Engage Your Visitors!

शाळेच्या अमृत महोत्सवनिमित्त मुधोजी बालक व प्राथमिक मंदिर फलटण यास वसुधा नाईक यांची सदिच्छा भेट

दि. ११/११/२०२४ रोजी वसुधा वैभव नाईक यांनी फलटण येथील मुधोजी बालक व प्राथमिक मंदिरास भेट दिली.स्वतः त्या शाळेमध्ये १९७० ते १९७५ या पाच वर्षात त्या शिकत होत्या.जवळजवळ ५० वर्षाने त्या शाळेला भेट देत होत्या. त्यांच्या स्वतःच्या नाती सोनाक्षी,समीक्षा आणि त्रिशिका यांना त्यांची शाळा दाखवण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. तिथे समजलं की शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. तेथील बाल वर्गातील मुलांना खाऊ वाटण्यात आला.

बाल वर्गाला तिथे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पहिली ते चौथी मध्ये १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर एक आगळा वेगळा आनंद मिळाला. नयनातून अश्रू वाहू लागले. हे आनंदी अश्रू शाळेने कर्म दिले त्या शाळेसाठी होते. शिक्षकांसाठी होते. बाजारे गुरुजींसाठी होते.बालक मंदिराच्या मुख्या.रजपूत मॅडम यांनी पूर्ण शाळेची माहिती दिली. जुनी शाळा,नवी बिल्डिंग यातला फरक सांगितला. वसुधा व त्यांच्या नातींचे स्वागत खूप छान केले. प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना खाऊ देण्यासाठी त्यांनी मदत केली. शाळेचा सर्व स्टाफ हेल्पफुल आहे.वीर मॅडम यांचे सहकार्य छान लाभले. सर्व स्टाफ मदतीसाठी पुढे आहे.

मधोजी प्राथ. विभागाचे मुख्या.शिंदे सर यांच्याशी फोनवर बोलणे झाले. सर देखील हेल्पिंग नेचरचे छान वाटले. सुनील पाडवी यांनी सहकार्य केले. बाकी शिक्षक स्टाफ सगळा उत्तम आहे. वसुधा यांनी आपला वर्ग कोणता होता हे आपल्या नातींना दाखवले व त्या वर्गातल्या त्याच बेंचवर त्यांनी बसून छान फोटोंचा आनंद घेतला.

दिवाळी सुट्टीनंतर शाळेचा आज पहिला दिवस होता. तरी देखील बरेच विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. शाळेचा पहिला दिवस, अमृत महोत्सव आणि त्यात लहान मुलं बघितली की वसुधाला आनंद होतो. वसुधा यांनी नातींच्या हातून मुलांना खाऊ वाटला.मुले खूष, शिक्षक खूष, वसुधा खूष….

रजपूत मॅडमने वसुधा यांचा बायोडाटा घेतला. या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून निश्चितच आपल्याला या शाळेत पुन्हा मानाने बोलवले जाईल. असे त्यांनी आश्वासन दिले. शाळेत ठेवले पहिले पाऊल जेव्हा नयनांच्या कडा पाणावल्या तेव्हा वसुधाचे कर्मभूमीला लागले पाय,

आनंदाचा झरा ती फलटणातून घेऊन जाय

मनी आस तिला बालांना भेटण्याची

स्वतःच्याच शाळेत मन रमवण्याची

नातींना घेऊन आली शाळा दाखवायला

शाळेचे वातावरण पाहून मन लागले बोलायला

जा तुझ्या वर्गात जाऊन बस बाळा

हीच तर तुझी होती प्राथमिक शाळा

जीवन कसे जगायचे हा धडा शिकवला

आता वसुधाने समाजात पाय घट्ट रोवला

शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे आज

वसुधाच्या डोक्यावर ज्ञानाचा चढतोय सुरेख साज 

हा दिवस खूप खास वसुधासाठी

कार्य उत्तम चालू आहे तिथे समाजासाठी

 

 

डॉ. मधुसूदन घाणेकर यांचा बालकांसाठी ‘सबकुछ मधुसूदन’ एकपात्री कार्यक्रम

 डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘सबकुछ मधुसूदन ‘ 80990 वा प्रयोग सौ. वसुधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. तसेच विश्वविक्रमी डहाळी_596 व्या अंकाचा प्रकाशन सोहळा वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फे अध्यक्षा सौ.वसुधा नाईक यांच्या शुभ हस्ते झाला.उपस्थितांनी या कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली. निमंत्रक वैभव नाईक यांनी संयोजन केले. महिला सन्मानच्या पदाधिकारी सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपाराणी गोसावी आणि सुचेता प्रभुदेसाई या पदाधिकारी, काही बाल रसिक आणि पालक वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.

सौ.वसुधा नाईक यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार केला. डाॅ.मधुसूदन घाणेकर 2006 पासून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन डहाळी अनितकालिकाचा उपक्रम विनामूल्य राबवतात. सर्व मजकूर हाताने लिहितात. या माध्यमातून त्यांनी शेकडो नवोदित साहित्यिकांना डहाळीचे व्यासपीठ मुक्तपणे उपलब्ध करुन दिले आहे.

हृदयविकार तसेच कोरोना या प्रतिकुलतेवर मात करत त्यांनी दिलेले योगदान निश्चितच गौरवास्पद आहे.सर्व सामान्यांना हे अनितकालिक निश्चितच दिलासा देणारे आहे. सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले डाॅ.घाणेकर गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ देशविदेशियांना सबकुछ मधुसूदन ह्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमातून मनमुराद आनंद देत आहेत, असा त्यागी कलावंत होणे नाही ” या शब्दात सौ.वसुधा नाईक यांनी डाॅ.घाणेकर यांचा गौरव केला.’रमाची पाटी’ ह्या कचरा वेचणा-या विद्यार्थिनीवर आधारीत असलेल्या लघुपटाच्या कथेला सौ.वसुधा नाईक यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सौ.वसुधा नाईक यांच्या उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी त्यांचा हृद्द सत्कार केला.

गोड बोलणा-या बालांना मिठू मिठू पोपट आणि हसणा-या रसिकांना लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रदान केले. समारोप प्रसंगी सौ.वसुधा नाईक यांनी छान खाऊ, चेंडू , खोडरबरं देऊन खुष केले.बालकांचेही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. मुले खूप खूष झाली. पालक आनंदी झाले.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविंद्र सूर्यवंशी – संस्थापक युवा क्रांती संघटना पोलीस मित्र यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम इंटरनॅशनलच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसुधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कांदिवली पश्चिम येथे उत्तर भारतीय महिलांद्वारा ” छटपूजा” मोठ्या उत्साहात पार पडली

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

कांदिवली पश्चिम येथील बजरंग सोसायटी जवळ, महावीर शाळे शेजारी असलेल्या मैदानात श्री.बजरंग एस,आर,ए, सोसायटी, श्री.साईकृपा एस.आर.ए.सोसायटी, आणि जनता कल्याण कारी एस.आर.ए.सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागातील उत्तर भारतीय महिला भगिनी करिता छटपूजा चे आयोजन करण्यात आले होते.गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सूर्यास्ता वेळी पाण्यात उभे राहून महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात छटपूजा केली.

या ठिकाणी पाण्याचा मोठा कृत्रिम तलाव बनविण्यात आला होता.मुलांच्या कल्याणासाठी, प्रगती साठी,व ज्यांना संतान नाही ते यावेळी नवस बोलतात,व काही महिला भगिनीं नवस पूर्ण करण्यासाठी छटपूजा करतात.आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या नंतर जल अर्ज करुन छटपूजा पूर्ण करतात,व उपवास सोडतात.कृत्रिम तलावाच्या भोवती जागोजागी ऊस उभा करून पणत्या लावून महिला भगिनीं पाण्यात उभ्या राहून छटपूजा करत होत्या.धार्मिक गाणी गायली जात होती,या प्रसंगी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कांदिवली पोलिस ठाणे येथून पोलिस अधिकारी व पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या विभागातील अनेक मान्यवर पुरुष व महिला उपस्थित होते.बजरंग सोसायटी चे चेअरमन रविंद्र राऊत यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे मुख्य प्रवर्तक विजय पाल जी, यांचा सत्कार करुन स्वागत केले.तसेच ललन राव यांनी श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव भारत कवितके यांचा सत्कार करुन स्वागत केले.या प्रसंगी रविंद्र राऊळ,ललन राव,टिंकू खान, विजय पाल, भारत कवितके, कुमार सुगावे, निजामुद्दीन, राजेश यादव, प्रविण पाल, प्रभात पाल,सह तिन्ही सोसायटी चे पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.छटपूजा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील पुरुष व विशेषतः महिला भगिनीं परिश्रम घेतले.

 

पंचायत समिती जुन्नर तर्फे ग्रामसेवकांना निवडणूक उपक्रमांविषयी शिबिराचे आयोजन

पंचायत समिति जुन्नर अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना निवडणूक उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेचे सर्व उपक्रम व त्याबद्दलची कार्यवाही बाबत ग्रामसेवकाना सूचना देताना पंचायत समिती जुन्नरच्या स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी सविस्तर चर्चा करून व योग्य ते मार्गदर्शन करत मतदार जनजागृती अंतर्गत मतदार प्रतिज्ञा, रांगोळी ,गृहभेटीद्वारे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदान करण्याविषयी जनजागृती करणे. मतदान केंद्रावरील सोयी सुविधांची माहिती देणे. प्रभात फेरी, रॅली इत्यादी उपक्रम कसे राबवावे यासंदर्भात माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडावी असे आवाहन करणायात आले.

तसेच ग्रामपंचायत अंतर्गत know your polling station या पद्धतीने सर्वांना मतदान केंद्रांची माहिती देणे अशा सूचनाही ग्रामसेवकाना देण्यात आल्या. सर्व विभाग हे काम करणार आहेत. यामध्ये एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग ,आरोग्य विभाग, बचत गट सर्वांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा आंतरराष्ट्रीय शताब्दी सन्मान

काव्य ,गायन, व्यंगचित्र, संपादन, अभिनय , ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण, शीळवादन आदि विविध क्षेत्रात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या दैदीप्यमान कारकिर्दीबद्दल सनफ्लाॅवर USA संस्थेतर्फे नुकतेच आंतरराष्ट्रीय शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार सनफ्लाॅवर,USA च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक सौ.वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना प्रदान करण्यात आला.

प्रास्ताविक आणि संयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैभव नाईक यांनी केले.डाॅ.मधुसूदन घाणेकर सातत्याने देशविदेशात गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ आपल्यामधील कलागुणांना विश्वाभिमुख करीत आहेत आणि त्यांच्या याच योगदानासाठी डाॅ.घाणेकर यांना सन्मानित केले असल्याचे सौ.वसुधा नाईक यांनी सांगितले.याप्रसंगी श्रीमती विद्या नाईक, हेमंत फुले, वैशाली फुले आदि मान्यवर उपस्थित होते. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच इंटरनॅशनल सुपरस्टार ॲवाॅर्डही प्राप्त झाल्याबद्दल सौ.वसुधा नाईक यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भारतीय अध्यात्माविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

नाशिकची साप्ताहिक मीटिंग हुतात्मा स्मारक येथे पार पडली

आज ५/११/२४ रोजी fescom नाशिकची साप्ताहिक मीटिंग मा.अशोक होळकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी हुतात्मा स्मारक येथे सविता बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेचे सचिव धनंजय चतुर यांनी सर्व पदाधिकारी यांना दिवाळी फराळ देऊन, सर्वांचा सत्कार केला.

त्या वेळी नानासो होळकर,मनोहर वाघ,क्षीरसागर तात्या, कातकाडे सर,धनंजय चतुर,प्रकाश महाजन, दादासो तिडके,विलासजी शिऊर्कर,शिवाजी होळकर, बेळे सो,लीलाधर बेंद्रे, भाऊसो सोनवणे,धुमाळ सो,मधुकर रकिबे सुनील साळवी,दिनकर कुलकर्णी , वसंतराव जाधव हजर होते. मां.होळकर नाना यांनी मार्गदर्शन केले v सविता बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेला शुभेछा दिल्या.शेवटी धनंजय चतुर यांनी आभार मानले.

कांदिवली मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे मा.महादेवजी जानकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

भारत कवितके मुंबई कांदिवली, पश्चिम

मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कांदिवली पश्चिम येथील चारकोप विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री.सौरभ शुक्ला जी यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेव जी जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कांदिवली पश्चिम येथील इंद्रा नगर,तयबा मस्जिद,न्यू लिंक रोड,जुनी लालजी पाडा पोलिस चौकीच्या शेजारी निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी माननीय महादेव जी जानकर यांनी कार्यालयाची रिबीन कापून कार्यालयाचे उद्घाटन करुन उमेदवार श्री.सौरभ शुक्ला जी यांच्या माननीय महादेव जी जानकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना निवडणूकीत जास्ती जास्त मतदारांना शिट्टी या चिन्हावर मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे.व आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सौरभ शुक्ला जी यांना निवडून आणावे,या कार्यालय उद्घाटन प्रसंगी कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता, राष्ट्रीय समाज पक्ष चारकोप कांदिवली विधानसभा अध्यक्ष भारत कवितके, महाराष्ट्र सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई उपाध्यक्ष रासपा रामधारी पाल, अनिल यादव, सरिता तिवारी, रामसिंग, गुलाब यादव, सुधाकर तिवारी, विजय शुक्ला, अरविंद सिंग,माता प्रसाद तिवारी व इतर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सेवा हो धन हमारा। – आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

राष्ट्रसंताच्या या भजनाप्रमाणे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तालुक्यातील गुरूदेवसेवामंडळाशी एकनिष्ठ असलेल्या सातेगावातील दास संघटनेने दिवाळी निमित्त आदिवासी बांधवांना व लहान मुलांना नवीन स्वेटर, खेळणी, शालेपयोगी वस्तू, कपडे महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.

मेळघाट भाग म्हटला की आर्थिक दृष्ट्या मागासलेला भाग. आणि त्यातच दिवाळी ची सुरुवात म्हणजे थंडी ची सुरुवात. मेळघाट भागातील अत्यंत गरिब कुटुंबांतील मुलांना कपडे नसतात त्यातच थंडीचा मारा. हे सर्व पाहून यावर्षी. सेवा हो धन हमारा। – आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी.

हे सेवेचे १४ वे वर्ष आहे. दरवर्षी दास संघटना हा उपक्रम राबवीत असते, तसेच दहा दिवस अगोदरच पूर्ण नियोजन तयार करावे लागते, यावेळी खूप लोकांनी पैश्यांच्या रूपयांत मदत केली. व त्या पैशांनी नविन वस्तू खरेदी केल्या.व त्या वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी दास संघटनेचे संस्थापक श्री. गजानन मु. काळे, श्री. नितीन टाक सर, राष्ट्रसंत मिडियाचे संचालक नकुल पालखडे, मोहित ढोले, सिद्धांत ढोले, गोपाल सगणे, अतुल सोनोने, विनोद इंगोले, आदि उपस्थित होते. निर्णय घेतला. त्या अनुषंगाने लहान मुलांना ५० स्वेटर, खेळणी, शालेपयोगी वस्तू, व महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. हे सेवेचे १४ वे वर्ष आहे. दरवर्षी दास संघटना हा उपक्रम राबवीत असते, तसेच दहा दिवस अगोदरच पूर्ण नियोजन तयार करावे लागते, यावेळी खूप लोकांनी पैश्यांच्या रूपयांत मदत केली. व त्या पैशांनी नविन वस्तू खरेदी केल्या.व त्या वाटप करण्यात आल्या.

या प्रसंगी दास संघटनेचे संस्थापक श्री. गजानन मु. काळे, श्री. नितीन टाक सर, राष्ट्रसंत मिडियाचे संचालक नकुल पालखडे, मोहित ढोले, सिद्धांत ढोले, गोपाल सगणे, अतुल सोनोने, विनोद इंगोले, आदि उपस्थित होते. दास संघटनेने मेळघाट दिपोत्सव २०२४ च्या निमित्ताने स्वेटर वाटण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने लहान मुलांना ५० स्वेटर, खेळणी, शालेपयोगी वस्तू, व महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. हे सेवेचे १४ वे वर्ष आहे. दरवर्षी दास संघटना हा उपक्रम राबवीत असते, तसेच दहा दिवस अगोदरच पूर्ण नियोजन तयार करावे लागते, यावेळी खूप लोकांनी पैश्यांच्या रूपयांत मदत केली. व त्या पैशांनी नविन वस्तू खरेदी केल्या.व त्या वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी दास संघटनेचे संस्थापक श्री. गजानन मु. काळे, श्री. नितीन टाक सर, राष्ट्रसंत मिडियाचे संचालक नकुल पालखडे, मोहित ढोले, सिद्धांत ढोले, गोपाल सगणे, अतुल सोनोने, विनोद इंगोले, आदि उपस्थित होते.

श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार,कालांतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

अकोला(दि.४): बीड जिल्ह्यातील ‘श्रीप्रभूप्रसाद मासिक’ आणि ‘कालांतर’ दिनदर्शिका समूहाच्या वतीने नुकताच ‘भाऊबीज’ दीपोत्सवाच्या पावन पर्वावर श्री जगद्गुरु पलसिध्द महास्वामीजी धर्मपीठ,साखरखेर्डा येथे शिवाचार्यरत्न,वेदांताचार्य,सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी,ष.ब्र.१०८ श्री सद्गुरु सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते,भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली सोसे तसेच श्रीप्रभूप्रसाद समूहाचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कालांतर-२०२५’ या वीरशैव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि ‘श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४’ अतिशय उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

यावेळी प्रारंभी दीपप्रज्वलनाने व स्वागत मंत्रोपचाराने कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘कालांतर’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि श्रीप्रभूप्रसाद समूह,बीडच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणार्‍या श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक तपोनिधी पुरस्कार-२०२४ हा सन्मान वेदांताचार्य सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांना, श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक पांथस्त पुरस्कार-२०२४ हा सन्मान श्री ष.ब्र.१०८ श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांना,तर श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४ हा सन्मान भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली आतिश सोसे यांना शाल,श्रीफळ,मानपत्र, स्मृतिचिन्ह व ‘कालांतर’दिनदर्शिका व ग्रंथ भेट देऊन आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी पाहुण्यांची यथोचित भाषणे झाली.तेव्हा सद्गुरु श्री सिध्दचैतन्य स्वामीजी यांनी साखरखेर्डा धर्मपीठाला असलेला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास,तथा या प्राचीन,पुरातण व पवित्र वास्तूची माहिती विषद केली.नामदार प्रतापराव जाधव यांनी या पावन भूमीचे व गुरुमाऊलीचे दीपावलीच्या प्रसंगी होणारे दर्शन सद्भाग्य असल्याचे सांगून या धर्मपीठाकरिता मी आजवर व यापुढेही सतत प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘कालांतर’ही दहा कर्तबगार बहिणींना अर्पण केलेली दिनदर्शिका निश्चितच स्तुत्य उपक्रम असून प्रख्यात लेखिका व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या भगिनी प्रा.दीपालीताई सोसे यांच्यावरील परिचयात्मक लेख वाचून त्यांच्या कार्याने प्रभावित झालो असून श्रीप्रभूप्रसादचे संस्थापक परमेश्वर लांडगे यांनी दहा ताईंना प्रातिनिधिक स्वरूपात दिलेली ही भाऊबीजेची भेट संस्मरणीय व कौतुकास्पद असल्याची भावना याप्रसंगी नामदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.यावेळी ज्येष्ठ लेखक सुरेश सोसे,प्रा.अशोक सारडा,संतोष गाडेकर,कमलकिशोर लढ्ढा,विलास लांडगे,बालकलाकार अद्विक सोसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शब्दस्वरूप साहित्य मंच येथील राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच येथील श्री. श्रुंगेरी देवी चौथे राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री. श्रुंगेरी देवी काव्योत्सव वर्ष चौथे वार सोमवार दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) सुत्रसंचालन करणार आहेत, छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात मा. सुनिल डोके, (ग्रामीण कवी, लेखक, समीक्षक) संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत ,उद्घाटक : मा. रज्जाक शेख (कवी, गझलकार, लेखक) विशेष अतिथी म्हणून मा. अशोक गायकवाड (प्रसिद्ध कवी शेतीमातीकार), मा. प्रकाश पाठक (कवी, लेखक), मा.सौ.निशा महेश कापडे (कवयित्री, लेखिका, प्राथमिक पदवीधर शिक्षिका), मा.विजयकुमार पांचाळ (कवी, लेखक, गुणवंत कामगार) अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.पूजा राजेश घोंगडे व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी जाहीर केले.

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंचाच्या वतीने सौ. पूजा घोंगडे यांचे बंधु ज्ञानेश्वर काळे यांच्या ग्रामदेवतेच्या नावाने श्री. श्रुंगेरी देवी दीपावली विशेषाकांचे प्रकाशना या संस्थेच्या माध्यामातून सर्व मान्यवरांच्या हसेत केले जाणार आहे अशी माहिती संस्थेच्या संस्थापंक अध्यक्षा मा. सौ. पूजा राजेश घोंगडे व व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे, आता देखील छत्रपती संभाजीनगर येथील होणा-या चौथ्या राज्यस्तरीय कवी संमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे.