Engage Your Visitors!

श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार,कालांतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

अकोला(दि.४): बीड जिल्ह्यातील ‘श्रीप्रभूप्रसाद मासिक’ आणि ‘कालांतर’ दिनदर्शिका समूहाच्या वतीने नुकताच ‘भाऊबीज’ दीपोत्सवाच्या पावन पर्वावर श्री जगद्गुरु पलसिध्द महास्वामीजी धर्मपीठ,साखरखेर्डा येथे शिवाचार्यरत्न,वेदांताचार्य,सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी,ष.ब्र.१०८ श्री सद्गुरु सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते,भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली सोसे तसेच श्रीप्रभूप्रसाद समूहाचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कालांतर-२०२५’ या वीरशैव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि ‘श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४’ अतिशय उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

यावेळी प्रारंभी दीपप्रज्वलनाने व स्वागत मंत्रोपचाराने कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘कालांतर’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि श्रीप्रभूप्रसाद समूह,बीडच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणार्‍या श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक तपोनिधी पुरस्कार-२०२४ हा सन्मान वेदांताचार्य सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांना, श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक पांथस्त पुरस्कार-२०२४ हा सन्मान श्री ष.ब्र.१०८ श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांना,तर श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४ हा सन्मान भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली आतिश सोसे यांना शाल,श्रीफळ,मानपत्र, स्मृतिचिन्ह व ‘कालांतर’दिनदर्शिका व ग्रंथ भेट देऊन आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी पाहुण्यांची यथोचित भाषणे झाली.तेव्हा सद्गुरु श्री सिध्दचैतन्य स्वामीजी यांनी साखरखेर्डा धर्मपीठाला असलेला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास,तथा या प्राचीन,पुरातण व पवित्र वास्तूची माहिती विषद केली.नामदार प्रतापराव जाधव यांनी या पावन भूमीचे व गुरुमाऊलीचे दीपावलीच्या प्रसंगी होणारे दर्शन सद्भाग्य असल्याचे सांगून या धर्मपीठाकरिता मी आजवर व यापुढेही सतत प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘कालांतर’ही दहा कर्तबगार बहिणींना अर्पण केलेली दिनदर्शिका निश्चितच स्तुत्य उपक्रम असून प्रख्यात लेखिका व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या भगिनी प्रा.दीपालीताई सोसे यांच्यावरील परिचयात्मक लेख वाचून त्यांच्या कार्याने प्रभावित झालो असून श्रीप्रभूप्रसादचे संस्थापक परमेश्वर लांडगे यांनी दहा ताईंना प्रातिनिधिक स्वरूपात दिलेली ही भाऊबीजेची भेट संस्मरणीय व कौतुकास्पद असल्याची भावना याप्रसंगी नामदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.यावेळी ज्येष्ठ लेखक सुरेश सोसे,प्रा.अशोक सारडा,संतोष गाडेकर,कमलकिशोर लढ्ढा,विलास लांडगे,बालकलाकार अद्विक सोसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.