भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम
कांदिवली पश्चिम येथील बजरंग सोसायटी जवळ, महावीर शाळे शेजारी असलेल्या मैदानात श्री.बजरंग एस,आर,ए, सोसायटी, श्री.साईकृपा एस.आर.ए.सोसायटी, आणि जनता कल्याण कारी एस.आर.ए.सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागातील उत्तर भारतीय महिला भगिनी करिता छटपूजा चे आयोजन करण्यात आले होते.गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सूर्यास्ता वेळी पाण्यात उभे राहून महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात छटपूजा केली.
या ठिकाणी पाण्याचा मोठा कृत्रिम तलाव बनविण्यात आला होता.मुलांच्या कल्याणासाठी, प्रगती साठी,व ज्यांना संतान नाही ते यावेळी नवस बोलतात,व काही महिला भगिनीं नवस पूर्ण करण्यासाठी छटपूजा करतात.आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या नंतर जल अर्ज करुन छटपूजा पूर्ण करतात,व उपवास सोडतात.कृत्रिम तलावाच्या भोवती जागोजागी ऊस उभा करून पणत्या लावून महिला भगिनीं पाण्यात उभ्या राहून छटपूजा करत होत्या.धार्मिक गाणी गायली जात होती,या प्रसंगी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कांदिवली पोलिस ठाणे येथून पोलिस अधिकारी व पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या विभागातील अनेक मान्यवर पुरुष व महिला उपस्थित होते.बजरंग सोसायटी चे चेअरमन रविंद्र राऊत यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे मुख्य प्रवर्तक विजय पाल जी, यांचा सत्कार करुन स्वागत केले.तसेच ललन राव यांनी श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव भारत कवितके यांचा सत्कार करुन स्वागत केले.या प्रसंगी रविंद्र राऊळ,ललन राव,टिंकू खान, विजय पाल, भारत कवितके, कुमार सुगावे, निजामुद्दीन, राजेश यादव, प्रविण पाल, प्रभात पाल,सह तिन्ही सोसायटी चे पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.छटपूजा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील पुरुष व विशेषतः महिला भगिनीं परिश्रम घेतले.