Engage Your Visitors!

शाळेच्या अमृत महोत्सवनिमित्त मुधोजी बालक व प्राथमिक मंदिर फलटण यास वसुधा नाईक यांची सदिच्छा भेट

दि. ११/११/२०२४ रोजी वसुधा वैभव नाईक यांनी फलटण येथील मुधोजी बालक व प्राथमिक मंदिरास भेट दिली.स्वतः त्या शाळेमध्ये १९७० ते १९७५ या पाच वर्षात त्या शिकत होत्या.जवळजवळ ५० वर्षाने त्या शाळेला भेट देत होत्या. त्यांच्या स्वतःच्या नाती सोनाक्षी,समीक्षा आणि त्रिशिका यांना त्यांची शाळा दाखवण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. तिथे समजलं की शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. तेथील बाल वर्गातील मुलांना खाऊ वाटण्यात आला.

बाल वर्गाला तिथे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पहिली ते चौथी मध्ये १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर एक आगळा वेगळा आनंद मिळाला. नयनातून अश्रू वाहू लागले. हे आनंदी अश्रू शाळेने कर्म दिले त्या शाळेसाठी होते. शिक्षकांसाठी होते. बाजारे गुरुजींसाठी होते.बालक मंदिराच्या मुख्या.रजपूत मॅडम यांनी पूर्ण शाळेची माहिती दिली. जुनी शाळा,नवी बिल्डिंग यातला फरक सांगितला. वसुधा व त्यांच्या नातींचे स्वागत खूप छान केले. प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना खाऊ देण्यासाठी त्यांनी मदत केली. शाळेचा सर्व स्टाफ हेल्पफुल आहे.वीर मॅडम यांचे सहकार्य छान लाभले. सर्व स्टाफ मदतीसाठी पुढे आहे.

मधोजी प्राथ. विभागाचे मुख्या.शिंदे सर यांच्याशी फोनवर बोलणे झाले. सर देखील हेल्पिंग नेचरचे छान वाटले. सुनील पाडवी यांनी सहकार्य केले. बाकी शिक्षक स्टाफ सगळा उत्तम आहे. वसुधा यांनी आपला वर्ग कोणता होता हे आपल्या नातींना दाखवले व त्या वर्गातल्या त्याच बेंचवर त्यांनी बसून छान फोटोंचा आनंद घेतला.

दिवाळी सुट्टीनंतर शाळेचा आज पहिला दिवस होता. तरी देखील बरेच विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. शाळेचा पहिला दिवस, अमृत महोत्सव आणि त्यात लहान मुलं बघितली की वसुधाला आनंद होतो. वसुधा यांनी नातींच्या हातून मुलांना खाऊ वाटला.मुले खूष, शिक्षक खूष, वसुधा खूष….

रजपूत मॅडमने वसुधा यांचा बायोडाटा घेतला. या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून निश्चितच आपल्याला या शाळेत पुन्हा मानाने बोलवले जाईल. असे त्यांनी आश्वासन दिले. शाळेत ठेवले पहिले पाऊल जेव्हा नयनांच्या कडा पाणावल्या तेव्हा वसुधाचे कर्मभूमीला लागले पाय,

आनंदाचा झरा ती फलटणातून घेऊन जाय

मनी आस तिला बालांना भेटण्याची

स्वतःच्याच शाळेत मन रमवण्याची

नातींना घेऊन आली शाळा दाखवायला

शाळेचे वातावरण पाहून मन लागले बोलायला

जा तुझ्या वर्गात जाऊन बस बाळा

हीच तर तुझी होती प्राथमिक शाळा

जीवन कसे जगायचे हा धडा शिकवला

आता वसुधाने समाजात पाय घट्ट रोवला

शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे आज

वसुधाच्या डोक्यावर ज्ञानाचा चढतोय सुरेख साज 

हा दिवस खूप खास वसुधासाठी

कार्य उत्तम चालू आहे तिथे समाजासाठी

 

 

डॉ. मधुसूदन घाणेकर यांचा बालकांसाठी ‘सबकुछ मधुसूदन’ एकपात्री कार्यक्रम

 डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘सबकुछ मधुसूदन ‘ 80990 वा प्रयोग सौ. वसुधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. तसेच विश्वविक्रमी डहाळी_596 व्या अंकाचा प्रकाशन सोहळा वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फे अध्यक्षा सौ.वसुधा नाईक यांच्या शुभ हस्ते झाला.उपस्थितांनी या कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली. निमंत्रक वैभव नाईक यांनी संयोजन केले. महिला सन्मानच्या पदाधिकारी सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपाराणी गोसावी आणि सुचेता प्रभुदेसाई या पदाधिकारी, काही बाल रसिक आणि पालक वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.

सौ.वसुधा नाईक यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार केला. डाॅ.मधुसूदन घाणेकर 2006 पासून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन डहाळी अनितकालिकाचा उपक्रम विनामूल्य राबवतात. सर्व मजकूर हाताने लिहितात. या माध्यमातून त्यांनी शेकडो नवोदित साहित्यिकांना डहाळीचे व्यासपीठ मुक्तपणे उपलब्ध करुन दिले आहे.

हृदयविकार तसेच कोरोना या प्रतिकुलतेवर मात करत त्यांनी दिलेले योगदान निश्चितच गौरवास्पद आहे.सर्व सामान्यांना हे अनितकालिक निश्चितच दिलासा देणारे आहे. सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले डाॅ.घाणेकर गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ देशविदेशियांना सबकुछ मधुसूदन ह्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमातून मनमुराद आनंद देत आहेत, असा त्यागी कलावंत होणे नाही ” या शब्दात सौ.वसुधा नाईक यांनी डाॅ.घाणेकर यांचा गौरव केला.’रमाची पाटी’ ह्या कचरा वेचणा-या विद्यार्थिनीवर आधारीत असलेल्या लघुपटाच्या कथेला सौ.वसुधा नाईक यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सौ.वसुधा नाईक यांच्या उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी त्यांचा हृद्द सत्कार केला.

गोड बोलणा-या बालांना मिठू मिठू पोपट आणि हसणा-या रसिकांना लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रदान केले. समारोप प्रसंगी सौ.वसुधा नाईक यांनी छान खाऊ, चेंडू , खोडरबरं देऊन खुष केले.बालकांचेही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. मुले खूप खूष झाली. पालक आनंदी झाले.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविंद्र सूर्यवंशी – संस्थापक युवा क्रांती संघटना पोलीस मित्र यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम इंटरनॅशनलच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसुधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

पंचायत समिती जुन्नर तर्फे ग्रामसेवकांना निवडणूक उपक्रमांविषयी शिबिराचे आयोजन

पंचायत समिति जुन्नर अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना निवडणूक उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेचे सर्व उपक्रम व त्याबद्दलची कार्यवाही बाबत ग्रामसेवकाना सूचना देताना पंचायत समिती जुन्नरच्या स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी सविस्तर चर्चा करून व योग्य ते मार्गदर्शन करत मतदार जनजागृती अंतर्गत मतदार प्रतिज्ञा, रांगोळी ,गृहभेटीद्वारे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदान करण्याविषयी जनजागृती करणे. मतदान केंद्रावरील सोयी सुविधांची माहिती देणे. प्रभात फेरी, रॅली इत्यादी उपक्रम कसे राबवावे यासंदर्भात माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडावी असे आवाहन करणायात आले.

तसेच ग्रामपंचायत अंतर्गत know your polling station या पद्धतीने सर्वांना मतदान केंद्रांची माहिती देणे अशा सूचनाही ग्रामसेवकाना देण्यात आल्या. सर्व विभाग हे काम करणार आहेत. यामध्ये एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग ,आरोग्य विभाग, बचत गट सर्वांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

शब्दस्वरूप साहित्य मंचाच्या राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने यांनी केले बहारदार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री. श्रुंगेरी देवी काव्योत्सव वर्ष चौथे वार सोमवार दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी केले बहारदार सुत्रसंचालन केले, छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय कवी संमेलनात मा. सुनिल डोके, (ग्रामीण कवी, लेखक, समीक्षक) संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होते ,उद्घाटक : मा. रज्जाक शेख (कवी, गझलकार, लेखक) विशेष अतिथी म्हणून मा. अशोक गायकवाड (प्रसिद्ध कवी शेतीमातीकार), मा. प्रकाश पाठक (कवी, लेखक), मा.सौ.निशा महेश कापडे (कवयित्री, लेखिका, प्राथमिक पदवीधर शिक्षिका), मा.विजयकुमार पांचाळ (कवी, लेखक, गुणवंत कामगार) अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.पूजा राजेश घोंगडे व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंचाच्या वतीने सौ. पूजा घोंगडे यांचे बंधु ज्ञानेश्वर काळे यांच्या ग्रामदेवतेच्या नावाने श्री. श्रुंगेरी देवी दीपावली विशेषाकांचे प्रकाशना या संस्थेच्या माध्यामातून सर्व मान्यवरांच्या हस्ते केले संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा. सौ. पूजा राजेश घोंगडे व व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे, आज देखील छत्रपती संभाजीनगर येथील होणा-या चौथ्या राज्यस्तरीय कवी संमेलनात बहारदार सूत्रसंचालन करून कवी संमेलन यशस्वी पार पाडले त्याबद्दल संमेलनाध्यक्ष मा डॉ. सुनिल डोक व श्री प्रकाश पाठक , मा.रज्जाक शेख आणि संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा. सौ. पूजा राजेश घोंगडे व व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र व शाल देऊन मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांना गौरविण्यात आले.

नाशिकची साप्ताहिक मीटिंग हुतात्मा स्मारक येथे पार पडली

आज ५/११/२४ रोजी fescom नाशिकची साप्ताहिक मीटिंग मा.अशोक होळकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी हुतात्मा स्मारक येथे सविता बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेचे सचिव धनंजय चतुर यांनी सर्व पदाधिकारी यांना दिवाळी फराळ देऊन, सर्वांचा सत्कार केला.

त्या वेळी नानासो होळकर,मनोहर वाघ,क्षीरसागर तात्या, कातकाडे सर,धनंजय चतुर,प्रकाश महाजन, दादासो तिडके,विलासजी शिऊर्कर,शिवाजी होळकर, बेळे सो,लीलाधर बेंद्रे, भाऊसो सोनवणे,धुमाळ सो,मधुकर रकिबे सुनील साळवी,दिनकर कुलकर्णी , वसंतराव जाधव हजर होते. मां.होळकर नाना यांनी मार्गदर्शन केले v सविता बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेला शुभेछा दिल्या.शेवटी धनंजय चतुर यांनी आभार मानले.