प्रतिनिधी – राजेंद्रकुमार शेळके
नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने आज विद्यालयात पालक सभा घेऊन मतदानाचे महत्त्व तर पटवून सांगितले पण त्याचबरोबर मतदानाची प्रतिज्ञा ही घेण्यात आली. यामध्ये माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा खांडरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ . अरुणा गुळुंजकर तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक सहभागी झाले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती वर आधारित निरनिराळी घोषवाक्ये तयार केली . विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजनही याप्रसंगी करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी निरनिराळ्या घोषणा देऊन मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले .
या प्रभात फेरीचा मार्ग माध्यमिक विभागाचा विद्यालय, झेन्सार आयटी पार्क, गुलमोहर सोसायटी, चौधरी वस्ती, श्री हॉस्पिटल व परिसर, रिलायन्स मार्ट व परिसर ते विद्यालय असा होता तर प्राथमिक विभागाचा गुलमोहर, सोसायटी , झेन्सार रक्षक नगर फेज वन ते विद्यालय असा होता .यामध्ये विद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापिका , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती तर निर्माण होईलच पण यातून नक्कीच त्यांना प्रोत्साहन ही मिळाले.
Leave a Reply