अमरावती प्रतिनिधी – शशांक चौधरी
समाजसेवक धीरूभाई सांगाणी यांच्या सहयोगाने व प्रा. डॉ. अरविंद देशमुख नेतृत्वात काला गोटा येथे पारपी बांधवांसमवेत दीपावली स्नेह मिलन सोहळा संपन झाला
तिवसा तालुक्यातील काला गोटा या गावामध्ये समाजसेवक धीरूभाई सांगाणी (अमरावती) यांच्या सहयोगाने दिवाळी निमित्त फराळाचे साहित्य वाटण्यात आले.
सर्वप्रथम गावामध्ये संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रिला अनुसरून प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात दिवाळी निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीला अनुसरून कालागोटा येथील ग्राम स्वच्छतेत पारधी बांधवांचा स्पृहणीय सहभाग होता. तसेच त्या नंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, वंदे मातरम, भारत माता की जय, गाडगे महाराज की जय, अश्या घोषणा देत गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून दिवाली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. काला गोटा च्या लहान मुलांमध्ये परिवर्तन पाहून त्यांच्याच आईवडिलांनी प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांचे आभार मानले व तेथील बाळगोपाळांना प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा चे विद्यार्थी हर्षल दारोकार, निशा दमाये, विशाल गोहत्रे, रोहित पाटील, शशांक चौधरी, मयुर गौड व अभिजित बाखडे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दिवाळी निमित्त तिवसा तालुक्यातील काला गोटा या गावामध्ये दिवाळी निमित्त साफसफाई व स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला.
Leave a Reply