Engage Your Visitors!

१५ डिसेंबर रोजी रुई येथे कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित २१ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन 

रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता रुई येथील श्री हनुमान मंदिरात कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय २१ मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . संमेलन अध्यक्ष साहित्यिक डॉ देविदास तारू नांदेड सदस्य महारास्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे तथा सिद्धि निर्धारक राज्यपाल नियुक्त सदस्य्, उद्घाटक आमदार अशोकबापू माने, हातकणंगले मतदार संघ, प्रमुख पाहुणे कांदबरीकार डॉ श्रीकांत पाटील घुणकी ‘ कविसंमेलन अध्यक्ष कवि दिपक पवार सर रुकडी तर प्रतिमा पुजन सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड परभणी यांचे हस्ते करण्यात येणार आहे . तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना प्रा किसनराव कुऱ्हाडे गडहिंग्लज ‘अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहिंग्लज यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

संमेलनास प्रमुख उपस्थीती म्हणून प्रा डॉ सुरेश कुराडे गडहिंग्लज ‘ रमेशचंद्र म्हैसेकर छ संभाजी नगर डॉ मधूकर हुजरे धाराशिव अशोक मोहिते बार्शी ‘ डॉ मंजू राजेजाधव सिंदखेड ‘ प्रा गोविंद लहाने परभणी ‘ सौ शैलजा परमणे कोल्हापूर तानाजी आसबे वाळवे खुर्द ‘ नागोराव सोरकुसरे असणार आहेत .संमेलनात संमेलन विशेषांकाचे प्रकाशन प्रसिद्ध मान्यवरांचे हस्ते होणार आहे . तसेच त्याचप्रमाणे कविसंमेलन अध्यक्ष कवि दिपक पवार सर रुकडी यांचे अध्यक्षते खाली हेणार असून कोल्हापूर ‘ सोलापूर ‘ धाराशिव ,छ .संभाजी नगर ,पुणे  सातारा आदी जिल्ह्यातील कवि कवियत्री सहभागी होणार आहे . असे कवि सरकार यानी पत्रकद्वारे कळविले आहे .

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गाजवला पुण्यातील लक्ष्मीरोड

पुण्यात 11 डिसेंबर पादचारी दिनानिमित्त डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पुण्यात लक्ष्मी रोडवर छोट्या गोड बोलणा-या बालांना मिठु मिठु पोपट ॲवाॅर्ड सर्टिफिकेट्स दिली.निखळ , दिलखुलास हसणा-या पादच्-यांना लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस् प्रदान केले.भेटेल त्या व्यक्तिंना विनोदी किस्से सांगितले. मिमिक्री सादर केली.देखाना हायरे सोचाना..हे गाणे साभिनय नृत्यासह सादर केले.

काही बालांबरोबर झिंग झिंग झिंगाट गाणेही नाचत सादर केले.सहीवरुन स्वभावदर्शन, जन्मतारखेवरुन-चेह-यावरुन भविष्यकथन केले. आपल्या कला आविष्कारातून लक्ष्मी रोडवरील भेटणा-या प्रत्येकास जिंकून डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी जिंकले. जिंदगी दोबारा नही होती असे सांगत आयुष्यात शाश्वत आनंद घेत रहा हा संदेशही विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सर्व पादचा-यांना दिला !

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे 39वतीने आपल्या अनुभवांच्या कवितांची व संवादाची मुक्त मैफल

चाळिशी-पन्नाशीनंतरचं प्रत्येकाचं जीवन म्हणजे अनुभवांचं एक मोठं भांडार असतं… सुख-दुःख, यश-अपयश, अपमान- अवहेलना, तसेच अडचणीच्या प्रसंगी कुणी दिलेला मदतीचा हात असो की, ऐन मोक्यावर कुणी दिलेला धोका असो..या साऱ्या अनुभवातून तावून सुलाखून गेल्यानंतर जी समज येते, जी जाणीव होते, ती प्रत्येकाच्या पुढील आयुष्याला वळण देत असते.

आलेला पैसा आणि गेलेला पैसा, नातलगांनी फिरविलेली पाठ आणि तर कधी नातेसंबंधामुळेच स्थिर झालेली जीवनाची गाडी.. अशा असंख्य गोष्टी या टप्प्यावरील वयात प्रत्येकाने अनुभवलेलं असतं किंवा पाहिलेलं असतं..!

जीवनातल्या या साऱ्या गमती जमती, उन्हाळे- पावसाळे हे सारं कधी तरी सांगावासं वाटतं, व्यक्त व्हावंसं वाटतं…

चला तर मग…? अशा मंडळीशी हितगूज करू? गप्पा मारू? त्यांच्याबरोबर एकत्र जेवण करू? आणि आपल्या जीवनातील एक दिवस त्यांच्याबरोबर व्यतीत करू या…!

कार्यक्रम आहे.

काही तरी बोलू आयुष्यावर ..

सहभाग -नक्षत्राचं देणं काव्यमंच बोल्ड नक्षत्र कवी व कवयित्री टिम

विशेष उपस्थिती -बोल्ड कवी म.भा. चव्हाण, पुणे (ज्येष्ठ साहित्यिक व धर्मशाळाकार)

सहभाग –

1.ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील (चिंचवड)

2.भारुडकार, नाटककार कवी परशुराम वाघचौरे-भूगांव

3. ज्येष्ठ भूजलतज्ञ, कवी दिलीप विधाटे-मावळ

4. कट्टर नक्षत्र कवी बालाजी थोरात-चिंचवड

5. निवेदिका, कवयित्री सौ. प्रीती सोनवणे-भोसरी

6. सुप्रसिद्ध रांगोळीकार कवयित्री सौ. रूपाली भालेराव ,आकुर्डी 

7. विद्यार्थी प्रिय शिक्षिका कवयित्री सौ. दिव्या भोसले-दिघी

8. गुणवंत कामगार कवी सुभाष चव्हाण-चिंचवड.

———————————-

स्थळ – कै. श्री. शिवाजीराव महामुलकर यांच्या स्मरणार्थ उभारलेले सहारा वृद्धाश्रम, कुसवली गाव, तालुका मावळ, पुणे

कार्यक्रम वेळ – सकाळी 9 ते 12 वा.

सायं. ६.०० पर्यंत.

रविवार दि. १५ डिसेंबर २०२४

——————————–

(रस्त्यावर सापडलेल्या व कुटुंबाने सोडून दिलेल्या आजी-आजोबांचे हक्काचे निवासस्थान असलेल्या मावळ तालुक्यातील निसर्गरम्य, डोंगरकुशीत असलेल्या या आश्रमात हा कार्यक्रम होणार आहे.)

प्रवेश शुल्क नाही, (आपल्या खर्चाने यायचे व जायचे)

(चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था ही जबाबदारी सहारा वृद्धाश्रमाच्या वतीने विनामूल्य केली जाईल.)

——————————-

कार्यक्रम संयोजक-

प्रा. राजेंद्र सोनवणे-

कवी-वादळकार: 9272156295

आयोजक-

विजय जगताप -9850905043

नि: शुल्क १९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय ,भोसरी ,पुणे ३९ च्या वतीने दरवर्षी मराठी साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या दिवाळी अंकांचा सन्मान करण्याचे आयोजन केले जाते .या १९ व्या वर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संपादकांनी २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती पुढील पत्त्यावर पाठवाव्यात .स्पर्धा विनामूल्य आहे. कसल्या प्रकारचे या ठिकाणी स्वागत मूल्य घेतले जात नाही. 

संपादकांनी आपल्या दोन दिवाळी अंकांच्या प्रति पुढील पत्यावर पाठविणे.

प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे

संस्थापक-राष्ट्रीय -अध्यक्ष

नक्षत्राचं देणं काव्यमंच

साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरी

पुणे -४११०३९.

पाठवण्याची अंतिम मुदत नाही. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक दिवाळी अंकांना फोर कलर सन्मानपत्र देण्यात येईल. विजेत्यांना समारंभपूर्वक सन्मानचिन्ह, गौरव पत्र ,पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठित असलेली हे दिवाळी अंक स्पर्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या दिवाळी अंकांना उत्तम प्रतिसाद दरवर्षी दिला जातो. यावर्षी सुद्धा संपादकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन, या स्पर्धेला यशस्वी करावे. अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कवी वादळकार ,पुणे यांनी कळविलेले आहे.

19 वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शन

साताऱ्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन कराड व जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत शेतीपासून थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यासाठी या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनाचा कालावधी 6 डिसेंबर पासून ते 10 डिसेंबर 2024 असा असून यात विविध विभागांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रदर्शनात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, विविध योजना, विविध व्यावसायिक क्षेत्रे, मिल्किंग मशीन, नर्सरी, मसाले, पंचकर्म, ठिबक सिंचन, वाहने, पशुपक्षी प्रदर्शन व बाजार, इत्यादी वेगवेगळ्या विभागांचे स्व आयोजन नागरिकांना अनुभवायला मिळाले. प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा ) यांच्यामार्फत संचालन करण्यात आले. समस्त सातारकर व कराड करांनी आपले बहुमोलाची उपस्थिती दर्शवली. ह्या संपूर्ण माहितीचा आढावा कला रंजन न्यूज पत्रकार सायली बाळू ढेबे ह्यांनी घेतला.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना विश्वगुरु उपाधि प्रदान !!!

भारतासह 20 देशात स्वखर्चाने मानवधर्म:सर्वश्रेष्ठ धर्म या प्रसारासाठी विश्वजोडो अभियानासह विनामूल्य चालता बोलता हिंडता फिरता असा ‘ सबकुछ.मधुसूदन ‘ हा विश्वविक्रम एकपात्री कार्यक्रम करुन हजारो रसिकांना दिलासा दिला. डाॅ.घाणेकर यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल डाॅ.मधुसूदन घाणेकर गौरव समिती तर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना जाहिररित्या , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ.न.म.जोशी यांच्या शुभहस्ते ‘ विश्वगुरु ‘ ही उपाधि प्रदान करण्यात आली.

सदर उपाधि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी वैश्विक शक्तिला प्रदान केली. ” दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय, भारतीय अध्यात्म, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय मजदूर संघ यांचे संस्कार घडल्यानेच सातत्याने विश्वजोडो अभियानाच्या माध्यमातून भेटेल त्या रसिकाला निरपेक्ष आनंद देण्याचे भाग्य मला मिळाले ” असे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सन्मानाला उत्तर देताना सांगितले. ” आनंदाचे वितरण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डाॅ.मधुसूदन घाणेकर होय. आयुष्यभर जो दुस-याला निरपेक्ष आनंद सातत्याने देत रहातो तोच खरा विश्वगुरु असतो,डाॅ.घाणेकर.

हे ‘ विश्वगुरु ‘ चेच कार्य करीत आहेत, असे गौरवोदगार डाॅ.न.म.जोशी यांनी उपाधि प्रदान करताना काढले. या प्रसंगी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त मिलिंद लेले , ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाईक, आंतराष्ट्रीय कीर्तिच्या शीळवादक अनघा सावनूर आगाशे, भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष भारती महाडिक , मधुरंग संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.मेघना मधुसूदन घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

याच सोहळ्यात डाॅ.घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाचा 600 वा अंक, डाॅ.घाणेकर यांचा मधुउवाच हा विश्वविक्रमी 50वा काव्यसंग्रह आणि हाहाहाहीहीहीहूहूहू व्यंगचित्र संग्रह याचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. वर्ल्ड क्वीन बीजच्या,अध्यक्ष सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले.डाॅ.घाणेकर यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन आणि प्रास्ताविक वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक यांनी केले.

स्वागत गीत मनीषा सराफ यांनी सादर केले. मिलिंद लेले, आघाडीच्या कवयित्री आणि निवेदिका ऋचा थत्ते, सौ.मेघना घाणेकर अनघा सावनूर आगाशे, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक -अध्यक्ष प्रिया दामले आदिंचीही भाषणे झाली. काव्यशिल्पच्या माजी अध्यक्ष अपर्णा आंबेडकर, महिला सन्मानच्या सचिव दीपाराणी गोसावी, युवा विश्वच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई , मंदा नाईक, मधुकर्णिका सारिका सासवडे आदिंनी डाॅ.घाणेकरांवर आधारीत स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ‘ सबकुछ मधुसूदन ‘ ह्या एकपात्री कार्यक्रमाचा 81, 000 वा प्रयोग सादर करुन उपस्थितांची मने जिंकली !

आभार प्रदर्शन वसुधा नाईक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष भागवत, माधुरी भागवत, योगेश हरणे , गौरव पुंडे, अजया मुळीक, मुकुंद भागवत आदिंनी विशेष योगदान दिले.

स्कुल ऑफ स्कॉलर्स बीर्ला काॅलनी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पिली आदरांजली 

अकोला – बिर्ला काॅलनी स्थित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षित व सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांद्वारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकराबद्दल भाषणाद्वारे माहिती दिली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षित यांनी विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घ्यावे. असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावर्षीचा ‘जमादार बापू लक्ष्मण लामखडे गुणगौरव पुरस्कार’ स्तंभलेखक संजय नलावडे यांना प्रदान

दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने गौरविलेले आणि कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम असा मरणोत्तर किताब प्राप्त झालेले जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची ४६ वी पुण्यतिथी काल जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव या त्यांच्या जन्मगावी साजरी करण्यात आली. सकाळी जमादार बापूंच्या स्मारकाचे पूजन झाल्यानंतर सालाबादप्रमाणे शिवनेरीभूषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांचीच लागोपाठ ४६ व्या वर्षीही कीर्तनसेवा पार पडली.

यानंतर जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून बापूंच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘जमादार बापू लक्ष्मण लामखडे गुणगौरव पुरस्कार – २०२४’ प्रदान सोहळा संपन्न झाला. यावर्षीचा गुणगौरव पुरस्कार स्तंभलेखक संजय नलावडे यांना शिवनेरीभूषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. ‘शिवनेरीची श्रीमंती’ या संशोधनपर व्यक्तिचित्रांच्या संग्रहात विस्मृतीत गेलेल्या मान्यवरांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या आणि ‘निसर्गरम्य जुन्नर – भूमी गुणिजनांची’ या फेसबुक सूमूह सदरातील अनेक लेख राज्यशासनाच्या मराठी विश्वकोशात सामील होण्याच्या बहुमूल्य आणि प्रेरणादायी कार्यासाठी स्तंभलेखक संजय नलावडे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून या अगोदर डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, वृक्ष मित्र जालींदर कोरडे आणि शिवनेरीभूषण राजाराम महाराज जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी जमादार बापूंच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग आणि आठवणी सांगून पुरस्कार्थी स्तंभलेखक संजय नलावडे यांनी मंगरूळ ग्रामस्थ आणि जमादार बापू लक्ष्मण लामखडे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सरपंच सौ. ताराबाई लामखडे प्रतिष्ठानचे डॉ. बाळासाहेब लामखडे, कैलास लामखडे, बाळकृष्ण लोहोटे, संजय लामखडे, दत्तात्रय लामखडे, विलास लामखडे, अमोल कसाळ, गोरक्षबाबा लामखडे, सचिन भोजणे आणि सर्व ग्रामस्थांनी या पुण्यतिथी समारंभासाठी विशेष परिश्रम घेतले. दत्ता लामखडे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले तर निलेश लामखडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सोमनाथ लंघे यांची तज्ञ संचालकपदी निवड 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कर्मवीर सुभाष आण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकरवाडी येथील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ तुकाराम लंघे ता . दौंड , जि . पुणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती बद्दल देवकरवाडी ग्रामस्थ व विविध सहकारी व सेवाभावी पतसंस्थांच्या वतीने तसेच दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघ,जुन्नर येथील श्री विघ्नहर कला अकादमी तसेच दैनिक पुणे वैभव परिवाराच्या वतीने सोमनाथ लंघे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

संघर्षमय जीवन आणि अस्वस्थ सभवताल मांडणारी ग्रामीण कादंबरी : हेलपाटा

माणूसच त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो, त्यानुसार म्हणतात, ‘बदाम खाण्यापेक्षा अधिक ठेच खाण्याने स्मरणशक्ती अधिक विकसित होते, असा वास्तव अनुभव मिळतो, ती तानाजी धरणे यांची आत्मकथनात्मक ‘हेलपाटा’ ही कादंबरी आहे. त्यात ग्रामीण जीवनशैली, संयुक्त कुटुबातील एकोपाचे वर्णन केले आहेत. भाऊंचे व बाईचे म्हणजेच आई-वडिलांचे आण्णा म्हणजेच मोठे भाऊ, मामा, काका आणि आपली भावंड कुसुम म्हणजे बटर विशेषत्वाने आवडले.

लेखकाचे शिक्षणाविषयीची आस्था, नातेसंबंधातील प्रेम, बौद्धिक हुशारी, चिकाटी आणि कष्टाचं मोल हे गुणवैशिष्ट्य छान आहेत. त्यामुळेच गरिबी दारिद्र्यात न जगता आधुनिक जीवन जगण्याची संधी मिळाली, प्रत्येक वळणावर मिळालेले मार्गदर्शक गुरुजन, आजी यांच्यामुळेच आपले ग्रामसेवक या पदापर्यंत प्रवास प्रचंड कष्टातून साकार झाले. कादंबरी वाचतांना डोळ्यातून पाणी येतं, मन भरून जातं, गरिबी काय असते ? याचा प्रत्यय यातून मिळतो.

ग्रामीण भागात असलेली ज्वारीची शेत, ऊसाची शेत, गुऱ्हाळ, अत्यंत कष्टदायक पशुपालनाचा जोडधंदा निसर्ग आणि माणसाच्या सान्निध्याचे वर्णन, मांजर,कोंबड्या, शेळी यांच्यावरही लेखकाची असलेली माया, त्यापरिप्रेक्ष्यात वापरले जाणारे शब्द आजीची कावळ्याची गोष्ट, सातवीतून शाळा सोडल्यानंतर मुंबईपर्यंतचा प्रवास या गोष्टी सुंदररीतीने रेखाटल्या आहेत. येथे आंनद यादव यांची गोतावळा कादंबरीची आठवण होते. हेलपाटा वाचतांना केंद्रस्थानी ग्रामीण दुष्काळी भागात अन्नपाण्यावाचून काढलेले वेदनादायी व भयानक दिवस? गरीबीचे चटके सहन सोसलेले, भोगलेले लेखक लेखक तानाजी धरणे आणि त्यांचे कुटुंब.

कष्टाच्या जीवावर त्यांनी खडतर प्रवास करून शोधलेला सुखाचा मार्ग. संवेदनशील मनाचे श्री तानाजी धरणे यांची ‘हेलपाटा’ संघर्षमय जीवनावर मात करायला लावणारी, मनाला हेलावून टाकणारी कादंबरी आहे. त्यातील अनेक प्रसंग माणसाला विचार करायला भाग पाडणारे आहेत. एखाद्याच्या जीवनामध्ये संकट येतात, ते त्याला जीवन यशस्वी करण्यासाठीच असा विश्वास मनात येतो. हा थक्क करणारा जीवन प्रवास वाचून अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळेल, लेखक आज चांगल्या पद्धतीने आयुष्य जगत आहेत. तरीदेखील भूतकाळातील कष्टाची जाण झाल्याशिवाय राहत नसल्याचे अभिमानाने सांगतात,’ की माझे वडील सालगडी होते. पण जगातले सर्वात बेस्ट बाबा होते.’ यावरून त्यांचे कुटुंब आणि वडिलांच्यावर प्रेम लक्षात येते. नुसते कुटुंबावरच नाही तर त्यांनी पाळलेली खिल्लारी गाय. या गायीला तर त्यांनी कुटुंबांची तारणहार व देवाचा दर्जा दिला आहे.

कुटुंबातील जरी हे धाकट भावंड,असलं तरी छोट्या वयात त्यांनी खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत छंद सुद्धा, जोपासले. लहानपणी त्यांनी वाघाचे सोंग घेतले. तेव्हापासून त्यांना त्यांचे मोठे भाऊ अर्थात आण्णा हे लाडाने ‘वाघ्या’ म्हणून हाक मारायचे. कपड्यावरून जरी माणसाचे व्यक्तिमत्व ठरत असले तरी आपण आपला साधेपणा जपला पाहिजे, यातून साधेपणाचे समर्थन करतात. कादंबरीत मध्यमवर्गीयांचे चित्रण अधोरेखित झाल्याने त्यात अनेक प्रसंग आहेत, त्यातील एक घरामध्ये पैशाची अडचण होती. बहिणीचं लग्न जमलं होतं. म्हणून बैलं विकायला काढले. बैलं घेऊन बाजारात गेले व एकच बैल विकला. म्हणून दुसरा बैल घेऊन परत घरी येऊ लागले. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला.

अशा परिस्थितीमध्ये अंधाऱ्या रात्रीत पडत असलेल्या पावसात लेखकाचे वडील म्हणजेच भाऊ नदीच्या कडेला असलेल्या झाडाला, बैल बांधून तिथेच भिजत बसून राहिले. अंधारामुळे नदीच्या पाण्यात बैल वाहून गेलेला त्यांना समजलेच नाही.रात्रभर भिजल्यामुळे कानाला त्यांच्या दुखापत होऊन ते जन्माचे अधू झाले. भाऊंच्या, नशिबी आलेले दारिद्र्य दूर करताना त्यांची दमछाक व्हायची. तरीही त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असल्याचे लेखकाने विशद केले आहे.
लेखकाचे भाऊ म्हणजे ‘अण्णा’ घरात, समाजात वावरताना,एकदम शांत,संयमी व परिस्थितीचे भान ओळखून वागणारी व्यक्ती. पण जर कोण अन्याय करेल तर त्याला पद्धतीने जशास तसे प्रत्युत्तरही देत असत. एक दिवस विनाकारण कामाचा खाडा त्यांचे मालक व मुकादम लावायला लागले. त्यावेळी त्यांनी विरोध केला असता ते अण्णाला, मारण्यासाठी धावले. त्यावेळी त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला.मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली.

आपण गरीब नक्की आहोत पण लाचार नाही.याची जाणीव त्यांना झाली व अण्णाचा पारा चढला. आपल्यासमोर मालक उभा आहे. हेही ते विसरले व मुकादमाला आणि मालकाला त्यांचा हिसका दाखवला. लेखकाने त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करत असताना, अनेक प्रेरणादायी वाक्य या कादंबरीची बलस्थाने आहेत. संघर्ष केल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाहीत. संघर्षामुळे व्यक्ती घडतो व व्यक्तीमुळे समाज घडतो. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय, सुखाची हिरवळ दिसणार नाही. जीवनात कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही. अशा वाक्यांनी लेखकाला हे संघर्षासाठी बळ दिल असेल. अतोनात कष्ट, उपासमार व हालपेष्ठा यावर मात करत, प्रतिकूल परिस्थितीतून वाट कशी शोधायची हे या कादंबरीतून शिकायला मिळते. कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ निभावून नेण्यासाठी, इयत्ता सातवीत असल्यापासून मुंबईला कामासाठी व धंद्यासाठी ‘हेलपाटे’, मारायला केलेली सुरुवात नक्कीच कुटुंबाला उभारी द्यायचं काम करते.

मुंबईला राहून कमावलेली रक्कम, ज्यावेळी त्यांच्या वडिलांच्या पुढे ठेवली जाते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून खळकन अश्रू वाहतात. कारण त्यांनी जीवनामध्ये एकावेळी एवढे पैसे कधीच पाहिलेले नसतात. आपण ज्यावेळी घरापासून,आपल्या माणसापासून, आपल्या गावापासून दूर जातो तेव्हा जग किती विचित्र आणि किती विशाल आहे याचा प्रत्यय येतो. हे लेखकाचे अनुभव ऐकताना अंगाचा थरकाप उठतो.

एकूणच आई-वडील शेजारी-पाजारी,प्राणी, मित्र आणि सुखी जीवनाचा सन्मार्ग दाखविणारे शिक्षक यांच्या प्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांचे गुरुवर्य श्री फोजमल पाखरे सर म्हणतात, ‘काट्यांनी भरलेल्या वनातून चाललास म्हणून तुला केवड्याचा सुगंध भेटला..’. कसेतरी एक महिना दादा खेसेच्या सोबत सायकलवर कॉलेज केले. तो माझ्यापेक्षा खूप छोटा होता. सर्व गुरुवर्य मनापासून मुलांना शिकवत होते. पण माझे कॉलेजला अजिबात मन लागत नव्हते. अकरावीची सर्व मुलं माझ्यापेक्षा वयाने कितीतरी छोटी होती. तो न्यूनगंड मनात होताच शिवाय आपले आत्ताचे शिक्षण म्हणजे “शिळ्या कढीला ऊत ” अशीच स्थिती होती. एकदीड महिना गावी राहिलो त्या दरम्यान आजारीही पडलो. जवळचे सर्व पैसे संपत आले होते. तशा कॉलेजच्या माझ्या दांड्या वाढू लागल्या.

हळूहळू मनात येवू लागलं आपण उगीच भावनेच्या भरात कॉलेजला प्रवेश घेतला. माझाच मला तिरस्कार वाटु लागला. तेवढ्यात एक आशेचा किरण दिसला. “आमचे मित्र राजेंद्र म्हाळस्कर याने रत्नागिरी गुहागरवरुन कोकण निवड मंडळाने ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज मागवल्याची दै. नवाकाळची बातमी पाठवली ती वाचून वाटलं ” भगवान के घर मे देर है, पर अंधेरा नहीं “! बातमी नीट दोन तीन वेळा वाचली.त्यातील बारकावे पाहुन घेतले व दुसर्‍या दिवशी शिरुरला जाऊन सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स व लागणारे कोर्ट फी स्टॅम्प आणले. कर्ड्यात कॉलेजला जाऊन सत्य प्रती करुन घेतल्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी एस.टी. ने फॉर्म रजिस्टर करण्यासाठी न्हावरेला गेलो. पोष्टात जाऊन फॉर्म पुन्हा – पुन्हा वाचला. काही चुका तर नाहीत ना ते पाहिले .तो फॉर्म कोकण निवड मंडळाच्या नावाने रजिस्टर केला. रजिस्टरचे पैसे दिले. नक्की आठवत नाही परंतु वीस-बावीस रुपये असे काहीतरी होते. फॉर्म रजिस्टर केला त्याची पावती घेतली. अर्जाची पोहच यावी म्हणून पोहच जोडली. मनावरचा कित्येक मनाचा बोजा कमी झाला. आपण ग्रामसेवक झाल्याचा फिल आला. तहानभूक हारल्यासारखं झालं. न्हावरा ते आंबळे चार- पाच रुपये एस.टी.चे तिकीट असावे परंतु तिकिटापेक्षा ” एक रुपया” माझ्याकडं कमी होता.त्यामुळे घरी बसने जाता येईना. न्हावर्‍यात मित्र बरेच होते परंतु एक रुपया कोणाला मागणेचे धाडस मला झाले नाही. फॉर्म भरल्यामुळे आनंद खूप झाला होता. त्यापुढे ही अडचण मला क्षुल्लक वाटत होती.

एक रुपया कोणाला मागण्याऐवजी मी सरळ आंबळ्याचा रस्ता पकडला व चालू लागलो. मी चालत-चालत न्हावरा ते आनोसेवाडी आठ किलोमीटर भर उन्हात चालत आलो. पण मला बिल्कुलही थकवा आला नाही किंवा वाईटही वाटलं नाही ! परंतु “एक रुपयाचं मोल काय असतं हे त्या दिवशी शिकलो “!
आईविषयी लिहिताना लेखक अनेकदा सदगतीत झाल्याशिवाय राहत नाहीत. मित्राविषयी असलेले जिव्हाळा व प्रेम या कादंबरीत पहायला मिळते. ते म्हणतात,’ रवीचा स्वभाव खूप उमदा होता.मैत्रीसाठी जगणारा माणूस मी त्यांच्यात पाहिला.’

आनोसेवाडीत जन्माला आलेले हे पोर, एक दिवस खडतर प्रवास करून उपाशी-तापाशी राहून ग्रामसेवक होते. ही बातमी देण्यासाठी त्यांचे अण्णा मुंबईला त्यांना निरोप द्यायला जातात.त्यावेळी भाजी विकण्याची रिकामी पाटी, तराजू, वजन काटे बाजूला सरकवतात व म्हणतात,’ बापू! आजपासून तुझ्या डोक्यावरची पाटी गेली.’आपले दुःखाचे दिवस सरले तू ग्रामसेवक झाला.’ हे वाक्य ऐकताच अक्षरशः लेखक हंबरडा फोडून अण्णाच्या गळ्यात पडतात. याचवेळी अंधारमय जीवनामध्ये सोनेरी प्रकाशाची पहाट झाल्यासारखी वाटते.
देखणे निर्मितीमूल्य : राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पीएच.डी. संशोधनासाठी हेलपाटा कादंबरी आहे. त्यामुळे आजतागायत एकत्रित न मांडलेला मराठी ग्रामीण कादंबरीत अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण गरीबीतील जीवनाचा ते संघर्षातून यश मिळते, असे भाकीत करणारी कादंबरी मैलाचा दगड ठरेल, संदर्भ ग्रंथ ठरेल.

मानवी जीवनातील मूल्यांची परिमाणे, सहानुभाव आणि सकारात्मक भूमिका बाबाराव मडावी यांची पाठराखण बोलके मुखपृष्ठ, मुखपृष्ठावर सकारात्मक भविष्य शोधणाऱ्या वडिलांचा भाव, ठळक प्रिंटींग, आकर्षक साईजची अभिनव कलाकृती असल्याने गरुड भरारी ठरेल, असा आशावाद वाटतो. या पुस्तकाला साहित्य लेखनासाठीचे अनेक पुरस्कार मिळावेत, याच अपेक्षेसह तानाजी धरणे यांना पुढील साहित्यिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
· कादंबरी : हेलपाटा
· लेखक : तानाजी धरणे
· पाठराखण : बाबाराव मडावी,यवतमाळ
· मुखपृष्ठ : शिरीष घाटे, सोलापूर
· प्रकाशक : पी.आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशन,वरुड अमरावती
· पृष्ठे : १४४ किंमत : २२५ /- मो. : ९२८४७०७५३२
· परिचय : प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी
· शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब