Engage Your Visitors!

परम पूज्य स्वामी विद्यानंद यांचे गरुकृपांकीत साधक स्वामी कृष्णानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन

परम पूज्य स्वामी विद्यानंद यांचे गरुकृपांकीत साधक स्वामी कृष्णानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे १० डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी श्री.संत यांच्या भुवनी सत्संगात प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्रीयुत आदरणीय किरण पांडे, श्रीयुत देवेन पांडे,व परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद ,श्रीयुत प्रम़ोद कुलकर्णी उपस्थित होते.छोट्या खाणी झालेला प्रकाशन सोहळा परमपूज्य श्री. स्वामी विद्यानंद चरित्रामृत या महान ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 

हा ग्रंथ स्वामी विद्यानंदांचा सर्वच साधकांना अधिक सद्गुरूंप्रती प्रेम श्रद्धा ,दृढ विश्वास वाढण्यास तसेच सद्गुरूंचे अनुभव वाचून आनंद देणारे हे चरित्र सत्य अनुभव लिखित केलेले पद्य रूपात, साकी बद्ध रचनेतून प्रकटलेले स्वामी साधकांचा हृदयात स्थितप्रज्ञ स्थितीत जाणवतील. मज हृदयी सद्गुरू या भूमिकेतून दिसतील यात शंका नाही. सर्व मान्यवरांचे संदेश त्यांचा वक्ततेतून झाले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व प्रसाद देऊन सांगता झाली.

नासिक येथे पंचवटी भागात शिवमल्हार सेवाभावी संस्थेतर्फे हळदीचा भंडारा

नासिक येथे पंचवटी भागात शिवमल्हार सेवाभावी संस्थेतर्फे शक्ती नगर येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला या बारा गाड्या ओढण्याचे मानकरी विशाल खंडागळे होते. त्यांनी हळदीचा भंडारा उधळीत बारा गाड्या ओढल्या. बारा गाड्यांच्या मध्यभागी खंडेराव महाराजांचा मुखवटा ठेवण्यात आला होता.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांच्या हस्ते पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात झाली. बारा गाड्या ओढण्याच्या आधी देवतांची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होऊन रात्री जागरण व गोंधळाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांनी केले होते. यावेळी बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित होती. उदय गांगुर्डे, निवृत्ती जेऊघाले, राजेंद्र भडांगे, मंगेश चव्हाण, बाळू दादा पवार, गणेश कुमावत तसेच बरेचसे वाघे मंडळी ही उपस्थित होती.

 बाळासाहेब वाकचौरे, नाशिक

गुरूकृपांकीत परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांनी लिहिलेल्या ‘ब्रह्म साम्राज्यातील ऐश्वर्य योग’ या ग्रंथाचे प्रकाशन

गुरूकृपांकीत परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांनी लिहिलेल्या ‘ब्रह्म साम्राज्यातील ऐश्वर्य योग’ या ग्रंथाचे प्रकाशन, दिव्योन्मेष सत्संग – पुणे आयोजित करीत आहे. वरील ग्रंथ हा मानवी जीवनाच्या अध्यात्मिक मूल्यांना धरून वेद स्वरूपातील सनातन मूल्यांचा आधार स्वरूप आहे. महाविष्णूच्या अतिमानसिक जाणिवेतून स्पंदित झालेले प्रथम वेद म्हणजेच ‘चतुःश्लोकी भागवत’होय. एकट्या ब्रह्मदेवाला ससंवेद्य झालेले ईश्वरीय मार्गदर्शन, जे मानव जीवनास पूर्णयोगाप्रत कसे नेते याचे विलक्षण स्वरूप या ग्रंथाचा मूळ विषय आहे.

 तारीख – ५ जानेवारी २०२५, रविवार

 स्थळ – गांधी भवन बधाई स्वीटमार्ट चौकातून गणंजय सोसायटी, वुडलॅन्ड सोसायटीच्या पुढे, अंधशाळेसमोर, रोहनकाॅर्नर सोसायटी जवळ, महात्मा सोसायटीकडून कमिन्स कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता कोथरूड , पुणे.

 कार्यक्रमाची रूपरेषा

वेळ – सायंकाळी 

४.४५ ते ५.३० स्वागत, अल्पोपहार.

५.३० ते ७.३० ग्रंथ प्रकाशन.

 प्रसाद भेट.

ग्रंथ प्रकाशन खालील मान्यवरांच्या हस्ते होईल.

 परम पूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

(श्रुती सागर आश्रम, फुलगाव)

आदरणीय श्रीमती कल्याणीताई नामजोशी

(प्रख्यात प्रवचनकार, पुणे)

 परम श्रद्धेय आईसाहेब

(दिव्य जीवन वाटिका आश्रम, वडकी)

 आदरणीय जयंतराव देसाई

(कार्याध्यक्ष स्वरूपानंद सेवामंडळ, पावस)

 

 सर्वांनी वरील कार्यक्रमास जरूर उपस्थित राहून शुभेच्छा व शुभाशिर्वाद द्यावेत.

 

आपले

दिव्योन्मेष सत्संग

9503131202/ 9422987447

 

 स्वरूप स्वानंद एकचि जाणे, गुरुतत्वासी नित्य स्मरावे !!

कार्तिकी पायवारी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी पायवारी दिवे घाटातील काही क्षणचित्रे

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी दिवशी कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते, त्या यात्रेची सांगता शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गोपाळपूर येथील पौर्णिमेच्या काल्याने संपन्न झाली.आणि त्याच दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर हून श्री क्षेत्र आळंदी कडे वारकऱ्यांची पायवारी सुरू झाली.श्रीक्षेत्र पंढरपूर भंडीशेगांव,तोंडले बोंडले, वेळापूर,खुडूस,पुरंदावडे शाळा, नातेपुते, धर्म पुरी,बरड पेट्रोल पंप,विडवणी,निबोरे, तरडगाव,निरा कनल,कामटवाडी, जेजुरी,सासवड मळा, सासवड, दिवे घाट,वडकीनाका, हडपसर, विश्रांतवाडी, आणि श्री क्षेत्र आळंदी असा कार्तिकी पायवारीचा प्रवास सालाबादप्रमाणे यंदाही संपन्न होत आहे.

मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी माऊलीच्या श्रीक्षेत्र आळंदी येथे मोठी कार्तिकी यात्रा भरत आहे.या पंढरपूर ते आळंदी पायवारीत श्री.सद् गुरु वै.ह.भ.प.आप्पासाहेब वासकर महाराज फड या मधील वारकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.या फडा मध्ये मुंबई कांदिवली येथील धनगर समाज विकास मंडळातील जवळजवळ ३५ ते ४० वारकरी बांधव सहभागी झाले आहेत.अभंग, गौळण,भारुड टाळ मृदुंग सोबत वारकरी गात वाजवत तल्लीन होऊन देहभान विसरून पायवारीत सहभागी झाले होते.

कांदिवली पश्चिम येथे उत्तर भारतीय महिलांद्वारा ” छटपूजा” मोठ्या उत्साहात पार पडली

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

कांदिवली पश्चिम येथील बजरंग सोसायटी जवळ, महावीर शाळे शेजारी असलेल्या मैदानात श्री.बजरंग एस,आर,ए, सोसायटी, श्री.साईकृपा एस.आर.ए.सोसायटी, आणि जनता कल्याण कारी एस.आर.ए.सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागातील उत्तर भारतीय महिला भगिनी करिता छटपूजा चे आयोजन करण्यात आले होते.गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सूर्यास्ता वेळी पाण्यात उभे राहून महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात छटपूजा केली.

या ठिकाणी पाण्याचा मोठा कृत्रिम तलाव बनविण्यात आला होता.मुलांच्या कल्याणासाठी, प्रगती साठी,व ज्यांना संतान नाही ते यावेळी नवस बोलतात,व काही महिला भगिनीं नवस पूर्ण करण्यासाठी छटपूजा करतात.आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या नंतर जल अर्ज करुन छटपूजा पूर्ण करतात,व उपवास सोडतात.कृत्रिम तलावाच्या भोवती जागोजागी ऊस उभा करून पणत्या लावून महिला भगिनीं पाण्यात उभ्या राहून छटपूजा करत होत्या.धार्मिक गाणी गायली जात होती,या प्रसंगी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कांदिवली पोलिस ठाणे येथून पोलिस अधिकारी व पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या विभागातील अनेक मान्यवर पुरुष व महिला उपस्थित होते.बजरंग सोसायटी चे चेअरमन रविंद्र राऊत यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे मुख्य प्रवर्तक विजय पाल जी, यांचा सत्कार करुन स्वागत केले.तसेच ललन राव यांनी श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव भारत कवितके यांचा सत्कार करुन स्वागत केले.या प्रसंगी रविंद्र राऊळ,ललन राव,टिंकू खान, विजय पाल, भारत कवितके, कुमार सुगावे, निजामुद्दीन, राजेश यादव, प्रविण पाल, प्रभात पाल,सह तिन्ही सोसायटी चे पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.छटपूजा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील पुरुष व विशेषतः महिला भगिनीं परिश्रम घेतले.