भारत कवितके मुंबई कांदिवली, पश्चिम
शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक मधील कवी कट्टा व्दारा कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, सिडको,राजे संभाजी स्टेडियम शेजारी,मानव सेवा केंद्र या ठिकाणी कविता कार्यशाळा संपन्न झाली.सुरवातीला कविवर्य नारायण सुर्वे यांच्या फोटो ला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या कविता कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील अनेक कवी कवयित्री मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कविता म्हणजे काय? कविता कशी असावी? कवितेचे सादरीकरण कसे असावे? या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी कविता कार्यशाळेचे मान्यवर मार्गदर्शक रविंद्र मालुंजकर यांनी सांगितले की ” कवी ची कविता ही बोलकी असलीं पाहिजे, कवींच्या अंगी विनयशीलता,नम्र पणा हवा, कवितेतून कविंनी कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करावा,” या कार्यशाळेचे दुसरे मान्यवर मार्गदर्शक कवी लेखक समीक्षक विवेक उगलमुगले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,” कविला स्वतः ची एक वेगळीच दृष्टी असावी लागते, आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग व्यापते कविता, आयुष्याचा शोध घेते कविता, सादरीकरण सर्वांना समजेल असे असावे, ओढून ताणून केलेले नसावे,अवघड शब्द टाळा, स्पष्ट, सुंदर, सत्यता कविंनी कवितेतून मांडावी,आपली कविता इतरांना ओळखता आली पाहिजे,स्व अनुभवातून कविता निर्माण झाली पाहिजे,कवीने माणसे वाचावित, स्वतः ला वाचावे,व इतर लिखाण सातत्याने वाचावे, व्यासंग, निरीक्षण शक्ती,आशय प्रतिभा या गोष्टी कवी साठी आवश्यक आहे.
संत कविता कडे दुर्लक्ष करू नये,संतांचा अभ्यास करून कविता कराव्यात,कवितेचा आशय व तोल कविंनी सांभाळावा, स्वतः च्या अनुभवाशी प्रमाणिक राहून कविता करावी, कवी ची कविता रसिकांना आवडते हा कवी साठी मोठा पुरस्कार आहे, मानवी मुल्य उचलून धरण्यासाठी कवीने लिहिले पाहिजे, साधेपणात ही सौंदर्य असते,” या कविता कार्यशाळेत सर्व कविना” जगणे” या शब्दावर पाच मिनिटांत कवीता लिहून द्यावी असे सूत्र संचालक बाळासाहेब गिरी यांनी असा एक प्रयोग केला,त्यास सर्वांनी प्रतिसाद दिला, कवीवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा चे रविकांत शार्दुल यांनी आपल्या प्रास्ताविकात कवी कट्टा च्या कार्याचा आढावा घेऊन आलेल्या सर्वांचे आभार मानले.या कार्यशाळेत मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, कवी, लेखक, गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांना ही प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कवीना या कविता कार्यशाळेत अतिशय बहुमुल्य असे मार्गदर्शन लाभल्याने प्रत्येकाने रविकांत शार्दुल यांचे आभार मानले, सहभागी सर्व कवी, कवयित्री यांना प्रमाणपत्र देण्यात आली.