अमरावती येथे मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद शाखा अमरावती यांच्या वतीने गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबरला महात्मा फुले पुण्यतिथीच्या पर्वावर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे कादंबरीकर व बाल साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील राहणार असून संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी चे सरचिटणीस माननीय जनार्दनपंत बोथे करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध इतिहास संशोधक, ख्यातनाम वक्ते, लेखक व मराठा सेवा संघाचे राज्य महासचिव माननीय चंद्रशेखर शिखरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अतिथी म्हणून शिवाजी चाळक ज्येष्ठ साहित्यिक पुणे, विलास सिंदगीकर प्रसिद्ध साहित्यिक व सदस्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई प्रियाताई देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राचार्य दिलीप काळे अध्यासन प्रमुख संत गाडगेबाबा अध्यासन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक मा. एकनाथ आव्हाड मुंबई यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार असून त्यापूर्वी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे.
अकरा वाजता ‘बालसाहित्य वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ राहणार असून या परिसंवादात प्राचार्य एकनाथ तट्टे परतवाडा, प्राचार्य राजावलीकर अमरावती ,प्रा. डॉ. प्रशांत राऊत नागपूर प्रा. प्रणाली तेली कोल्हापूर, प्रा. अलका गायकवाड अमरावती व एडवोकेट नीता कचवे दर्यापूर हे सहभागी होणार आहेत.
दुपारी दीड वाजता सुप्रसिद्ध बाल साहित्यिक बबन शिंदे नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन आयोजित करण्यात आले असून यात विलास सिंदगीकर प्रा. विजया मारोतकर डॉ. शोभा गायकवाड प्राचार्य अनिल प्रांजळे डॉ मंदा नांदुरकर, चंद्रकांत निकाळे , विनोद तिरमारे, बबलू कराळे आपल्या कथा सांगणार आहेत
दुपारी तीन वाजता प्रसिद्ध कवी व ललित लेखक रवींद्र जवादे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पद्मिनी दूरुगकर- खोसेकर नागपूर ह्या करणार आहेत कवी संमेलनात सर्वश्री गणेश भाकरे नागपूर कवी सरकार( विलास पाटील ) इंगळी . रामदास राजेगावकर बुलढाणा, गुलाब बिसेन ब्रह्मपुरी, देवबा पाटील खामगाव ,रामदास केदार उदगीर प्रतिभा जगदाळे, मनीषा पाटील सांगली डॉ. गजानन घोंगटे कु. स्वराली वाणी शिला चिवरकर कारंजा ,जगदीश ढोरे वसमत विलास जल्हारे परभणी, प्रदीप देशमुख चंद्रपूर ,मोहन काळे अकोला ,कांचन उल्हे,अजय धोटे, संजीवनी काळे ,प्रा. सुशीला धाबे डॉ. योगिता पिंजरकर ,प्रा. सिमरेला देशमुख, छाया पाथरे ,संजय अडिकणे प्रमोद भगत, सुनील लव्हाळे, गणेश खडके ,कु.नित्या प्रदीप नांदुरकर कु. अभिज्ञा संवाद तराळ इत्यादी कवी ,बालकवी सहभागी होणार आहेत.
हे संमेलन सुसंस्कार स्मृती मंदिर सभागृह श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे श्री गुरुदेव विद्या मंदिर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. समारोप समारंभ संमेलन अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे अध्यक्षतेत संपन्न होणार असून याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी मा. लक्ष्मणरावजी गमे ,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. अविनाश असनारे व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख उपस्थित राहणार आहेत.
या बाल साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य मनोज कडू कायद्याध्यक्ष जयंत झंझाड संयोजक कल्पनाताई उल्हे निमंत्रक अमोल बांबल जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद अमरावती जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ राजवलीकर कार्याध्यक्ष डॉ. राजेश मिरगे प्रा. संदीप तडस डॉ. अलका गायकवाड उपाध्यक्ष, प्रा सुगंध बंड कोषाध्यक्ष सचिव डॉ. गणेश खडके श्रीकृष्ण कुलट सहसचिव व सर्व कार्यकारिणीने केले आहे.