भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष भारती महाडिक यांना नुकताच डाॅ.मधुसूदन घाणेकर विश्वहास्य पीठातर्फे , पहिल्या जागतिक हास्य परिषदेचे अध्यक्ष(2004) सबकुछ सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. भारती महाडिक या सतत हसतमुख राहून राष्ट्रहित आणि आत्मनिर्भर भारत या अंतिम उद्दिष्टाचे भान ठेवून अविरतपणे कार्यरत असतात” असे गौरवोद्गार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी उपाधि प्रधान करताना काढले.
“हसण्यासाठी उपजत मोठे मन लागते, सकारात्मकता दुर्दम्य आशावाद त्यातुन साध्य होऊन संपूर्ण आयुष्यच सार्थक
ठरल्याचे आत्मिक समाधान मिळते” असे हास्ययोगाचे महत्व सांगुन विरोधाभासातून हास्य कसे खुलते याची मजेशिर व्यवहारिक उदाहरणे देऊन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मधुरंग इंटरनॅशनल फिल्मच्या निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले.
“भारतीय जनता पार्टी आणि उच्च आदर्शवादी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन कायम घडत असल्यानेच मी समाज विकासासाठी थोडेफार योगदान करु शकते” या शब्दात सत्काराला उत्तर देताना भारती महाडिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मधुरंगच्या कार्यध्यक्ष मंदाताई नाईक, आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या शीळवादक अनघा सावनूर आगाशे, वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष वसुधा नाईक, काव्यशिल्प संस्थेच्या माजी अध्यक्ष अपर्णा आंबेडकर, महिला सन्मान संस्थेच्या सचिव दीपाराणी गोसावी, युवा विश्व च्या सचिव सुचेता प्रभुदेसाई यांचीही भाषणे झाली.
भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग यांनी समारोप केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संमोहन तज्ञ सुभाष भागवत यांनी आभार मानले. युवा कार्यकर्त्या माधुरी भागवत यांनी आभार मानले. याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाचा विश्वविक्रमी 598 वा अंक प्रकाशित करण्यात आला.
Leave a Reply