मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह नेपाळ, न्यूझीलंड, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया,थायलंड,माॅरिशस, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन,रशिया, दुबई आदि 20 देशात विश्वजोडो अभियानासह चालता बोलता हिंडता फिरता असा सबकुछ.मधुसूदन एकपात्री.कार्यक्रम करुन हजारो देशविदेशी प्रवाशांना विनामूल्य दिलासा दिला.
विश्वजोडो अभियानात डाॅ.घाणेकर यांनी मानवधर्म:सर्वश्रेष्ठ धर्म, अन्नदान- रक्तदान-नेत्रदान अवयवदान-देहदान करा, दिव्यांग.वंचित यांना सहकार्य करा, झाडे जगवा, पाणी वाचवा, मधमाशी वाचवा आणि विश्व वाचवा, निसर्गावर प्रेम करा, गो माता : विश्व माता, हसा आणि जग जिंका, सा-या विश्वावर प्रेम करा असे संदेश दिले. भेटेल त्याच्या सहीवरुन सही सही सकारात्मक स्वभाव सांगणे, भेटेल त्याला विनोदी किस्से सांगणे, शीळवादन ,जुनी गाणी गाऊन दाखवणे, मुद्राशास्त्र-हस्तसामुद्रिक-रेकी संमोहन-अंकज्योतिष द्वारे दिलासा देणे, निखळ हसणा-यास तात्काळ लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्ड देणे अशा पध्दतीने जिथे रसिक तिथे विनामुल्य मनोरंजन डाॅ.घाणेकर यांनी केले.
या त्यांच्या दैदीप्यमान कार्यासाठी डाॅ.मधुसूदन घाणेकर गौरव समिती तर्फे डाॅ.घाणेकर यांना शनि.दि.7 डिसेंबर 2024रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन येथे ‘ विश्वगुरु ‘ उपाधिने जाहिररित्या सन्मानित करण्यात येणार असल्याचे समिती समन्वयक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी कळवले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ ज्योतिर्विद व.दा.भट, शिक्षणतज्ज्ञ डाॅ.न.म.जोशी, दै.सकाळचे उपसंपादक आशिष तागडे, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त मिलिंद लेले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शीळवादक अनघा सावनूर आगाशे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाईक आणि भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग गौरव समितीचे सल्लागार आहेत.
अक्षरमंच सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी,भारतीय विचारधाराच्या संस्थापक अध्यक्ष भारती महाडिक, वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष वसुधा नाईक, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष भागवत, भाजप महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष शैलजा सोमण,ज्येष्ठ साहित्यिक अपर्णा आंबेडकर, महिला सन्मानच्या पदाधिकारी दीपाराणी गोसावी, सुचेता प्रभुदेसाई, ज्योतिर्विद ॲड.सुनीता पागे, डाॅ.जयश्री बेलसरे, गायिका शलाका गाडगीळ आणि मनिषा सराफ,युवा कार्यकर्त्या माधुरी भागवत, दादासाहेब फाळके चित्रपट.युनियनच्या कार्याध्यक्ष सोनिया गोळे आदिंचा या गौरव समितीमधे सहभाग आहे.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमीडहाळी विशेषांकाचा 600 वा अंक, मधुउवाच हा 50 वा काव्यसंग्रह तसेच हाहाहाs हीहीहीssहूहूहूsss हा व्यंगचित्र संग्रह प्रकाशित होणार आहे. या सोहळ्याचे निमित्त साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर आपल्या चालत्या बोलत्या सबकुछ.मधुसूदन एकपात्री.कार्यक्रमाचा विश्वविक्रमी 81,000 वा प्रयोग सादर करणार आहेत.
Leave a Reply