नक्षत्राचं देणं काव्यमंच ,मुख्यालय ,पुणे ३९ च्या वतीने कवींसाठी वेगळे उपक्रम राबवले जातात.अनेक विविध प्रकारच्या काव्य सहलींचे आयोजन केले जाते. नुकतीच नक्षत्रांची पाऊस काव्य सहल नाणेघाट व फोफसंडी येथे संपन्न झाली.यावेळी रायगड किल्ला सहल आयोजित करण्यात आली आहे.
रायगडावर नक्षत्र काव्य मैफल. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी नक्षत्राचं देणं कायमंचच्या वतीने अभिनव असा उपक्रम घेण्यात आला आहे.यावेळी बोर्ड कवी म. भा.चव्हाण पुणे, कवी वादळकार भोसरी,नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा .शितल मालुसरे, हभप. डॉ. रवींद्र सोमवंशी आणि कवी कवयित्री तसेच शिवप्रेमी यात सहभागी होत आहेत.
राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन रायगडाकडे कवी रवाना होणार आहे. रविवारी दि.१०नोव्हेंबर २०२४ रोजी महाराजांना मुजरा करीत काव्यसंग्रह प्रकाशन होणार आहे.तसेच काव्याचा जागर होणार आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.याचे अभिवादन करण्यासाठी करण्यासाठी रायगडावर जाणार आहे.माय मराठीचा जागर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रायगडाचे दर्शन म्हणजे मराठीची अस्मिता होय.तसेच महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या काव्यविषयाच्या असलेल्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी सर्व कवींची “रायगड किल्ला बहारदार काव्य मैफल “संपन्न होणार आहे.
अशी माहिती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.