Engage Your Visitors!

ग्रेट व अविस्मर्णीय भेट

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खोडा मराठी चिञपट तसेच गाजलेले मराठी चिञपट बबन, टी. डी . एम चिञपटाचे निर्माते दिग्ददर्शक आदरणीय श्री . भाऊराव कर्‍हाडे सर यांना भेटण्याचा योग आला . या वेळी सरांशी अनेक वियषावर मनमोकळ्या गप्पा झाल्या . या वेळी सरांनी हेलपाटा कादंबरीची पार्श्वभूमी समजुन घेतली . सरांनी आपल्या एवढ्या बिझी सेड्युलमध्ये मला वेळ दिला . सरांना भेटुन मला व माझ्या पत्नीला अतिशय आनंद झाला . या वेळी नुकताच मेक्सिको येथुन सुट्टीवर आलेले माझे पुतणे संदीपदादा सोबत होता . सरांना या वेळी माझी संघर्षमय हृदयस्पर्शी “हेलपाटा कादंबरी” सरांना सस्नेह भेट दिली . या वेळी सरांनी हेलपाटा कादंबरीचे विशेष कौतुक केले इतकी मोठी व्यक्ती पण सरांचा स्वभाव लाखात एक वाटला . एक व्यक्ती म्हणुन सर ग्रेट वाटले. सरांची ही भेट मला साहित्यिक कार्याला उभारी देणारी वाटली. सरांनी आपली भेट देवुन माझ्यासाठी आपला अमुल्यवेळ दिला त्याबद्दल सरांचे मन:पूर्वक आभार ….!!! सरांच्या पुढील आगामी चिञपटांसाठी मन:पूर्वक आभाळभर शुभेच्छा ….!!!

डाॅ.मधुसूदन घाणेकर होणार ‘ विश्वगुरु’ उपाधिने सन्मानित- मंदा नाईक 

माणसं कशी जोडावीत , माणसाचे दुःख जाणून घेऊन त्याला आपल्या कलेच्या माध्यमातून त्याच्या डोळ्यातील अश्रु कसा फुलवावा, लहानांपासून आबालवृध्दापर्यंत प्रत्येकाला आनंद कसा द्यावा याबाबत सा-या जगासमोर उच्च आदर्शवाद ठेवणारे व्यक्तिमत्व कुठले असेल तर ते म्हणजे या युगातील अनुनिक संत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचेच नाव घ्यावे लागेल. डाॅ.घाणेकर यांनी देशविदेशात स्वखर्चाने प्रवास करुन आपल्या कलेच्या माध्यमातून मानवतेचा प्रसार केला आहे. भेटणा-या प्रत्येक व्यक्तिला डाॅ.घाणेकर हे सातत्याने निरपेक्षपणे आनंद देत असतात.

त्यांनी विविध पातळीवर केलेल्या, अनेक विश्वविक्रमांची मी साक्षीदार आहे.डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी समाजाला दिलासा देण्याच्या कार्यात अनेक मानापमान सहन केलेत. त्यांना हृदयविकार, कोरोना सारख्या जीवघेण्या व्याधींशी झुंजही द्यावी लागली; पण त्यांनी आपले काम थांबवले नाही.माऊलींच्या विश्वकल्याणाच्या संकल्पनेची प्रेरणा घेऊन त्यांचे विश्वजोडो अभियान अविरतपणै चालू आहे. भेटेल त्या व्यक्तीमधे प्रबळ इच्छाशक्ती .. दुर्दम्य आशावाद निर्माण करणे.. जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाला जीवनाविषयी आत्मज्ञान देणे..

अशा उच्च आदर्शवादी ध्यासातून आपले जीवन व्यतीत करणा-या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना पुण्यात शनिवार दि.7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन येथे गौरव समिती.तर्फे ‘ विश्वगुरु ‘उपाधिने सन्मानित केले जाणार आहे.डाॅ.मधुसूदन घाणेकर हे माझे मानलेले लहान भाऊ आहेत. मला स्वतःला खुप भाग्यवान समजते की माझ्या या लहान भावाचा समाजाकडून ‘ विश्वगुरु ‘ उपाधिने सन्मान होत आहे..डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना माझे मनापासुन खुपखुप आशिर्वाद !

मंदा नाईक , कार्याध्यक्ष

मधुरंग आणि साहित्य गौरव 

  

सोमनाथ लंघे यांची तज्ञ संचालकपदी निवड 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कर्मवीर सुभाष आण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकरवाडी येथील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ तुकाराम लंघे ता . दौंड , जि . पुणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यांच्या नियुक्ती बद्दल देवकरवाडी ग्रामस्थ व विविध सहकारी व सेवाभावी पतसंस्थांच्या वतीने तसेच दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघ,जुन्नर येथील श्री विघ्नहर कला अकादमी तसेच नागपूर येथील दैनिक शब्दशिल्प परिवाराच्या वतीने सोमनाथ लंघे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

ग्रामीण कवी श्रीराम घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी निवड

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

ग्रामीण हास्य कवी म्हणून प्रसिद्ध असणारे ग्रामीण कवी श्रीराम विध्यासागर घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या “महाराष्ट्र राज्य समन्वयक” पदी नुकतीच निवडकरण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, काव्यक्षेत्राची तसेच शेती मातीची जाण असणारे ,शेतकरी पुत्र ग्रामीण भागातून शहरात नोकरीच्या निमित्ताने शहरात येऊन आपला सांस्कृतिक वसा आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणारे ,एकदम सोप्या शब्दात सर्वांना आपलेसे करणारे आणि आपल्या काव्यातून श्रोत्यांना खळखळून हसवणारे ग्रामीण हास्य कवी अशी महाराष्ट्र भर ओळख निर्माण करणारे ग्रामीण कवी , गीतकार, निर्माता अशा अनेक भूमिका निभावणारे तसेच स्वतः च्या आणि कवी आणि कवयित्री यांच्या कवितेला संगीत बद्ध करून सर्वांचे मनोरंजन करणारे कवी श्रीराम घडे सर यांची साहित्य कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आवड पाहून, साहित्य क्षेत्रातीलविविध समस्या सोडवण्यासाठी , समूहासाठी वेळोवेळी दिलेले योगदान या बाबींचा विचार करून त्यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या “महाराष्ट्र राज्य समन्वयक” पदी निवड झाल्याबद्दल श्री . श्रीराम घडे यांचे मनपूर्वक अभिनंदन

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या “महाराष्ट्र राज्य समन्वयक” पदी दिनांक ०४डिसेंबर २०२४ रोजी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष मा .विशाल सिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे,,राष्ट्रीय सचिव बारकू आघाव, सहसचिव योगेश हरणे आदीसह अनेकांनी अभिनंदन केले.

विलासअप्पा लांडगे,देवीदास उंचे वीरशैवरत्न पुरस्कारने सन्मानित

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील श्री नंदीकेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या २४ पट्टाभिषेक वर्धापनदिनाच्या औचित्याने वीरशैव समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या २४ समाज बांधवांचा वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात माजलगांव येथील श्री. विलासअप्पा लांडगे व छत्रपती संभाजीनगर येथील श्री. देवीदादअप्पा उंचे यांचाही समावेश होता.

   सोनपेठ येथील श्री नंदीकेश्वर मठ संस्थानच्या वतीने दरवर्षीच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या समाज बांधवांना वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचे हे तीसरे वर्ष असून, आतापर्यंत श्री नंदीकेश्व मठ संस्थानच्या वतीने वीरशैव समाजातील सुमारे ७० मान्यवरांना वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

     शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर रोजी मठाचे मठाधिपती श्रीगुरू नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या २४ व्या पट्टाभिषेक वधार्पनदिनाच्या अनुषंगाने, त्यांच्या नेतृत्वाखाली सोनपेठ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या समारोहाला जिंतूर येथील श्रीगुरू अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी, देवणी येथील श्री म.नि.प्र. सिध्दलिंग शिवाचार्य स्वामाजी, आलमल जि.विजापूर येथील श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

     माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीनस्वामी मठ संस्थानचे पूर्वाचार्य लिं. श्रीगुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींचे विश्वासू शिष्य माजलगाव येथील विलासअप्पा लांडगे यांचा धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी बद्दल तर छत्रपती संभाजीनगर येथील देवीदासअप्पा उंचे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कागगिरी बद्दल यावेळी वीरशैवरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.

त्या सोबतच वीरशैव समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप सोडणार्‍या सर्वश्री संतुकराव शिवणकर, राजेंद्र मुंडे, महेश स्वामी, दत्ताप्पा कसबकर, गुरूनाथ बेंडूरे, नारायण गौंडर, नारायण गौरकर, शिवानंद कथले, शिवशंकर भुरे, महादेव लामतुरे, ओंकार पंचाक्षरी, नागेश मिटकरी, जयश्री भुसारे, नारायण पळसे, प्रा.ओमप्रकाश झुरूळे, संजय हत्ते, भिमाशंकर बेंबळकर, नाररायण हसेगावकर, पृथा पंडित, दीपक उरगुंडे, प्रविण उमराणे, नागनाथ स्वामी काजळे, जगदिश बुरांडे या मान्यवरांनाही वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा समारोह यशस्वी करण्यासाठी सोनपेठ येथील श्री नंदीकेश्वर मठ संस्थानच्या शिष्य परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

कवी इंद्रजीत पाटील शाहीर अमर शेख पुरस्काराने सन्मानित

म.सा.प,पुणे शाखा – बार्शी आयोजित शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२४ ने कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले. हा बहुचर्चित व मानाचा समजला जाणारा पुरस्कार त्यांच्या ‘ कळ पाेटी आली आेठी ‘ या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहास देण्यात आला.

सदर पुरस्कार प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पी.टी.पाटील सर, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.विश्वास पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी डाॅ.बी.वाय.यादव,नंदन जगदाळे,अरूण देबडवार,जयकुमार शिताेळे,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्री. देविदास साैदागर यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती हाेती.संत तुकाराम सभागृह ,श्री.शिवाजी महाविद्यालय परिसर ,बार्शी याठिकाणी हा कार्यक्रम हर्षाेल्हासात पार पडला.हा साेहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पां.न.निपाणीकर, प्रा.डाॅ.रविराज फुरडे, प्रकाश गव्हाणे,प्रमिला देशमुख, बी.आर.देशमुख,प्रकाश महामुनी,आबासाहेब घावटे, इतर कार्यकारणी व स्वीकृत सदस्य,तसेच पुरस्कार प्रायाेजक यांनी माेलाचा हातभार लावला.

साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना हा एकविसावा राज्यस्तरीय पुरस्कार असून या कवितासंग्रहास हा दुसरा पुरस्कार आहे.ग्रामीण भागातील या प्रतिभावान लेखकाचे अवघ्या महाराष्ट्रातून विशेष काैतुक हाेत असून अभिनंदन व हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.

सर्व भाषांच्या पलिकलडल्या मनांतरातील भावनाश

सर्वत्र इथून तिथुन सारी निसर्गसृष्टि , सारी पंचमहाभूते त्यांचा आविष्कार , सारे जग , सारी माणसं , साऱ्या सुख संवेदना , सारी स्थित्यंतरे , सारं सारं सारखं असलं तरीही मानवी मनातील वैचारीकता मात्र भिन्न भिन्न दिसून येते ..! 

मानवी मनामद्धये असणारे अपेक्षित आत्मिक समाधान देणारे प्रेमास्थेच्या भावनांचे रूप मात्र एकच असते.! तिथे फक्त *एक आत्मिक सुखानंद परस्पर प्रेमभाव अपेक्षित असतो.

काल अचानक एक परदेशी अबुधाबी येथील मन्सूर खान नावाचे अनोळखी व्यक्तिमत्व बोटनिकल गार्डन बंगलोर येथे सहजच मला भेटले. त्यांच्या स्मितहास्या मुळे मी अगदी सहज आकर्षून गेलो. पटकन हाय , हॅलो म्हणावे तर भाषेची अनभिज्ञता होती. कुठल्या भाषेत बोलायचे हाच मोठा प्रश्न होता. त्यांना फक्त त्यांचीच भाषा येत होती . आमचे एकमेकांचे संभाषण तसे कुणालाच कळणारच नव्हते. पण आम्हा उभयतांच्या चेहऱ्यावरील भाव आणी डोळ्यातील अव्यक्त असलेले मनभावनांचे रूप , अंतरातील ओढ , मु्कशब्द सारं काही सांगत होते. चेहरे बोलत होते. एकमेकांच्या निर्मळ हस्तांदलनातून झालेला स्पर्श देखील अनेक जन्मांची ओळख परस्परांना सांगून गेला होता.! 

दैवयोग कसा असतो पहा…! योगायोगाने अगदी सहज एक ट्रांसलेटर भेटला तो त्यांच्या टुरिस्ट गाडीचाच भारतातलाच ड्रायव्हर होता. त्याने आम्हा उभयतांच्यात दुभाषी म्हणून सहकार्य केले . त्यामुळे आमचे संभाषण होऊ शकले ..परिचय देखील झाला ……

एक अनभिज्ञ व्यक्ती पण किती आस्था ! किती प्रेम आणि भावुकता किती मृदुलता ! किती नम्रता ! लाघवी व्यक्तिमत्व ! त्यांच्या नजरेतुन जाणवत होते. हे शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचे वय 60 माझे वय 75 तरीही दिलखुलास बोलणे झाले . त्यांचा कौटुंबिक परिचयही झाला. 

विशेष म्हणजे एका तासा दोन तासाच्या प्रवासात झालेल्या या पहिल्या भेटितच त्यांनी आम्हा कुटुंबाला ते बेंगलोरला ज्या हॉटेल ताज एक्झयुकेटिव्ह येथे उतरले होते त्या ठिकाणी (दावत) जेवणाचेही निमंत्रण दिले ..!

हे त्यांच्या मनाचे मोठ्ठेपण होते…!

हे एक आश्चर्य होते….!

माझ्याबरोबर माझा 6 वर्षाचा नातू होता. त्याला त्यांनी प्रेमाने कडेवर उचलुन घेतले आणि कवटाळले. त्याक्षणी त्यांच्या चेऱ्यावरचे ते निष्पाप प्रसन्नतेचे भाव मलाही अंतर्मुख करून गेले.माझ्या नातवाला नको ,नको म्हणत असताही देखील रु .१०००/- हातात दिले देखील.

मन्सूर खान ही परदेशी अबुधाबीची व्यक्ती की ज्यांचा जीवनात कधीच कुठलाही सुतराम संबंध नाही अशी अनभिज्ञ व्यक्ती अचानक भेटते काय आणि आणि क्षणार्धात अनेक जन्मांचे नाते असल्यासारखी वागते काय ? याचे माला खुपच आश्चर्य वाटले.

आम्ही त्यांच्या हॉटेलवर त्या कुटुंबाला भेटलो आणि नंतर मी देखील त्यांना बेंगलोर मधील माझे घरी येण्याचे निमंत्रण दिले ..! ते आले देखील शेवटी मी हे आपले पूर्वजन्मिचेच ऋणानुबंध आहेत असे वर दाखवून म्हणालो ! त्यांच्या सोबत असलेल्या दुभाषी ड्रायव्हर व्यक्तीने त्यांना ते त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगीतले तेंव्हा मन्सूरअलीने,, देखील वर आकाशाकड़े पाहिले ! 

आणि वर हात दाखविला आणी मलाही घट्ट मिठी मारली आणी गहिवरल्या नेत्रानी दूरदूर वर हात उंचावत आमचा निरोप घेतला होता ..! हे काय कळले नाही ! पण मन मात्र विचारात मग्न झाले . असा अनुभव आपल्याला अगदी जवळच्या प्रेमाच्या माणसांबाबतीत देखील क्वचितच अनुभवास येतो ,हे वास्तव नाकारता येत नाही …!

इथून तिथून सर्व जगतात मानव आणि मानवता यांची संवेदनशीलता यांची या भेटीत जाणीव झाली. मानवी निष्पाप प्रेमभावस्पर्श हे एकच असतात. प्रेम , आपुलकी , आस्था , ओढ़ , काळजी , दानत , त्याग , कृतज्ञता , समाधान ही संस्कारित कनवाळू मानवी मनाची संवेदनांची प्रतीके सर्व त्रिभुवनात एकसारखी आहेत….!!!

ती विनामूल्य सहज देण्यासारखी आहेत. अबुधाबीचे हे मानवी मनाचे मन्सूरअली व्यक्तिमत्व भाषेच्या पलीकडे असूनही निरागस प्रेम भाव स्पर्शातून आत्मीयतेचे दर्शन देवून जन्मोजन्मीचे ऋणानुबंध सांगून गेले हे मात्र खरे …!!!!!!!!

इती लेखन सीमा

 

वि.ग.सातपुते ..

संस्थापक अध्यक्ष:

महाकवी कालिदास प्रतिष्ठान

पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाडा, (महाराष्ट्र )

📞( 9766544908 )

 

 

कांदिवली मध्ये धनगर समाज विकास मंडळा तर्फे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम संपन्न

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

मुंबई मधील कांदिवली पश्चिम या उपनगरा मध्ये धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने ३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता कांदिवली चारकोप येथील मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत यांचे घरी प्लाट नंबर २४२,रुम नंबर डी ४६, सेक्टर २, गणेश मंदिर गल्ली या ठिकाणी कांदिवली मधील धनगर समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये अपराजित यौध्दा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम संपन्न झाला.सुरुवातीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दिप प्रज्वलीत करून,भंडारा लावून, विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी धनगर समाज विकास मंडळाचे प्रवक्ते , संस्थापक सदस्य, पत्रकार, साहित्यिक, गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी अपराजित यौध्दा भारताच्या स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनाबद्दल, कार्याबद्दल, माहिती सांगितली.आणि उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले.अशा प्रकारचे उत्सव, जयंती, पुण्यतिथी समाजात होऊन गेलेल्या महान व्यक्ती च्या नावाने करायला हवे.असे सांगितले.

या जयंती प्रसंगी भारत कवितके, जेष्ठ समाज बांधव दशरथ लाळगे, संस्थापक सदस्य आप्पासाहेब कुचेकर, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत, मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र काळे, संस्थापक सदस्य सदानंद लाळगे सर, समाज बांधव किसन बरगडे, समाज बांधव राजेंद्र लाळगे,सौ.आशा भगत, कुमारी श्रावणी भगत व इतर समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

पाणीदार माणूस मधुकर धस यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्ताने त्यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण

पाणीदार माणूस मधुकर धस यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्ताने तुरोरी तालुका उमरगा या ठिकाणी समाधीस पुष्पहार अर्पण करून समाज विकास संस्थेचे सचिव महाराष्ट्र लोकविकास मंचाचे कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ,अनाथाची माय विद्याताई वाघ, आप्पा जाधव,भाग्यश्री मोरे, आफ्रिन मुल्ला, कृष्ण पाटील, प्रशांत ढवळे, यांनी अभिवादन केले.

भोगजी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी जन्म झालेले मधुकर धस हे 1990 झाले यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेले. त्या ठिकाणी दिलासा संस्था स्थापन करून महाराष्ट्रातल्या 14 ते 20 जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी काम केलं. महाराष्ट्रातील विशेष थोर समाजसेवक, बाबा आमटे मकरंद अनासपुरे नाना पाटेकर विश्वात्मा तोडकर आमिर खान, देवेंद्र फडणवीस यांना वेड लावणारे कार्य मधुकरणी पाण्यासाठी उभे केले, या जलनायकास समाज विकास संस्था महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.

कवी इंद्रजीत पाटील पुरस्काराने सन्मानित

 हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित यांची जयंती व पुण्यस्मरणाचे आैचित्य साधून कवी इंद्रजीत पाटील यांना स्वदेशी भारत सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार – २०२४ ने सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ‘ कळ पाेटी आली आेठी ‘ या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहास हा पुरस्कार देण्यात आला.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमंत शिवरूपराजे उर्फ बाळराजे खर्डेकर ,अध्यक्ष श्री.अरविंदभाई मेहता,श्री.पंडीतराव लाेहाेकरे,श्री.रवींद्र बेडकीहाळ,श्री.धैर्यशील भाऊ देशमुख,सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे,विद्या दाैलत सरपाते,श्रीमंत.धीरेंद्रराजे खर्डेकर,श्री.जीवन इंगळे गुरूजी,श्री.रघुवीर नारायण माने-पाटील,श्री.प्रमाेद सदाशिव झांबरे व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना सुपूर्द करण्यात आला.

या कवितासंग्रहास मिळालेला हा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार असून श्री.काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान व स्वदेशी भारत बचत गट संकुडे मळा,आसू,ता.फलटण, जि.सातारा याठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले.श्री.काळेश्वर मंदिर,आसू याठिकाणी बहारदार काव्यसंमेलनाचा कार्यक्रमही पार पडला.श्री.प्रकाश सकुंडे गुरूजी,वसंत सकुंडे व इतर संयाेजक कमिटीने सदर कार्यक्रमाचे फार सुंदर नियाेजन केले.कवी इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. मित्र,नातेवाईक यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदन व हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.