Engage Your Visitors!

एक वर्षात ३६५ पुस्तक प्रकाशन करण्याचा नक्षत्राचं देणं काव्यमंचचा संकल्प

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष -प्रा. राजेंद्र सोनवणे-कवी वादळकार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने अभिनव असा हा रेकॉर्ड होणारा संकल्प केला आहे. एका वर्षात 365 पुस्तक प्रकाशित करण्याचा हा अभिनव प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यापूर्वी संस्थेने शंभर पुस्तकांचा संकल्प केला होता तो संकल्प पूर्ण केला आहे. वर्षभरात ३६५पुस्तके प्रकाशित झाल्यास. हा लिम्का बुक रेकॉर्डमध्ये किंवा महाराष्ट्र बुक रेकॉर्ड नोंद होणारा उपक्रम असेल अशी या निमित्त भावना व्यक्त करण्यात आली.

यापूर्वी संस्थेच्या वतीने संस्थेच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच वेळी २४ पुस्तकांचे प्रकाशन करून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये संस्थेच्या कामाची नोंद झाली आहे. याचा अभिमान वाटत आहे. साहित्य व काव्य क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम करून संस्थेने आपल्या कामाची नोंद जनसामान्यांमध्ये केली आहे. भारतातील अभिनव असं “कवींचे कॅलेंडर “प्रकाशन करून सुद्धा संस्थेने आपल्या कामाची मोहर उमटवली आहे.

गेले सातत्यपूर्ण २५ वर्ष काम करणारी ही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जगातील एकमेव अशी कार्यक्षम संस्था आहे. हजारो कवींना घडवणारे हे एक हक्काचं आणि सन्मानाचे व्यासपीठ आहे.

या रेकॉर्डमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या उपक्रमात ज्या कवींना आपल्या काव्यसंग्रह, कथासंग्रह ,कादंबरी अथवा इतर साहित्य प्रकाशित करायची इच्छा असेल ,त्यांनी संस्थेच्या अनुदान योजनेचा फायदा घेऊन या ३६५ पुस्तकांमध्ये आपल्या पुस्तकाची वर्णी लावून. या रेकॉर्डमय उपक्रमात सहभागी व्हावे. अशी संस्थेच्या वतीने संपूर्ण साहित्य विश्वातील साहित्यिकांना व कवींना यानिमित्ताने आवाहान करण्यात आले आहे. असा आगळावेगळा उपक्रम राबवणारा हा एकमेव कायमचे आहे.

आत्तापर्यंत प्रकाशित केलेल्या प्रत्येक पुस्तकास पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दर्जेदार पुस्तक वाचकांना मिळावी तसेच दर्जेदार पुस्तकाची निर्मिती व्हावी. यासाठी आकर्षक मुखपृष्ठ परफेक्ट बांधणी ,
आयएसबीएन नंबर तसेच उत्तम कॉलिटी चा पेपर वापरून .सर्व पुस्तक निर्मिती करून कवी व साहित्यिकांच्या घरी टपाल खर्च न घेता विनामूल्य घरपोच पाठवण्यात येतात.

साहित्यिकांनी आपलं साहित्य मोबाईल टायपिंग अथवा बाय पोस्ट पाठवावे. त्यासाठी पुढील नंबर वर 9272156295संपर्क तसेच साहित्य पाठवण्यासाठी-नक्षत्राचं देणं काव्यमंच,साई सदन,एक/3, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरी, पुणे 39 येथे संपर्क साधावा. चला तर आजच पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घ्या.

 

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा, शिर्षक- दिवाळी पर्व

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा

शिर्षक: दिवाळी पर्व

 

दिवाळीच्या शुभ पर्वावर

बंधुत्वाचा मनदीप लावू

स्नेहा च्या शब्द फुलांनी

परस्परांचे जिवन सजवू 

परीसर अपुला मनही अपुले

मार्ग धरू या स्वच्छतेचा

स्वता जळून प्रकाश देई

आदर्श घेऊन पणतीचा 

दारी ताेरण हार फुलांचे

सुगंध प्रसवी प्रसन्नतेचा

तया पाहता माेद मिळताे

क्षण भाेगा आनंदाचा 

नाती गाेती सारे जमती

स्वाद जिभेवर मिष्ठांनाचा

द्वेष मनातील फेकून देवू

आनंद घेऊ या दिवाळीचा 

थाेर संस्कृती भाव आगळे

सन्मान राखू धनधान्याचा

धन्वंतरी गणेश अन् लक्ष्मी

करी उध्दार मानव जातीचा 

 

✒️ कवी प्रदीप हेमके

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा, शीर्षक – पाडवा प्रतिक प्रेमाचे

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा 

शीर्षक – पाडवा प्रतिक प्रेमाचे

 

उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध 

घेऊन आला पाडवा

प्रेमाच्या नात्याने उजळून

निघाला दिवाळी पाडवा!

 

अंगणी रांगोळीच्या रंगांची उधळण

दारी पणतीच्या दिव्यांची आरास

आकाश कंदीलाच्या रोषणाईचा साज

सर्वत्र पसरे आनंद बरसात खास!

 

पतिला औक्षण करुन

साजरा करावा पाडवा

प्रेमाच्या नात्यात गुंफून

उभयंतातील वाढेल गोडवा!

 

तेजोमय प्रकाश पडावा

नवरा – बायकोच्या जीवनी

प्रेमाची गोडी वाढावी

शतजन्माच्या नात्यानी!

 

✒️कवयित्री श्वेता कुलकर्णी

श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार,कालांतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

अकोला(दि.४): बीड जिल्ह्यातील ‘श्रीप्रभूप्रसाद मासिक’ आणि ‘कालांतर’ दिनदर्शिका समूहाच्या वतीने नुकताच ‘भाऊबीज’ दीपोत्सवाच्या पावन पर्वावर श्री जगद्गुरु पलसिध्द महास्वामीजी धर्मपीठ,साखरखेर्डा येथे शिवाचार्यरत्न,वेदांताचार्य,सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी,ष.ब्र.१०८ श्री सद्गुरु सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते,भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली सोसे तसेच श्रीप्रभूप्रसाद समूहाचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कालांतर-२०२५’ या वीरशैव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि ‘श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४’ अतिशय उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

यावेळी प्रारंभी दीपप्रज्वलनाने व स्वागत मंत्रोपचाराने कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘कालांतर’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि श्रीप्रभूप्रसाद समूह,बीडच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणार्‍या श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक तपोनिधी पुरस्कार-२०२४ हा सन्मान वेदांताचार्य सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांना, श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक पांथस्त पुरस्कार-२०२४ हा सन्मान श्री ष.ब्र.१०८ श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांना,तर श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४ हा सन्मान भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली आतिश सोसे यांना शाल,श्रीफळ,मानपत्र, स्मृतिचिन्ह व ‘कालांतर’दिनदर्शिका व ग्रंथ भेट देऊन आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी पाहुण्यांची यथोचित भाषणे झाली.तेव्हा सद्गुरु श्री सिध्दचैतन्य स्वामीजी यांनी साखरखेर्डा धर्मपीठाला असलेला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास,तथा या प्राचीन,पुरातण व पवित्र वास्तूची माहिती विषद केली.नामदार प्रतापराव जाधव यांनी या पावन भूमीचे व गुरुमाऊलीचे दीपावलीच्या प्रसंगी होणारे दर्शन सद्भाग्य असल्याचे सांगून या धर्मपीठाकरिता मी आजवर व यापुढेही सतत प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘कालांतर’ही दहा कर्तबगार बहिणींना अर्पण केलेली दिनदर्शिका निश्चितच स्तुत्य उपक्रम असून प्रख्यात लेखिका व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या भगिनी प्रा.दीपालीताई सोसे यांच्यावरील परिचयात्मक लेख वाचून त्यांच्या कार्याने प्रभावित झालो असून श्रीप्रभूप्रसादचे संस्थापक परमेश्वर लांडगे यांनी दहा ताईंना प्रातिनिधिक स्वरूपात दिलेली ही भाऊबीजेची भेट संस्मरणीय व कौतुकास्पद असल्याची भावना याप्रसंगी नामदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.यावेळी ज्येष्ठ लेखक सुरेश सोसे,प्रा.अशोक सारडा,संतोष गाडेकर,कमलकिशोर लढ्ढा,विलास लांडगे,बालकलाकार अद्विक सोसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शब्दस्वरूप साहित्य मंच येथील राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच येथील श्री. श्रुंगेरी देवी चौथे राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री. श्रुंगेरी देवी काव्योत्सव वर्ष चौथे वार सोमवार दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) सुत्रसंचालन करणार आहेत, छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात मा. सुनिल डोके, (ग्रामीण कवी, लेखक, समीक्षक) संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत ,उद्घाटक : मा. रज्जाक शेख (कवी, गझलकार, लेखक) विशेष अतिथी म्हणून मा. अशोक गायकवाड (प्रसिद्ध कवी शेतीमातीकार), मा. प्रकाश पाठक (कवी, लेखक), मा.सौ.निशा महेश कापडे (कवयित्री, लेखिका, प्राथमिक पदवीधर शिक्षिका), मा.विजयकुमार पांचाळ (कवी, लेखक, गुणवंत कामगार) अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.पूजा राजेश घोंगडे व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी जाहीर केले.

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंचाच्या वतीने सौ. पूजा घोंगडे यांचे बंधु ज्ञानेश्वर काळे यांच्या ग्रामदेवतेच्या नावाने श्री. श्रुंगेरी देवी दीपावली विशेषाकांचे प्रकाशना या संस्थेच्या माध्यामातून सर्व मान्यवरांच्या हसेत केले जाणार आहे अशी माहिती संस्थेच्या संस्थापंक अध्यक्षा मा. सौ. पूजा राजेश घोंगडे व व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे, आता देखील छत्रपती संभाजीनगर येथील होणा-या चौथ्या राज्यस्तरीय कवी संमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे.

प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वात काला गोटा येथे पारधी बांधवांसमवेत दीपावली स्नेहमिलन सोहळा संपन्न

 

अमरावती प्रतिनिधी – शशांक चौधरी

समाजसेवक धीरूभाई सांगाणी यांच्या सहयोगाने व प्रा. डॉ. अरविंद देशमुख नेतृत्वात काला गोटा येथे पारपी बांधवांसमवेत दीपावली स्नेह मिलन सोहळा संपन झाला
तिवसा तालुक्यातील काला गोटा या गावामध्ये समाजसेवक धीरूभाई सांगाणी (अमरावती) यांच्या सह‌योगाने दिवाळी निमित्त फराळाचे साहित्य वाटण्यात आले.

सर्वप्रथम गावामध्ये संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रिला अनुसरून प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात दिवाळी निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीला अनुसरून कालागोटा येथील ग्राम स्वच्छतेत पारधी बांधवांचा स्पृहणीय सहभाग होता. तसेच त्या नंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, वंदे मातरम, भारत माता की जय, गाडगे महाराज की जय, अश्या घोषणा देत गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून दिवाली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. काला गोटा च्या लहान मुलांमध्ये परिवर्तन पाहून त्यांच्याच आईवडिलांनी प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांचे आभार मानले व तेथील बाळगोपाळांना प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा चे विद्यार्थी हर्षल दारोकार, निशा दमाये, विशाल गोहत्रे, रोहित पाटील, शशांक चौधरी, मयुर गौड व अभिजित बाखडे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दिवाळी निमित्त तिवसा तालुक्यातील काला गोटा या गावामध्ये दिवाळी निमित्त साफसफाई व स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला.

आकाश रमेश एडपेल्लीवार यांच्या घरात गणेशोत्सवाची गाजलेली भव्यता: दिव्य सजावट आणि भक्तिपूर्वक विसर्जन

आकाश रमेश एडपेल्लीवार यांच्या घरात या वर्षी गणेशोत्सवाला विशेष महत्त्व देण्यात आले. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी अत्यंत मनोभावे करण्यात आली होती. घराच्या सजावटीत पारंपारिक रंगत, आकर्षक लाइटिंग आणि सुंदर रांगोळीने गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी खास वातावरण तयार करण्यात आले.

सर्वप्रथम, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा मूळ आकर्षक प्रतिमा घरात मोठ्या भक्तिभावाने स्थापित करण्यात आली. सजावटीसाठी विविध रंगांचे फुलांचे हार, रंगीत दिवे आणि सोनेरी वस्त्रांचा उपयोग करण्यात आला. घराच्या प्रवेशद्वारावर पारंपारिक रांगोळीने गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात आले, तर घरातील प्रत्येक कोपऱ्यात देवी-देवतांच्या चित्रांसह रंगीत झालर लावण्यात आल्या.

गणपती बाप्पांच्या स्थापनानंतरच्या दीन, भक्तिरसात झुळझुळ करणाऱ्या भजनांची आणि आरतीची आयोजन करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि भक्तांनी आनंदात घेतलेल्या मंगलाचरणाने वातावरण गाजले.

आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनाची

अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना कलावंत पुरस्कार जाहीर

प्रमोद पंडित अभिनेते दिग्दर्शक अपंग सेवा दल जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर पाथरे बु तालुका राहाता जिल्हा अहमदनगर येथील अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना कलावंत विचार मंच आणि कमल फाउंडेशन यांच्या संयुक्त् विद्या माने साहित्यिक आणि कलावंतांना दिला जाणारा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे याविषयीचे निवड पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे प्रमोद पंडित यांना ,कलावंत सेवेबद्दल हा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार ऑक्टोबर 2024 ला नाशिक दिला जाणार आहे त्यांचे अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे

एशियन महाविद्यालय पुणे येथे हिंदी दिवस साजरा

 

पुणे दि.१४ एशियन महाविद्यालय धायरी येथे हिंदी दिवस कला शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनिताजी साप्ते, उपाध्यक्ष आनंद साप्ते, सचिव मा.अनिल साप्ते, प्राचार्या डॉ. सविता सिंह, उपप्राचार्या श्रुती रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेचे विभाग प्रमुख सहा.प्रा.अंकुश जाधव यांनी हिंदी दिवस साजरा केला.

साहित्यिक,कवी,अलककार सहा.प्रा.भारजकर बी.टी.आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभले.. द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी गौरी देशपांडे, प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी काजल यांनी हिंदी भाषा ही राजभाषा असून ती जगात तिसऱ्या नंबरवर आहे. याचा अभिमान वाटतो असे सांगितले.

तसेच प्रमुख अतिथी सहा.प्रा.भारजकर बी.टी.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा.अंकुश जाधव सर यांनी केले. अतिथीची ओळख सहा.प्राध्यापिका प्राजक्ता देशपांडे यांनी केले व आभार प्रदर्शन सहा.प्राध्यापिका श्रध्दा हिंगणे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

गुरुकुल पब्लिक स्कूल परतवाडा या शाळेतील विद्यार्थ्यांची तलवारबाजी या खेळात विभागस्तरावर भरारी

गुरुकुल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स परतवाडा या शाळेतील वर्ग दहावीचा विद्यार्थी अथर्व प्रमोद मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे झालेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत यश प्राप्त करून आपली निवड विभाग स्तरावर होणाऱ्या
तलवारबाजी स्पर्धेसाठी निश्चित केली
अथर्वचा या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.रविंद्र गोळे यांनी त्यांची कौतिक करून विभाग स्तरावर होणाऱ्या तलवारबाजी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राधिका चौधरी,उप मुख्याध्यापिका सौ अनघा भारतीय यांनी अथर्वच्या यशासाठी त्याचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शाळेतील क्रीडा शिक्षक श्री उमेश मोहोड श्री नितीन कवठाळे, कु.वैष्णवी सावरकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथर्वच्या यशाचे कौतुक करून अभिनंदन केले