Engage Your Visitors!

युवा स्वयंरोजगारासाठी समाज विकास संस्थेची तपश्चर्या

येथील समाज विकास संस्थेच्या वतीने युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी निरंतर कार्य केले जाते वात्सल्या बालगृहाच्या माध्यमातून मुलांचं निवास भोजन शिक्षण आणि भविष्यकाळातील स्वयंरोजगारासाठी विशेष कार्य करत असताना. युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून नर्सिंग कॉलेज सुरू करून उमरगा लोहारा तालुक्यातील व परिसरातील युवकाना नर्सिंगच्या GDA माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जात आहे.

 तसेच ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या युवकांना ड्रायव्हिंग प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना लायसन मिळऊन दिले जाते.आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरणा दिली जाते. प्रशिक्षणासाठी होणारा खर्च समाज विकास संस्थां आणि वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत केला जातो. हा अनोखा प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील धाराराशिव कळंब,उमरगा आणि लोहारा या चार तालुक्यातून राबवला जातो.सध्या 25 युवकांची एक बॅच पूर्ण झाली असून त्यांना कायमस्वरूपी लायसन मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर नवीन 25 युवकांची बॅच सध्या प्रशिक्षण घेत आहे. हा अनोखा प्रयोग स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवला जात आहे.याची धन्यता पत्रकारांशी बोलताना समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केली.

 या प्रशिक्षण कार्यासाठी कुलकर्णी ड्राइविंग स्कूल धाराशिव उमरगा यांची मदत घेतली जात आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी, समाज विकास संस्थेच्या व्यवस्थापिका विद्याताई वाघ,अजित पाटील, गौरव मस्के, वात्सल्य ट्रस्ट मुंबई हे विशेष परिश्रम घेत आहेत.

मुक्ताई सुतार माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुक्ताई सुतार माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी भरेकर एच पी गॅस एजन्सीद्वारे विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. एजन्सीच्या सदस्या सौ.हेमा ढोकळे यांनी आपत्ती म्हणजे काय? घरामध्ये गॅस, सिलेंडर आल्यावर एक जबाबदार नागरिक म्हणून सिलेंडरचे वजन, एक्सपायरी डेट, लिकेज कसे तपासून पहावे हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.यावेळी विद्यालयातील मुख्या.मीना आंधळे,वरिष्ठ शिक्षक डॉ. श्री शांताराम डफळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सौ. शितल जगताप यांनी केले.

खराडी येथील इंग्रजी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मतदान अभियानचे आयोजन       

 प्रतिनिधी – राजेंद्रकुमार शेळके         

               

नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने आज विद्यालयात पालक सभा घेऊन मतदानाचे महत्त्व तर पटवून सांगितले पण त्याचबरोबर मतदानाची प्रतिज्ञा ही घेण्यात आली. यामध्ये माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा खांडरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ . अरुणा गुळुंजकर तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक सहभागी झाले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती वर आधारित निरनिराळी घोषवाक्ये तयार केली . विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजनही याप्रसंगी करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी निरनिराळ्या घोषणा देऊन मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले .

या प्रभात फेरीचा मार्ग माध्यमिक विभागाचा विद्यालय, झेन्सार आयटी पार्क, गुलमोहर सोसायटी, चौधरी वस्ती, श्री हॉस्पिटल व परिसर, रिलायन्स मार्ट व परिसर ते विद्यालय असा होता तर प्राथमिक विभागाचा गुलमोहर, सोसायटी , झेन्सार रक्षक नगर फेज वन ते विद्यालय असा होता .यामध्ये विद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापिका , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती तर निर्माण होईलच पण यातून नक्कीच त्यांना प्रोत्साहन ही मिळाले.

 

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने मतदान जागृतीसाठी मॅरॅथॉन

पुणे प्रतिनिधी – राजेंद्रकुमार शेळके

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने २१३ हडपसर विधानसभा मतदारसंघ मतदार जागरूकता अभियान अंतर्गत 213 हडपसर विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरॅथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवा या दृष्टीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आईवडील, नातेवाईक यांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र, मतदान जागृतीसाठी मॅरेथॉन, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मतदानाचे आवाहन, मतदान जागृतीसाठी पायी रॅली, घरोघरी भेटी देऊन मतदानासाठी प्रोत्साहन, मतदान कसे करावे यासाठी मार्गदर्शन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

213 हडपसर स्वीप टीम समन्व्यक अमरदीप मगदूम, सहाय्यक संजीव परदेशी, पंकज पालाकुडतेवार, प्रशांत कोळेकर यांच्या उपस्थित या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. प्रा. अनिल दाहोत्रे यांनी मतदान शपथीचे वाचन केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, कॅप्टन डॉ. धीरजकुमार देशमुख, प्रा. प्रीतम ओव्हाळ, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समनव्यक डॉ. सविता कुलकर्णी प्रा. अनिल दाहोत्रे, प्रा. आशा माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.

कवी, साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” प्रदान

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा सलग तीन वेळा काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था शाखा शिरूर अनंतपाळ लातूर येथे पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी भारत सरकार यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांनी साहित्यिक पुरस्काराची हैट्रीक मिळवून साहित्यिक मेजवानीचा स्वाद घेतला.

राष्ट्रीय शिक्षक दिना निमित्त आयोजित श्री अनंतपाळ लातूर राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ, लातूर येथे येथे दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” २०२४ यांना संमेलनाध्यक्ष मा. अॅड.विजयकुमार कस्तुरे, आयोजक श्री. गोविंद श्रीमंगल, सौ. सरोजा गायकवाड, यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी डॉ. डी.व्ही. खरात, डॉ. बबनराव महामुने, श्री. मधुकर हुजरे, श्री. अशोक मोहिते, श्री. माणिकराव गोडसे, ह.भ.प. सौ.चिवरकर, सौ. राणी धनवे, पोलीस निरीक्षक राणी चोपडे, सौ. ज्योती देशमुख, सौ. वैशाली लांजेवार, समिंदर शिंदे, अलका सपकाळ, इत्यादी सर्व कवी व कवयित्री उपस्थित होते.

या अगोदर अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी भारत सरकार यांना संस्थेने पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार २०२२ रोजी दिला होता, दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट वकील पुरस्कार २०२३ चा पुरस्कार दिला होता.

त्यानंतर यंदाचा त्यांची साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेता दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी, भारत सरकार यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” २०२४ यांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच कवितेच्या बागेत बालकविता संग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष मा. अॅड.विजयकुमार कस्तुरे, आयोजक श्री. गोविंद श्रीमंगल, सौ. सरोजा गायकवाड व सर्व निमंत्रित कवी कवयित्रीच्या उपस्थितीत संपन्न झाला, कवितेच्या बागेत या बालकविता संग्रहात कवी, लेखक अॅड.उमाकांत आदमाने, पुणे यांच्या अनुक्रमे दोन कविता प्रसारीत झाल्या एक मनी माऊ, दुसरी कविता चिमणी या विषयावर प्रसारित झाली आहे त्याबद्दल संपादक श्री. गोविंद श्रीमंगल, व सहसंपादक कवयित्री पुजा माळी यांना धन्यवाद देतो.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या बोलक्या बाहुल्याने चिमुकल्यांशी मारल्या गप्पा

खास बालांसाठी नुकताच,डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा विश्वविक्रमी बे दुणे चकली हा एकपात्री धमाल विनोदी कार्यक्रम आयोजित केला होता.अध्यक्ष.स्थानी संस्थापक अध्यक्ष अभिनेत्री प्रिया दामले होत्या.सदर कार्यक्रम अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर – संतनगर येथे झाला.कार्यक्रमाचे संयोजन बाल सचिव अजया मुळीक हीने केले.युवा कार्यकर्ते महेश पवार यांनी प्रास्ताविक केले.

नीलेश पवार याने आभार मानले.अजयाने बालांना चाॅकलेटस दिली.याप्रसंगी कवी विजय सातपुते, माधवी कुंटे, वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे डाॅ.मधुसूदन घाणेकर स्वतःचा छान मिश्किल बाहुला झाले आणि स्वतःच बाहुल्याला काही प्रश्न विचारले आणि बाहुल्याने लहान खोडकर मुलासारखी मजेशीर उत्तरं दिली.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या या डबल.रोल साठी बाल चमुंनी भरभरुन मनमुराद हसून दाद दिली. विनोदी पाढे , गाणारा मुलगा , थापा मारणारे मित्र, विमानातली फेरी, मनाचे श्लोक म्हणणारे कलाकार , अर्जूना बाण मार वाक्य म्हणणारी खेड्यातील कलाकार मंडळी, बोलके प्राणी,बोलके पक्षी ..अशा विविधतेने नटलेल्या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा हा चकलीचा कार्यक्रम म्हणजे बाल नमुंना दिवाळीचा खास मनोरंजनाचा खुसखुशीत फराळच होता. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘ बे दुणे चकली’ ह्या एकपात्री. कार्यक्रमाचा झंजावती 22,999 वा प्रयोग होता.

संगीत, शायरी आणि संवाद यांची एक उत्स्फूर्त मैफिल

प्राधिकरण -येथे ग दि माडगूळकर नाट्यगृह सुरू झाल्यानंतर काव्य, नाट्य, नृत्य, एकांकिका सतत सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागली. तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध झाले.

ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी येथे नुकत्याच झालेल्या माहौल ह्या कार्यक्रमात संगीत, शायरी, संवाद यांची उत्स्फूर्त मैफिल दिनांक १३ नोव्हेंबर ला संपन्न झाली.अभिनेता तेजस बर्वे तसेच अभिनेते डॉ. संजीवकुमार हे देखील यावेळी उपस्थित होते.

” माहौल” संगीत शायरी आणि संवाद यांची एक उत्स्फूर्त मैफिल ही संकल्पना चिंचवड चे तरूण कलाकार सौरभ चव्हाण यांची असून गायक पलाश बोरकर, सौरभ चव्हाण यांना गिटार आणि वोकल्स ची साथ गणेश शीलवंत तर तबला आणि क्लॅपबॉक्स प्रसाद गुरव यांनी दिली. संकल्पनेतील संवाद केतकी चव्हाण यांनी खुलविले.

“सय्योनी”, “छोड आयें हम वों गलियाँ”, “लागा चुनरी मे दांग”, “मेरे रश्के कमर”, “मेरे मेहेबूब कयामत होगी”, “जो तुम मेरे हो” आदि गीतांना रसिकांची पसंती मिळाली. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, निगडी मधील संगीत रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

 

HELPING FOUNDATION NGO सामाजिक संस्थे तर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांची प्राथमिक आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न 

HELPING FOUNDATION NGO सामाजिक संस्थे तर्फे आयोजित दिवाळी निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांची प्राथमिक आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आनंदात पार पडले,ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक क्षेत्रा मध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रा मध्ये अग्रेसर पणे कार्य करत आहे, नवनविन उपक्रम राबून गोर गरीब गरजू लोकांना व विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम हि संस्था करत आहे, म्हणून या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्त सामजिक उपक्रम घेण्यात आला होता दरवर्षी गोर गरीब गरजू निराधार लोकांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी या उद्देशाने सुख शांती वृध्दाश्रम येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये 35 वृद्धांची मोफत तपासणी करण्यात आली, डॉ अनिकेत गोंडाणे यांच्या मार्गर्शनाखाली हे शिबिर पार पडले तसेच गरजेनुसार त्यांना मोफत औषद देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अनिकेत गोंडाने व तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुख शांती वृध्दाश्रम चे संचालिका सौ, रेखाताई सुमते तसेच प्रोफेसर धीरज बोने सर उपस्थित होते व संस्थे चे संस्थापक आनंद बागडे व सहसंस्थापक अक्षय जवंजाळ अध्यक्ष सुगत भोंगळे , अक्षय धानोरकर सर,जूनैद मेमोन, आरती मरापे, आकांशा तेंभरे पायल पवार सपना मॅडम व संस्थेचे सर्व मेंबर उपस्थित होते.

शाळेच्या अमृत महोत्सवनिमित्त मुधोजी बालक व प्राथमिक मंदिर फलटण यास वसुधा नाईक यांची सदिच्छा भेट

दि. ११/११/२०२४ रोजी वसुधा वैभव नाईक यांनी फलटण येथील मुधोजी बालक व प्राथमिक मंदिरास भेट दिली.स्वतः त्या शाळेमध्ये १९७० ते १९७५ या पाच वर्षात त्या शिकत होत्या.जवळजवळ ५० वर्षाने त्या शाळेला भेट देत होत्या. त्यांच्या स्वतःच्या नाती सोनाक्षी,समीक्षा आणि त्रिशिका यांना त्यांची शाळा दाखवण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. तिथे समजलं की शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. तेथील बाल वर्गातील मुलांना खाऊ वाटण्यात आला.

बाल वर्गाला तिथे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पहिली ते चौथी मध्ये १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर एक आगळा वेगळा आनंद मिळाला. नयनातून अश्रू वाहू लागले. हे आनंदी अश्रू शाळेने कर्म दिले त्या शाळेसाठी होते. शिक्षकांसाठी होते. बाजारे गुरुजींसाठी होते.बालक मंदिराच्या मुख्या.रजपूत मॅडम यांनी पूर्ण शाळेची माहिती दिली. जुनी शाळा,नवी बिल्डिंग यातला फरक सांगितला. वसुधा व त्यांच्या नातींचे स्वागत खूप छान केले. प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना खाऊ देण्यासाठी त्यांनी मदत केली. शाळेचा सर्व स्टाफ हेल्पफुल आहे.वीर मॅडम यांचे सहकार्य छान लाभले. सर्व स्टाफ मदतीसाठी पुढे आहे.

मधोजी प्राथ. विभागाचे मुख्या.शिंदे सर यांच्याशी फोनवर बोलणे झाले. सर देखील हेल्पिंग नेचरचे छान वाटले. सुनील पाडवी यांनी सहकार्य केले. बाकी शिक्षक स्टाफ सगळा उत्तम आहे. वसुधा यांनी आपला वर्ग कोणता होता हे आपल्या नातींना दाखवले व त्या वर्गातल्या त्याच बेंचवर त्यांनी बसून छान फोटोंचा आनंद घेतला.

दिवाळी सुट्टीनंतर शाळेचा आज पहिला दिवस होता. तरी देखील बरेच विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. शाळेचा पहिला दिवस, अमृत महोत्सव आणि त्यात लहान मुलं बघितली की वसुधाला आनंद होतो. वसुधा यांनी नातींच्या हातून मुलांना खाऊ वाटला.मुले खूष, शिक्षक खूष, वसुधा खूष….

रजपूत मॅडमने वसुधा यांचा बायोडाटा घेतला. या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून निश्चितच आपल्याला या शाळेत पुन्हा मानाने बोलवले जाईल. असे त्यांनी आश्वासन दिले. शाळेत ठेवले पहिले पाऊल जेव्हा नयनांच्या कडा पाणावल्या तेव्हा वसुधाचे कर्मभूमीला लागले पाय,

आनंदाचा झरा ती फलटणातून घेऊन जाय

मनी आस तिला बालांना भेटण्याची

स्वतःच्याच शाळेत मन रमवण्याची

नातींना घेऊन आली शाळा दाखवायला

शाळेचे वातावरण पाहून मन लागले बोलायला

जा तुझ्या वर्गात जाऊन बस बाळा

हीच तर तुझी होती प्राथमिक शाळा

जीवन कसे जगायचे हा धडा शिकवला

आता वसुधाने समाजात पाय घट्ट रोवला

शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे आज

वसुधाच्या डोक्यावर ज्ञानाचा चढतोय सुरेख साज 

हा दिवस खूप खास वसुधासाठी

कार्य उत्तम चालू आहे तिथे समाजासाठी

 

 

नाशिक मध्ये कविवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा व्दारा आयोजित कविता कार्यशाळा संपन्न.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक मधील कवी कट्टा व्दारा कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, सिडको,राजे संभाजी स्टेडियम शेजारी,मानव सेवा केंद्र या ठिकाणी कविता कार्यशाळा संपन्न झाली.सुरवातीला कविवर्य नारायण सुर्वे यांच्या फोटो ला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या कविता कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील अनेक कवी कवयित्री मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कविता म्हणजे काय? कविता कशी असावी? कवितेचे सादरीकरण कसे असावे? या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी कविता कार्यशाळेचे मान्यवर मार्गदर्शक रविंद्र मालुंजकर यांनी सांगितले की ” कवी ची कविता ही बोलकी असलीं पाहिजे, कवींच्या अंगी विनयशीलता,नम्र पणा हवा, कवितेतून कविंनी कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करावा,” या कार्यशाळेचे दुसरे मान्यवर मार्गदर्शक कवी लेखक समीक्षक विवेक उगलमुगले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,” कविला स्वतः ची एक वेगळीच दृष्टी असावी लागते,

आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग व्यापते कविता, आयुष्याचा शोध घेते कविता, सादरीकरण सर्वांना समजेल असे असावे, ओढून ताणून केलेले नसावे,अवघड शब्द टाळा, स्पष्ट, सुंदर, सत्यता कविंनी कवितेतून मांडावी,आपली कविता इतरांना ओळखता आली पाहिजे,स्व अनुभवातून कविता निर्माण झाली पाहिजे,कवीने माणसे वाचावित, स्वतः ला वाचावे,व इतर लिखाण सातत्याने वाचावे, व्यासंग, निरीक्षण शक्ती,आशय प्रतिभा या गोष्टी कवी साठी आवश्यक आहे.संत कविता कडे दुर्लक्ष करू नये,संतांचा अभ्यास करून कविता कराव्यात,कवितेचा आशय व तोल कविंनी सांभाळावा, स्वतः च्या अनुभवाशी प्रमाणिक राहून कविता करावी, कवी ची कविता रसिकांना आवडते हा कवी साठी मोठा पुरस्कार आहे,

मानवी मुल्य उचलून धरण्यासाठी कवीने लिहिले पाहिजे, साधेपणात ही सौंदर्य असते,” या कविता कार्यशाळेत सर्व कविना” जगणे” या शब्दावर पाच मिनिटांत कवीता लिहून द्यावी असे सूत्र संचालक बाळासाहेब गिरी यांनी असा एक प्रयोग केला,त्यास सर्वांनी प्रतिसाद दिला, कवीवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा चे रविकांत शार्दुल यांनी आपल्या प्रास्ताविकात कवी कट्टा च्या कार्याचा आढावा घेऊन आलेल्या सर्वांचे आभार मानले.या कार्यशाळेत मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, कवी, लेखक, गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांना ही प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कवीना या कविता कार्यशाळेत अतिशय बहुमुल्य असे मार्गदर्शन लाभल्याने प्रत्येकाने रविकांत शार्दुल यांचे आभार मानले, सहभागी सर्व कवी, कवयित्री यांना प्रमाणपत्र देण्यात आली.