लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा सलग तीन वेळा काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था शाखा शिरूर अनंतपाळ लातूर येथे पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी भारत सरकार यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांनी साहित्यिक हैट्रीक मिळवून साहित्यिक मेजवानीचा स्वाद घेतला, राष्ट्रीय शिक्षक दिना निमित्त आयोजित श्री अनंतपाळ लातूर राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ, लातूर येथे येथे दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” २०२४ यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या अगोदर अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी भारत सरकार यांना संस्थेने पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार २०२२ रोजी दिला होता, दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट वकील पुरस्कार २०२३ चा पुरस्कार दिला होता, त्यानंतर यंदाचा त्यांची साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेता दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी, भारत सरकार यांना “राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” २०२४ यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे श्री अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलनाचे आयोजक श्री. गोविंद श्रीमंगल यांनी जाहीर केले.
अॅड.उमाकांत मधुकर आदमाने, नोटरी, भारत सरकार सध्या शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालयात पुणे येथे वकिली व्यवसाया बरोबरच नोटरीचे काम करतात त्यांची आणखी एक नवी ओळख म्हणजे सुंदर कवी, लेखक, साहित्यीक आणि उत्तम निवेदक आहेत. त्यांनी आगामी काळात खुप सुंदर विषयावर कविता सादर करून कवी रसिकांची मने जिंकली, अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी, भारत सरकार वकिली व्यवसाया बरोबरच नोटरी व्यवसाय देखील प्रामाणिक पणे करतात. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे, आता देखील श्री अनंतपाळ, लातूर येथील होणा-या तिसऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी कवी संमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे.