कवि सरकार इंगळी
रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता रुई येथील श्री हनुमान मंदिरात कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय २१ मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . संमेलन अध्यक्ष साहित्यिक डॉ देविदास तारू नांदेड सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे तथा सिद्धि निर्धारक राज्यपाल नियुक्त सदस्य, उद्घाटक आमदार अशोकबापू माने हातकणंगले मतदार संघ . प्रमुख पाहुणे कांदबरीकार डॉ श्रीकांत पाटील घुणकी ‘ कविसंमेलन अध्यक्ष कवि दिपक पवार सर रुकडी . तर प्रतिमा पुजन सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड परभणी यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना प्रा किसनराव कुऱ्हाडे गडहिंग्लज ‘अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहिंग्लज यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . संमेलनास प्रमुख उपस्थीती म्हणून प्रा डॉ सुरेश कुराडे गडहिंग्लज ‘ रमेशचंद्र म्हैसेकर छ संभाजी नगर डॉ मधूकर हुजरे धाराशिव अशोक मोहिते बार्शी ‘ सौ शैलजा परमणे कोल्हापूर तानाजी आसबे वाळवे खुर्द ‘ अभिनेत्री निकिता घोरपडे छ संभाजी नगर असणार आहेत .संमेलनात संमेलन विशेषांकाचे प्रकाशन प्रसिद्ध मान्यवरांचे हस्ते होणार आहे . तसेच त्याचप्रमाणे कविसंमेलन अध्यक्ष कवि दिपक पवार सर रुकडी यांचे अध्यक्षते खाली हेणार असून कोल्हापूर ‘ सोलापूर ‘ धाराशिव ,छ .संभाजी नगर ,पुणे ‘ सातारा आदी जिल्ह्यातील कवि कवियत्री सहभागी होणार आहे . असे कवि सरकार यानी पत्रकद्वारे कळविले आहे.
Leave a Reply