Engage Your Visitors!

डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा “ध्यास ” दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न*

 डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा “ध्यास ” दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा 24.11.2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व ईश्वर स्मरणाने झाला. संपादिका/सूत्र संचालिका शितल दिवेकर यांनी प्रमुख पाहुणे श्री नागेश हुलवळे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून सर्वांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुण्यांना व संस्थेच्या पदाधिकार्यानां व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती केली.

सचिवांनी पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.अध्यक्ष सतिश कुलकर्णी यांनी अंकासंबंधित मेहनतीबद्दल सांगितले व संपादिकेचे कौतुक केले. दिवेकर मॅडमनी प्रमुख पाहुण्यांची ओळख व त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती दिली. मुखपृष्ठाच्या संकल्पनेला श्री जोशी,श्री कोर्डे व त्या स्वतः यांनी खूप शोध घेऊन मुर्तरूपात घडवले.तो प्रवास व त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

अंकातले सर्व लेखकवर्गाचे अभिनंदन केले व आभार मानले. मग प्रमुख पाहुण्यांना त्यांचे विचार व्यक्त करायची विनंती केली. श्री नागेशजींनी अंकाची वैशिष्ट्ये इतकी सविस्तर सांगितली की अंक वाचनाचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी एका दिवसाच्या अल्प अवधीत केलेली अंकाची सुंदर मिमांसा कौतुकास्पद आहे. प्रत्येक लेखाबद्दलचे विचार त्यांनी मांडले.ते पुढे बोलले की मुखपृष्ठ खूप रेखीव व ठळक आहे. त्यात समाविष्ट शिलालेख, माऊली, चक्रधर स्वामी, गर्जतो मराठी, संस्थेचा लोगो व भरारी घेत असलेले तीन पक्षी ह्या सर्वांची जर व्याख्या केली तर एक पूर्ण ग्रंथाची रचना होऊ शकते.भरारी घेणारे पक्षी दर्शवतात वैचारिक स्वतंत्रता आणि त्याचे उत्तम उदाहरण आहे हा ध्यास अंक.

मग त्यांनी अंकात प्रकाशित आपली कविता प्रस्तुत केली.सर्व लेखकांचे कौतुक, अति उत्तम संपादन व संस्थेचे आभार व्यक्त करुन त्यांनी आपले वक्तव्य संपवले. सचिव गीता रीठाल यांनी संस्थेची स्थापना,आता पर्यंतची वाटचाल, उद्दिष्टे व पुढच्या उपक्रम याबद्दल माहिती दिली. सर्व देणगीदारांचे आभार मानले.तसेच उपस्थित लोकांना संस्थेच्या पुढच्या प्रगतीसाठी देणगी देण्यासाठी आवाहन केले. त्यांनी सर्व लेखक वर्ग, संपादिका व प्रमुख पाहुण्यांना धन्यवाद दिले.

सर्व उपस्थित लेखकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व लोकांना धन्यवाद देऊन संचालिकांनी कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन अति सुंदर झाले. त्याने कार्यक्रमाला एक आगळा वेगळा रंग दिला.

रेग्युलस ताऱ्याची भेट – भाग १

होय! रेग्युलस ताऱ्याला डॉ. मधुसूदन घाणेकर यांचे नाव दिले आहे.

आकुर्डी येथील एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर घाणेकर यांची ओळख झाली. त्यांच्या अवतीभोवती सर्व होते मलाही तिथे पोहोचायचे होते. मी त्यांचे नाव ऐकून होते मला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती आणि कार्यक्रमांमध्ये अचानक समोर डॉ.मधुसूदन घाणेकर दिसल्याबरोबर मी पहिली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सक्सेस झाला. मी त्यांना भेटले. त्यांचा नंबर मी घेतला. एक फोटो काढला.

तो काढलेला फोटो मी त्यांना फॉरवर्ड केला. फोटो त्यांना आवडला. आणि मग इथून आमची ओळख झाली. साहित्याची देवाण-घेवाण होऊ लागली. त्यांनी त्यांच्या काही ग्रुप मध्ये मला घेतले. आणि मग आपोआपच तेथील सखींच्या सुद्धा छान ओळखी होऊ लागल्या.

 डॉ. म्हणजे 64 कलांचा अधिपती जसा गणपती तसे हे प्रत्येक विषयात पारंगत आहेत. एक पात्री कार्यक्रम, शीळ वादन गायन, लघुपट निर्मिती, अनुबोधपट निर्मिती, साहित्यातील विविध प्रकार, हस्ताक्षर मनोविश्लेषण, ज्योतिष, इत्यादी क्षेत्रात ते खूप पुढे गेलेले आहेत. विशेष म्हणजे बायपास सर्जरीनंतर 300 विश्वविक्रम प्रयोग यावर आधारित झालेले आहेत.

विश्व जोडो अभियानांतर्गत मानवधर्म सर्वश्रेष्ठ धर्म, अन्नदान, रक्तदान,अवयव दान करा असे ते सांगतात. वंचितांना आणि दिव्यांग यांना मदतीचा हात द्या असे सांगतात. नुसते सांगतच नाही तर स्वतः कृती करतात आणि मग कृती करून दाखवतात मग बोलतात. ” आधी केले मग सांगीतले ” या उक्तीप्रमाणे त्यांची कृती असते.

मधमाशी वाचवा, पाणी वाचवा, वृक्ष लागवड करा, प्राण्यांवर पक्षांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा, विश्वची माझे घर याप्रमाणे विश्वावर प्रेम करा, हसा हसवा आणि जग जिंका, असे अनेक संदेश त्यांनी दिलेले आहेत.

विनामूल्य मनोरंजन करताना ते सही वरून सकारात्मक स्वभाव दर्शन सांगतात. किशोर कुमार,तलक मेहमूद,मोहम्मद रफी इत्यादी गायकांची गाणी ते उत्स्फूर्तपणे जातात. हुबेहूब गातात. निखळ हसणाऱ्या बालकांना वयोवृद्धांना ‘लाफ इंटरनॅशनल अवॉर्ड’ देऊन खुश करतात.

 लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये अगदी रममाण होतात. ‘बे दुणे चकली’,’ बाहुली कार्यक्रम’ फार रंगवून करतात. मुलांना हसायला लावतात.’ मिठू मिठू पोपट’ हे सर्टिफिकेट द्वारे त्यांना अवॉर्ड दिले जाते. मुले खुश होतात.

 यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांना मी स्वतः उपस्थित असल्याने त्यांची मनापासूनची तळमळ समजते. कोणाकडून एकही पैसा न घेता कार्यक्रम उठावदार करणे. हे डॉक्टर घाणेकरांचे वैशिष्ट्य आहे. स्वतःला कितीही बरे नसले तरी सुद्धा, समोर पब्लिक बघितले की त्यांना एक उत्स्फूर्त दाद मिळाल्याने ते खूप खुश होतात. आणि कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत चढते. त्यांच्या समवेत असणारा प्रत्येक व्यक्ती हा आनंदी आणि खुश राहतो. आणि आपल्याबरोबर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यामध्ये सामावून घेऊन त्याला पुढे नेण्यासाठी जे करावे लागते ती सर्व धडपड घाणेकर सर करत असतात.

घाणेकर सरांसारखा माणूस आजवर मी पाहिलेला नाही. निरपेक्ष भावनेनं स्वतःला कार्यात झोकून काम करणं, हा स्वभाव मनाला खूप भावणारा आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला ते समसमान संधी देतात. त्या संधीचा उपयोग करून घेईल तो छान पुढे जातो. आणि त्याच्या कामाचं कौतुक करण्यासाठी ते ट्रॉफी रूपात त्याचं कौतुक करतात. कोणाकडून एकही पैसा न घेता ट्रॉफींचे वाटप करतात. सर्वांना आनंद देण्याचा मनापासून त्यांचा प्रयत्न सफल होत असताना मी स्वतः पाहत आहे. अशा या रेग्युलस ताऱ्यास माझे शतशः प्रणाम!

    वसुधा वैभव नाईक 

    धनकवडी जिल्हा पुणे 

     मो. नं. 9823582116

अॅड.उमाकांत आदमाने यांना “युवा महाराष्ट्र आदर्श समाजरत्न भुषण पुरस्कार” प्रदान

युवा प्रबोधन साहित्य मंच महा-राज्य मावळ पुणे यांच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत मधुकर आदमाने, नोटरी भारत सरकार, यांना आजवरचे शैक्षणिक, सामाजिक आणि वकिली क्षेत्रातील कार्याची दखल घेत “युवा महाराष्ट्र आदर्श समाजरत्न भुषण पुरस्कार” २०२४ उद्घाटक मा. श्री. डॉ. अमरजी चौरे, स्वागत अध्यक्ष : श्री संजय कुलकर्णी, प्रमुख मार्गदर्शक : मा.श्री. हरेशभाई देखणे (अध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा), शिवव्याख्याते प्रा. संपत गारगोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, प्रसंगी प्रमुख आकर्षण मा. क्रांतीनाना मळेगावकर (फेम – न्यू होम मिनिस्टर) मा. गौतमी पाटील (फेमस लावण्यवती महाराष्ट्र) सागर वाघमारे, सौ. पिंकीताई सागरभाऊ वाघमारे, रितेश वाघमारे मुख्य आयोजक युवा प्रबोधन साहित्य मंच मावळ, पुणे सर्व कवी व कवयित्री उपस्थित होते.

या अगोदर अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी भारत सरकार यांना संस्थेने प्रथम वर्धापन दिना निमित्त दि रियल पॅन्थर गौरव पुरस्कार २०२३ बहाल केला होता, त्यानंतर यंदाचा त्यांची साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेता दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथील कवी साहित्यिक, निवेदक अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी, भारत सरकार यांना घेत “युवा महाराष्ट्र आदर्श समाजरत्न भुषण पुरस्कार” २०२४ यांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आले.

अॅड.उमाकांत मधुकर आदमाने, नोटरी, भारत सरकार सध्या शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालयात पुणे येथे वकिली व्यवसाया बरोबरच नोटरीचे काम करतात त्यांची आणखी एक नवी ओळख म्हणजे सुंदर कवी, लेखक, साहित्यीक आणि उत्तम निवेदक आहेत. त्यांनी आगामी काळात खुप सुंदर विषयावर कविता सादर करून कवी रसिकांची मने जिंकली, अॅड.उमाकांत आदमाने, नोटरी, भारत सरकार वकिली व्यवसाया बरोबरच नोटरी व्यवसाय देखील प्रामाणिक पणे करतात. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे.

पिंपळखुटा येथे संविधान दिन कार्यक्रम संपन्न

श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधान दिनाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाणीभुषण हभप कुंजबिहारी महाराज धनजकर कामरगाव,श्री नितिन दांगट पुणे,श्री राजेंद्र उईके आर्वी,श्री बाळासाहेब गावंडे अमरावती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरानी संविधानाची जडणघडण व संविधानाचे महत्त्व याबाबतीत सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे यांनी भारतीय संविधान उद्देशिका वाचन केले व उपस्थितीताना शपथ दिली.यानिमित्ताने गावातून संविधान जनजागृती रॅली, प्रश्नमंजुषा सह विविध कार्यक्रम आयोजित केले होते.कार्यक्रमाला ज्ञानेश्वर उके,ओमप्रकाश इंगोले सह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

 

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘ विश्व गुरु ‘ उपाधी ने सन्मानित करणार 

मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह नेपाळ, न्यूझीलंड, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया,थायलंड,माॅरिशस, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन,रशिया, दुबई आदि 20 देशात विश्वजोडो अभियानासह चालता बोलता हिंडता फिरता असा सबकुछ.मधुसूदन एकपात्री.कार्यक्रम करुन हजारो देशविदेशी प्रवाशांना विनामूल्य दिलासा दिला.

विश्वजोडो अभियानात डाॅ.घाणेकर यांनी मानवधर्म:सर्वश्रेष्ठ धर्म, अन्नदान- रक्तदान-नेत्रदान अवयवदान-देहदान करा, दिव्यांग.वंचित यांना सहकार्य करा, झाडे जगवा, पाणी वाचवा, मधमाशी वाचवा आणि विश्व वाचवा, निसर्गावर प्रेम करा, गो माता : विश्व माता, हसा आणि जग जिंका, सा-या विश्वावर प्रेम करा असे संदेश दिले. भेटेल त्याच्या सहीवरुन सही सही सकारात्मक स्वभाव सांगणे, भेटेल त्याला विनोदी किस्से सांगणे, शीळवादन ,जुनी गाणी गाऊन दाखवणे, मुद्राशास्त्र-हस्तसामुद्रिक-रेकी संमोहन-अंकज्योतिष द्वारे दिलासा देणे, निखळ हसणा-यास तात्काळ लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्ड देणे अशा पध्दतीने जिथे रसिक तिथे विनामुल्य मनोरंजन डाॅ.घाणेकर यांनी केले.

या त्यांच्या दैदीप्यमान कार्यासाठी डाॅ.मधुसूदन घाणेकर गौरव समिती तर्फे डाॅ.घाणेकर यांना शनि.दि.7 डिसेंबर 2024रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन येथे ‘ विश्वगुरु ‘ उपाधिने जाहिररित्या सन्मानित करण्यात येणार असल्याचे समिती समन्वयक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी कळवले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ ज्योतिर्विद व.दा.भट, शिक्षणतज्ज्ञ डाॅ.न.म.जोशी, दै.सकाळचे उपसंपादक आशिष तागडे, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त मिलिंद लेले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शीळवादक अनघा सावनूर आगाशे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाईक आणि भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग गौरव समितीचे सल्लागार आहेत.

अक्षरमंच सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी,भारतीय विचारधाराच्या संस्थापक अध्यक्ष भारती महाडिक, वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष वसुधा नाईक, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष भागवत, भाजप महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष शैलजा सोमण,ज्येष्ठ साहित्यिक अपर्णा आंबेडकर, महिला सन्मानच्या पदाधिकारी दीपाराणी गोसावी, सुचेता प्रभुदेसाई, ज्योतिर्विद ॲड.सुनीता पागे, डाॅ.जयश्री बेलसरे, गायिका शलाका गाडगीळ आणि मनिषा सराफ,युवा कार्यकर्त्या माधुरी भागवत, दादासाहेब फाळके चित्रपट.युनियनच्या कार्याध्यक्ष सोनिया गोळे आदिंचा या गौरव समितीमधे सहभाग आहे.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमीडहाळी विशेषांकाचा 600 वा अंक, मधुउवाच हा 50 वा काव्यसंग्रह तसेच हाहाहाs हीहीहीssहूहूहूsss हा व्यंगचित्र संग्रह प्रकाशित होणार आहे. या सोहळ्याचे निमित्त साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर आपल्या चालत्या बोलत्या सबकुछ.मधुसूदन एकपात्री.कार्यक्रमाचा विश्वविक्रमी 81,000 वा प्रयोग सादर करणार आहेत.

      

कांदिवली येथे भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयाच्या आवारात संविधान दिन संपन्न

कांदिवली पश्चिम येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्ण पुतळ्याजवळ पंचशील प्रतिष्ठान ट्रस्ट व्दारा सालाबादप्रमाणे यंदाही संविधान दिन साजरा करण्यात आला.यावर्षी अमृत महोत्सव भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी उत्तर मुंबई चे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्यक्ष, आमदार मनिषा चौधरी, विजय भाई गिरकर,गणेश खणकर, बाळा तावडे, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्ण पुतळ्यास विनम्र अभिवादन केले, धम्म प्रार्थना म्हटली, त्यानंतर सामूहिक रित्या संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार संजय उपाध्यक्ष, योगेश सागर, मनिषा चौधरी, विजय भाई गिरकर, गोपाळ शेट्टी, यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे गुण गौरव केले.या संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

या प्रसंगी मा.खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्यक्ष, आमदार योगेश सागर, आमदार मनिषा चौधरी, गणेश खणकर, बाळा तावडे कमलेश यादव, प्रियांका मोरे,लिना देहरकर, प्रतिभा गिरकर, पंचशील प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बावीस्कर, संदीप जाधव, पंचशील प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बावीस्कर, गजानन गव ई,पत्रकार भारत कवितके, रुग्णालयीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक, रुग्णांचे नातेवाईक,व इतर कार्यकर्ते, पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अमरावती येथे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन अध्यक्ष म्हणून कांदबरीकार लेखक श्रीकांत पाटील कोल्हापूर यांची निवड 

अमरावती येथे मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद शाखा अमरावती यांच्या वतीने गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबरला महात्मा फुले पुण्यतिथीच्या पर्वावर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे कादंबरीकर व बाल साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील राहणार असून संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी चे सरचिटणीस माननीय जनार्दनपंत बोथे करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध इतिहास संशोधक, ख्यातनाम वक्ते, लेखक व मराठा सेवा संघाचे राज्य महासचिव माननीय चंद्रशेखर शिखरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अतिथी म्हणून शिवाजी चाळक ज्येष्ठ साहित्यिक पुणे, विलास सिंदगीकर प्रसिद्ध साहित्यिक व सदस्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई प्रियाताई देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राचार्य दिलीप काळे अध्यासन प्रमुख संत गाडगेबाबा अध्यासन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक मा. एकनाथ आव्हाड मुंबई यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार असून त्यापूर्वी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे.

अकरा वाजता ‘बालसाहित्य वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ राहणार असून या परिसंवादात प्राचार्य एकनाथ तट्टे परतवाडा, प्राचार्य राजावलीकर अमरावती ,प्रा. डॉ. प्रशांत राऊत नागपूर प्रा. प्रणाली तेली कोल्हापूर, प्रा. अलका गायकवाड अमरावती व एडवोकेट नीता कचवे दर्यापूर हे सहभागी होणार आहेत.

 दुपारी दीड वाजता सुप्रसिद्ध बाल साहित्यिक बबन शिंदे नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन आयोजित करण्यात आले असून यात विलास सिंदगीकर प्रा. विजया मारोतकर डॉ. शोभा गायकवाड प्राचार्य अनिल प्रांजळे डॉ मंदा नांदुरकर, चंद्रकांत निकाळे , विनोद तिरमारे, बबलू कराळे आपल्या कथा सांगणार आहेत

 दुपारी तीन वाजता प्रसिद्ध कवी व ललित लेखक रवींद्र जवादे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पद्मिनी दूरुगकर- खोसेकर नागपूर ह्या करणार आहेत कवी संमेलनात सर्वश्री गणेश भाकरे नागपूर कवी सरकार( विलास पाटील ) इंगळी . रामदास राजेगावकर बुलढाणा, गुलाब बिसेन ब्रह्मपुरी, देवबा पाटील खामगाव ,रामदास केदार उदगीर प्रतिभा जगदाळे, मनीषा पाटील सांगली डॉ. गजानन घोंगटे कु. स्वराली वाणी शिला चिवरकर कारंजा ,जगदीश ढोरे वसमत विलास जल्हारे परभणी, प्रदीप देशमुख चंद्रपूर ,मोहन काळे अकोला ,कांचन उल्हे,अजय धोटे, संजीवनी काळे ,प्रा. सुशीला धाबे डॉ. योगिता पिंजरकर ,प्रा. सिमरेला देशमुख, छाया पाथरे ,संजय अडिकणे प्रमोद भगत, सुनील लव्हाळे, गणेश खडके ,कु.नित्या प्रदीप नांदुरकर कु. अभिज्ञा संवाद तराळ इत्यादी कवी ,बालकवी सहभागी होणार आहेत.

 हे संमेलन सुसंस्कार स्मृती मंदिर सभागृह श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे श्री गुरुदेव विद्या मंदिर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. समारोप समारंभ संमेलन अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे अध्यक्षतेत संपन्न होणार असून याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी मा. लक्ष्मणरावजी गमे ,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. अविनाश असनारे व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख उपस्थित राहणार आहेत.

या बाल साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य मनोज कडू कायद्याध्यक्ष जयंत झंझाड संयोजक कल्पनाताई उल्हे निमंत्रक अमोल बांबल जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद अमरावती जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ राजवलीकर कार्याध्यक्ष डॉ. राजेश मिरगे प्रा. संदीप तडस डॉ. अलका गायकवाड उपाध्यक्ष, प्रा सुगंध बंड कोषाध्यक्ष सचिव डॉ. गणेश खडके श्रीकृष्ण कुलट सहसचिव व सर्व कार्यकारिणीने केले आहे.

कार्तिकी पायवारी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी पायवारी दिवे घाटातील काही क्षणचित्रे

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी दिवशी कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते, त्या यात्रेची सांगता शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गोपाळपूर येथील पौर्णिमेच्या काल्याने संपन्न झाली.आणि त्याच दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर हून श्री क्षेत्र आळंदी कडे वारकऱ्यांची पायवारी सुरू झाली.श्रीक्षेत्र पंढरपूर भंडीशेगांव,तोंडले बोंडले, वेळापूर,खुडूस,पुरंदावडे शाळा, नातेपुते, धर्म पुरी,बरड पेट्रोल पंप,विडवणी,निबोरे, तरडगाव,निरा कनल,कामटवाडी, जेजुरी,सासवड मळा, सासवड, दिवे घाट,वडकीनाका, हडपसर, विश्रांतवाडी, आणि श्री क्षेत्र आळंदी असा कार्तिकी पायवारीचा प्रवास सालाबादप्रमाणे यंदाही संपन्न होत आहे.

मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी माऊलीच्या श्रीक्षेत्र आळंदी येथे मोठी कार्तिकी यात्रा भरत आहे.या पंढरपूर ते आळंदी पायवारीत श्री.सद् गुरु वै.ह.भ.प.आप्पासाहेब वासकर महाराज फड या मधील वारकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.या फडा मध्ये मुंबई कांदिवली येथील धनगर समाज विकास मंडळातील जवळजवळ ३५ ते ४० वारकरी बांधव सहभागी झाले आहेत.अभंग, गौळण,भारुड टाळ मृदुंग सोबत वारकरी गात वाजवत तल्लीन होऊन देहभान विसरून पायवारीत सहभागी झाले होते.

गोमंतकीय कवि नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना महाराष्ट्रात “काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार”

रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली महाराष्ट्र ‘सप्ताह फुलांचा’ या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल तसेच रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.त्यात फोंडा गोवा रहिवासी,एकमेव गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी (एनटिसी एड्युकॅअर नवचैतन्य चे संस्थापक) यांनी पण काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल गोव्यातील साहित्यप्रेमींकडुन आनंद व्यक्त करित अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हा नामवंत पुरस्कार प्राप्त केलेल्यात गोव्यासहीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात राज्यातील साहित्यिकांचा समावेश आहे.नम्रता खरे,मुंबई,खेमदेव हस्ते,केशव वामनराव डफरे,वैशाली जगताप बोरसे, धुळे,डॉ.सौ.मीनाक्षी नरेंद्र निळेकर, माजलगाव,सौ. प्रगती पाताडे ,ओरोस,डॉ गीता वाळके, नागपूर,अनुराधा जोशी,अंधेरी,सुमन ताई मुठे नासिक,नवनाथ रामकृष्ण मुळवी,फोंडा-गोवा,सौ शोभा प्रकाश कोठावदे,मुंबई,लीलाधर दवंडे,नागपूर,सुभाष अनंतवार (तात्या) नाशिक,हर्षा भुरे,भंडारा,सौ. पुष्पा निलकंठ येवलकर,नाशिक,सौ. तृप्ती भंडारे,नालासोपारा,स्मिता सुहास भीमनवार,पुणे,विठ्ठलराव खोटरे ( देवर्डा)अकोला,सौ.सिमा मंगरुळे तवटे,वडूज,सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर,नाशिक,प्रा. मन्नाडे रमा धनराज,लातूर,श्री अशोक महादेव मोहिते,बार्शी,श्री पांडुरंग एकनाथ घोलप, रोहोकडी, शिवाजी खाशाबा सावंत,पुणे,सौ.सुलभा दिपकराव गोगरकर, अमरावती,सौ.सारिका लाठकर, नांदेड,सुजाता उके,नागपूर,संदीप भुक्कन पाटील, खिडकाळी,माधुरी अमृतकार,नाशिक,सरोजनी करजगीकर,परभणी,गिरीश भट, पनवेल,संगीता घोडेस्वार,चंद्रपूर,गवाजी बळीद, अहिल्यानगर,विमल बागडे, नाशिक,कल्पना पवार,मुकुटबन,साधना ब्राम्हणकार, मालेगाव,वैजयंती गहूकर,चंद्रपूर,दिलीप देशपांडे, बीड,सुजाता एन. अवचट, गडचिरोली,पद्माकर वाघरूळकर, छ. संभाजीनगर, वासुदेवराव सोनटक्के, अकोला,ओंकार राठोड, दारव्हा यवतमाळ, स्वरा संदेश गमरे, मुंबई,संगीता जामगे,गंगाखेड,कमलताई साळवे, बुलढाणा,चिरंजीव बिसेन,गोंदिया,श्रीमती.उषा.ज.कांबळे, कोथरूड पुणे,उमेश बाऱ्हाटे, परभणी आणि सुवर्णा तावरे, वीटा अशा तब्बल ४९ साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.

रचना प्रकाशन साहित्य समुह प्रशासन समितितील मा.देविदास गायकवाड (परीक्षक) मा.दिनेश मोहरील (निरीक्षक) मा.वंदना मडावी (प्रशासिका) मा.सुजाता उके. (प्रशासिका) मा.सुनिता तागवान (संस्थापक/ग्राफिक्स) आणि मा.डाॅ.प्रा.शिलवंतकुमार मडावी (मार्गदर्शक) यांनी सर्व साहित्यिकांचे अभिनंदन करून पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कर्नाटकात साहित्यिक वि. ग.सातपुते यांचा सत्कार

अ.भा.म.सा. कर्नाटक राज्य साहित्य परिषद व महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर यांनी आयोजित केलेल्या साहित्यिकांच्या सत्कार समारंभात महाराष्ट्रातील पुणे येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक भावकवी (विगसा) वि. ग. सातपुते सरांचा मानाचा साहित्यिक गौरव पुरस्कार देऊन बेंगलोर येथील महाराष्ट्र् मंडळात सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलनानंतर अभा मराठी साहित्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष मा. गुरय्यास्वामी यांनी या अलौकिक समारंभाचे प्रास्ताविक केले.

माननीय वि.ग.सातपुते विगसा (आप्पा) सातपुते सर साहित्य क्षेत्रातील विद्यमान ज्येष्ठ साहित्यिक , भावकवी आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत..*महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे , मुंबई , ठाणे ,मराठवाडा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

त्यांची आजपर्यंत 40 पुस्तके प्रकाशित आहेत. नुकतीच त्यांच्या संस्कार शिदोरी 600 पानांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यांचे अध्यात्मिक लेखन, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना आलेल्या अनेक अनुभूतींच्या आधारावर त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी फक्त बोलत रहावे आणि आपण फक्त ऐकतच राहावे असे मनापासून वाटते. 

आप्पांच्या तरल व भावनाप्रधान, अशा वेगळ्या धाटणीच्या असलेल्या भावकविता लोकांना खूप भावतात. त्यामुळेच त्यांना भावकवी ही पदवी किंवा ही उपाधी मिळालेली आहे. अशा थोर व्यक्तींचा सत्कार होणं, ही खूप भाग्याची गोष्ट आहे..आणि विगसातपुते ( आप्पा ) यांचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर प्रांतातील मराठी संस्थांनी देखील सत्कार केले आहेत ही खुप आनंदाची गोष्ट आहे.

नदिष्ट अनेक पुरस्कार मिळालेल्या या पुस्तकाचे लेखक प्रा. मनोज बोरगावकर (नांदेड ) यांची प्रगट मुलाखत डॉक्टर अनुराग लव्हेकर यांनी मार्मिक संवादाद्वारे घेतली गेली. मुलाखतीमधून अगदी मोकळेपणाने व्यक्त होताना पोहता पोहता नदी माझ्यात शिरली म्हणजे त्याचवेळी मी तिच्या प्रेमात पडलो असं सांगितलं.. नदीशी संवाद करत असताना रात्रीच्या वेळी ती झोपते, तिचा गर्भाशय खूप विस्तारीत आहे ही उपमा देताना त्यामध्ये असणारे अनेक गर्भित अर्थ आम्हाला खूप जाणवले त्यावर एक वेगळ्या प्रकारचे लेखनही होऊ शकतं असंही वाटलं. राजबिंडा सारखा चालणारा मोर ही आवडला.. त्यांनी योग्य दाखले देत.. पुस्तकातील अनेक बाबींवर भाष्य केले.

या कार्यक्रमात बेंगलोर , गुलबर्गा बेळगाव येथील कवी साहित्यिक डॉ. संध्या अन्वेकर, डॉ. अनुराग लव्हेकर , संत साहित्याचे अभ्यासक डॉ. राजेंद्र पडतुरे , सौ. प्रतिभा टेकाडे आणि कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या सौ. दीपाली वझे , सुरेखा कुलकर्णी , महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष ओंकार संगोराम , दीपक कुलकर्णी , राकेश शेटे , तुषार भट डॉ. महेश वझे , प्रा व्यंकटेश देवनपल्ली , अनिरुद्ध शास्त्री , पुण्याहून ज्येष्ठ गझलकार मकरंद घाणेकर आणि कवयित्री सौ. वंदना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. गायत्री बेहरे यांनी गणेशस्तवन सादर केले , सौ. स्नेहा घाटे यांनी सूत्र संचालन केले तर या समारंभात झालेल्या काव्यमैफिलीचे नेतृत्व सौ. प्रतिभा टेकाडे यांनी केले. आणि समारोप आणि आभारप्रदर्शन सौ. दीपाली वझे यांनी केल्यानंतर समारंभाची सांगता झाली.

 वृत्तांकन:- सौ. वंदना घाणेकर