेल्या बिग-बॉस मराठी या शोमध्ये सिने अभिनेत्री रितेश देशमुख सूत्रसंचालन करीत असताना त्यांनी सलीम मर्चेंट, करण कंचन व सौरभ अभ्यंकर यांना गाण्याचे सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले होते. सौरभ अभ्यंकर हा आपल्या रॅप संगीताने पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या रॅपद्वारे सामाजिक मुद्यावर आवाज उचलून लोकांमध्ये जागृती पसरवली आहे व लोकांच्या मनामध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली. त्याने आपला रॅप हिंदी चित्रपट ‘गली बॉय” यामध्ये सादर करून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली त्यानंतर त्याने नागराज मंजुळे यांच्या “झुंड” या चित्रपटात अभिनय करून रॅप सुद्धा सादर केला व त्यानंतर “हसल” या रॅप शो मध्ये अंतिम फेरीपर्यंत जाऊन “ओ.जी. हसलर ट्रॉफी” जिंकली व आपल्या गौरवाने आणि बिच्छू टेकडी झोपडपट्टीचे, अमरावतीचे व महाराष्ट्राचे नाव लौकिक केले.

या त्याच्या नवीन गाण्यासाठी सगळी कडून सौरभचे अभिनंदन व कौतुक होत आहे. सोबतच त्याला पुढील उज्वल भविष्यासाठी परिवाराकडून मित्राकडून व अमरावती मधील नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.