Engage Your Visitors!

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा, शीर्षक – पाडवा प्रतिक प्रेमाचे

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा 

शीर्षक – पाडवा प्रतिक प्रेमाचे

 

उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध 

घेऊन आला पाडवा

प्रेमाच्या नात्याने उजळून

निघाला दिवाळी पाडवा!

 

अंगणी रांगोळीच्या रंगांची उधळण

दारी पणतीच्या दिव्यांची आरास

आकाश कंदीलाच्या रोषणाईचा साज

सर्वत्र पसरे आनंद बरसात खास!

 

पतिला औक्षण करुन

साजरा करावा पाडवा

प्रेमाच्या नात्यात गुंफून

उभयंतातील वाढेल गोडवा!

 

तेजोमय प्रकाश पडावा

नवरा – बायकोच्या जीवनी

प्रेमाची गोडी वाढावी

शतजन्माच्या नात्यानी!

 

✒️कवयित्री श्वेता कुलकर्णी

श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार,कालांतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

अकोला(दि.४): बीड जिल्ह्यातील ‘श्रीप्रभूप्रसाद मासिक’ आणि ‘कालांतर’ दिनदर्शिका समूहाच्या वतीने नुकताच ‘भाऊबीज’ दीपोत्सवाच्या पावन पर्वावर श्री जगद्गुरु पलसिध्द महास्वामीजी धर्मपीठ,साखरखेर्डा येथे शिवाचार्यरत्न,वेदांताचार्य,सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी,ष.ब्र.१०८ श्री सद्गुरु सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते,भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली सोसे तसेच श्रीप्रभूप्रसाद समूहाचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कालांतर-२०२५’ या वीरशैव दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि ‘श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४’ अतिशय उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

यावेळी प्रारंभी दीपप्रज्वलनाने व स्वागत मंत्रोपचाराने कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘कालांतर’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि श्रीप्रभूप्रसाद समूह,बीडच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणार्‍या श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक तपोनिधी पुरस्कार-२०२४ हा सन्मान वेदांताचार्य सद्गुरु श्री सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांना, श्रीप्रभूप्रसाद धर्मरक्षक पांथस्त पुरस्कार-२०२४ हा सन्मान श्री ष.ब्र.१०८ श्री सिध्दचैतन्य शिवाचार्य स्वामीजी यांना,तर श्रीप्रभूप्रसाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४ हा सन्मान भारताचे केंद्रिय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव आणि प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरु प्रा.दीपाली आतिश सोसे यांना शाल,श्रीफळ,मानपत्र, स्मृतिचिन्ह व ‘कालांतर’दिनदर्शिका व ग्रंथ भेट देऊन आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी पाहुण्यांची यथोचित भाषणे झाली.तेव्हा सद्गुरु श्री सिध्दचैतन्य स्वामीजी यांनी साखरखेर्डा धर्मपीठाला असलेला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास,तथा या प्राचीन,पुरातण व पवित्र वास्तूची माहिती विषद केली.नामदार प्रतापराव जाधव यांनी या पावन भूमीचे व गुरुमाऊलीचे दीपावलीच्या प्रसंगी होणारे दर्शन सद्भाग्य असल्याचे सांगून या धर्मपीठाकरिता मी आजवर व यापुढेही सतत प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘कालांतर’ही दहा कर्तबगार बहिणींना अर्पण केलेली दिनदर्शिका निश्चितच स्तुत्य उपक्रम असून प्रख्यात लेखिका व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या भगिनी प्रा.दीपालीताई सोसे यांच्यावरील परिचयात्मक लेख वाचून त्यांच्या कार्याने प्रभावित झालो असून श्रीप्रभूप्रसादचे संस्थापक परमेश्वर लांडगे यांनी दहा ताईंना प्रातिनिधिक स्वरूपात दिलेली ही भाऊबीजेची भेट संस्मरणीय व कौतुकास्पद असल्याची भावना याप्रसंगी नामदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.यावेळी ज्येष्ठ लेखक सुरेश सोसे,प्रा.अशोक सारडा,संतोष गाडेकर,कमलकिशोर लढ्ढा,विलास लांडगे,बालकलाकार अद्विक सोसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शब्दस्वरूप साहित्य मंच येथील राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच येथील श्री. श्रुंगेरी देवी चौथे राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री. श्रुंगेरी देवी काव्योत्सव वर्ष चौथे वार सोमवार दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) सुत्रसंचालन करणार आहेत, छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात मा. सुनिल डोके, (ग्रामीण कवी, लेखक, समीक्षक) संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत ,उद्घाटक : मा. रज्जाक शेख (कवी, गझलकार, लेखक) विशेष अतिथी म्हणून मा. अशोक गायकवाड (प्रसिद्ध कवी शेतीमातीकार), मा. प्रकाश पाठक (कवी, लेखक), मा.सौ.निशा महेश कापडे (कवयित्री, लेखिका, प्राथमिक पदवीधर शिक्षिका), मा.विजयकुमार पांचाळ (कवी, लेखक, गुणवंत कामगार) अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.पूजा राजेश घोंगडे व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी जाहीर केले.

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंचाच्या वतीने सौ. पूजा घोंगडे यांचे बंधु ज्ञानेश्वर काळे यांच्या ग्रामदेवतेच्या नावाने श्री. श्रुंगेरी देवी दीपावली विशेषाकांचे प्रकाशना या संस्थेच्या माध्यामातून सर्व मान्यवरांच्या हसेत केले जाणार आहे अशी माहिती संस्थेच्या संस्थापंक अध्यक्षा मा. सौ. पूजा राजेश घोंगडे व व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे, आता देखील छत्रपती संभाजीनगर येथील होणा-या चौथ्या राज्यस्तरीय कवी संमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे.

प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वात काला गोटा येथे पारधी बांधवांसमवेत दीपावली स्नेहमिलन सोहळा संपन्न

 

अमरावती प्रतिनिधी – शशांक चौधरी

समाजसेवक धीरूभाई सांगाणी यांच्या सहयोगाने व प्रा. डॉ. अरविंद देशमुख नेतृत्वात काला गोटा येथे पारपी बांधवांसमवेत दीपावली स्नेह मिलन सोहळा संपन झाला
तिवसा तालुक्यातील काला गोटा या गावामध्ये समाजसेवक धीरूभाई सांगाणी (अमरावती) यांच्या सह‌योगाने दिवाळी निमित्त फराळाचे साहित्य वाटण्यात आले.

सर्वप्रथम गावामध्ये संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रिला अनुसरून प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात दिवाळी निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीला अनुसरून कालागोटा येथील ग्राम स्वच्छतेत पारधी बांधवांचा स्पृहणीय सहभाग होता. तसेच त्या नंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, वंदे मातरम, भारत माता की जय, गाडगे महाराज की जय, अश्या घोषणा देत गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून दिवाली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. काला गोटा च्या लहान मुलांमध्ये परिवर्तन पाहून त्यांच्याच आईवडिलांनी प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांचे आभार मानले व तेथील बाळगोपाळांना प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा चे विद्यार्थी हर्षल दारोकार, निशा दमाये, विशाल गोहत्रे, रोहित पाटील, शशांक चौधरी, मयुर गौड व अभिजित बाखडे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दिवाळी निमित्त तिवसा तालुक्यातील काला गोटा या गावामध्ये दिवाळी निमित्त साफसफाई व स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला.