पंचायत समिति जुन्नर अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना निवडणूक उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेचे सर्व उपक्रम व त्याबद्दलची कार्यवाही बाबत ग्रामसेवकाना सूचना देताना पंचायत समिती जुन्नरच्या स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी सविस्तर चर्चा करून व योग्य ते मार्गदर्शन करत मतदार जनजागृती अंतर्गत मतदार प्रतिज्ञा, रांगोळी ,गृहभेटीद्वारे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदान करण्याविषयी जनजागृती करणे. मतदान केंद्रावरील सोयी सुविधांची माहिती देणे. प्रभात फेरी, रॅली इत्यादी उपक्रम कसे राबवावे यासंदर्भात माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडावी असे आवाहन करणायात आले.
तसेच ग्रामपंचायत अंतर्गत know your polling station या पद्धतीने सर्वांना मतदान केंद्रांची माहिती देणे अशा सूचनाही ग्रामसेवकाना देण्यात आल्या. सर्व विभाग हे काम करणार आहेत. यामध्ये एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग ,आरोग्य विभाग, बचत गट सर्वांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
Leave a Reply