Engage Your Visitors!

कार्तिकी पायवारी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी पायवारी दिवे घाटातील काही क्षणचित्रे

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी दिवशी कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते, त्या यात्रेची सांगता शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गोपाळपूर येथील पौर्णिमेच्या काल्याने संपन्न झाली.आणि त्याच दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर हून श्री क्षेत्र आळंदी कडे वारकऱ्यांची पायवारी सुरू झाली.श्रीक्षेत्र पंढरपूर भंडीशेगांव,तोंडले बोंडले, वेळापूर,खुडूस,पुरंदावडे शाळा, नातेपुते, धर्म पुरी,बरड पेट्रोल पंप,विडवणी,निबोरे, तरडगाव,निरा कनल,कामटवाडी, जेजुरी,सासवड मळा, सासवड, दिवे घाट,वडकीनाका, हडपसर, विश्रांतवाडी, आणि श्री क्षेत्र आळंदी असा कार्तिकी पायवारीचा प्रवास सालाबादप्रमाणे यंदाही संपन्न होत आहे.

मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी माऊलीच्या श्रीक्षेत्र आळंदी येथे मोठी कार्तिकी यात्रा भरत आहे.या पंढरपूर ते आळंदी पायवारीत श्री.सद् गुरु वै.ह.भ.प.आप्पासाहेब वासकर महाराज फड या मधील वारकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.या फडा मध्ये मुंबई कांदिवली येथील धनगर समाज विकास मंडळातील जवळजवळ ३५ ते ४० वारकरी बांधव सहभागी झाले आहेत.अभंग, गौळण,भारुड टाळ मृदुंग सोबत वारकरी गात वाजवत तल्लीन होऊन देहभान विसरून पायवारीत सहभागी झाले होते.

गोमंतकीय कवि नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना महाराष्ट्रात “काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार”

रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली महाराष्ट्र ‘सप्ताह फुलांचा’ या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल तसेच रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.त्यात फोंडा गोवा रहिवासी,एकमेव गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी (एनटिसी एड्युकॅअर नवचैतन्य चे संस्थापक) यांनी पण काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल गोव्यातील साहित्यप्रेमींकडुन आनंद व्यक्त करित अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हा नामवंत पुरस्कार प्राप्त केलेल्यात गोव्यासहीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात राज्यातील साहित्यिकांचा समावेश आहे.नम्रता खरे,मुंबई,खेमदेव हस्ते,केशव वामनराव डफरे,वैशाली जगताप बोरसे, धुळे,डॉ.सौ.मीनाक्षी नरेंद्र निळेकर, माजलगाव,सौ. प्रगती पाताडे ,ओरोस,डॉ गीता वाळके, नागपूर,अनुराधा जोशी,अंधेरी,सुमन ताई मुठे नासिक,नवनाथ रामकृष्ण मुळवी,फोंडा-गोवा,सौ शोभा प्रकाश कोठावदे,मुंबई,लीलाधर दवंडे,नागपूर,सुभाष अनंतवार (तात्या) नाशिक,हर्षा भुरे,भंडारा,सौ. पुष्पा निलकंठ येवलकर,नाशिक,सौ. तृप्ती भंडारे,नालासोपारा,स्मिता सुहास भीमनवार,पुणे,विठ्ठलराव खोटरे ( देवर्डा)अकोला,सौ.सिमा मंगरुळे तवटे,वडूज,सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर,नाशिक,प्रा. मन्नाडे रमा धनराज,लातूर,श्री अशोक महादेव मोहिते,बार्शी,श्री पांडुरंग एकनाथ घोलप, रोहोकडी, शिवाजी खाशाबा सावंत,पुणे,सौ.सुलभा दिपकराव गोगरकर, अमरावती,सौ.सारिका लाठकर, नांदेड,सुजाता उके,नागपूर,संदीप भुक्कन पाटील, खिडकाळी,माधुरी अमृतकार,नाशिक,सरोजनी करजगीकर,परभणी,गिरीश भट, पनवेल,संगीता घोडेस्वार,चंद्रपूर,गवाजी बळीद, अहिल्यानगर,विमल बागडे, नाशिक,कल्पना पवार,मुकुटबन,साधना ब्राम्हणकार, मालेगाव,वैजयंती गहूकर,चंद्रपूर,दिलीप देशपांडे, बीड,सुजाता एन. अवचट, गडचिरोली,पद्माकर वाघरूळकर, छ. संभाजीनगर, वासुदेवराव सोनटक्के, अकोला,ओंकार राठोड, दारव्हा यवतमाळ, स्वरा संदेश गमरे, मुंबई,संगीता जामगे,गंगाखेड,कमलताई साळवे, बुलढाणा,चिरंजीव बिसेन,गोंदिया,श्रीमती.उषा.ज.कांबळे, कोथरूड पुणे,उमेश बाऱ्हाटे, परभणी आणि सुवर्णा तावरे, वीटा अशा तब्बल ४९ साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.

रचना प्रकाशन साहित्य समुह प्रशासन समितितील मा.देविदास गायकवाड (परीक्षक) मा.दिनेश मोहरील (निरीक्षक) मा.वंदना मडावी (प्रशासिका) मा.सुजाता उके. (प्रशासिका) मा.सुनिता तागवान (संस्थापक/ग्राफिक्स) आणि मा.डाॅ.प्रा.शिलवंतकुमार मडावी (मार्गदर्शक) यांनी सर्व साहित्यिकांचे अभिनंदन करून पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना स्वरमित्र पुरस्कार

सप्तस्वर इंटरनॅशनल संस्थेतर्फे संस्थेचे सचिव आणि ज्येष्ठ गायक विश्वास धोंगडे यांच्या शुभहस्ते विश्व विख्यात शीळवादक आणि गायक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ऑनलाईन संगित मैफिलीत ‘स्वरमित्र ‘ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह नेपाळ,भूतान रशिया,मलेशिया,कंबोडिया इंडोनेशिया,हाॅलंड, मकाऊ, कंबोडिया,माॅरिशस,सिंगापूर न्यूझीलंड व्हिएतनाम आदि 20 देशात शीळवादन आणि जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी

विनामूल्य सादर करुन रसिकांना दिलासा देत सोबत
मानवधर्म:श्रेष्ठ धर्माचा प्रसार केला त्याबद्दल डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘ स्वरमित्र ‘ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्याचे विश्वास धोंगडे यांनी सांगितले. मधुस्वर इंटरनॅशनल संस्थेच्या निमंत्रक डाॅ.सुवर्णा सुत्रावे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी झालेल्या विशेष ऑनलाईन संगित मैफलीत डाॅ.मधुसूदन घाणेकर तसेच विश्वास धोंगडे, वर्षा चेके,यांनी सादर केलेल्या जुन्या हिंदी – मराठी गाण्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कवि सरकार इंगळी यांचे कडून निराधर आश्रामास रेशन साहित्य मदत 

कवि सरकार इंगळी व त्यांचे सहकारी यांनी निराधर आश्रमात रेशन साहित्य देऊन मदतीचा हातभार लावला आहे. आष्टा तालुका पलूस येथील अमर गंगथडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून चालवत असलेल्या निराधर आश्रमात वयवृद्ध पुरुष महिला ‘दिव्यांत’ मनोरुग्ण अशा व्यक्तीची समाजसेवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आहेत . कोणतेही शासनाचे अनुदान देणगी मिळत नसताना समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीने ते निरावर लोकांच्याकाठी आश्रम चालवत आहेत. 

कवि सरकार इंगळी यांनी त्यांच्या आश्रमात जाऊन निरांधराना रेशन साहित्य मदत देणेचे कार्य केले आहे यासाठी अनिल दानोळे (दिवाणजी ) भरत कणिरे ‘ हसन पटेल माळवे व्यापारी ‘ प्रदिप कोळी प्रशांत भातमारे इंगळी विकास सोसायटी नंबर १ व २ स्वस्त धान्य दुकान . जिनेंद्र अकिवाटे यांचेही यांचेही मोलाचे सहकार्य लाभले .

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व प्रमोद न.सूर्यवंशी यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

साप्ताहिक आम्ही मुंबईकर चे संपादक प्रमोद न.सूर्यवंशी यांना पत्रकारीता , सामाजिक, सााहित्यिक व कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई स्थित ‘जॉय सामाजिक संस्थेचा’ ‘आदर्श संपादक’ पुरस्कार जाहिर झाला आहे.

जॉय या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम फेब्रुवारी २०२५ मध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

संस्थेच्या वतीने मुंबई येथे होणा-या या सामाजिक कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यांत येणार आहे. आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक अध्यात्म पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री. प्रमोद सूर्यवंशी यांच्ये कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

हे वृत्तपत्र गेल्या दोन वर्षापासून चालवित आले असून हे साप्ताहिक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या कानाकोप-यात वाचले जात आहे. उत्कृष्ट कामगिरीची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे जॉय चे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे म्हणाले.

रियल क्रिएटिव्ह आर्ट फाउंडेशन कडून हिवाळी सहलीचे आयोजन

रियल क्रिएटिव्ह आर्ट फाउंडेशन कडून हिवाळी सहलचे आयोजन 15 नोव्हेंबर करण्यात आले. या सहल मध्ये पाच स्थळांचा समावेश असून पहिले स्थानांचे नाव घोगरामहादेव, मिनी गोवा, कुवारा भीमसेन, पंचवटी हनुमान, कोराडी या स्थळांचा समावेश होता पिकनिक सकाळी हनुमान नगर त्रिकोणी मैदान इथून आठ वाजता निघाली.

प्रथम आम्ही कुवारा भीमसेन गाठलं त्यानंतर घोगरा महादेव तिथे गेल्यानंतर ते जेवणाची अरेंजमेंट केलेलीच होती. भोजन केलं, त्यानंतर आम्ही पंचवटी हनुमान हे स्थळ पाहिलं. नंतर येताना कोराडी देवी भेट दिली व रात्री आम्ही आठ पर्यंत हनुमान नगर येथे पोहोचलो या पिकनिक मध्ये एकूण शंभर लेडीजचा समावेश होता. लेडीज ने सहलचा भरपूर आनंद घेतला व अशी रमणीय स्थळे बघून त्या खूप आनंदी झाल्या.

 

पुन्हा पुन्हा अशीच पिकनिक काढावी अशी विनंती केली. रियल क्रिएटिव्ह ऍड फाउंडेशनच्या अध्यक्षिका रंजना अशोक शिंगाडे यांनी सर्व लेडीज कडे लक्ष दिले व त्यांना सुखरूप घेऊन आल्या. सर्वांनी सहलचा सहल मध्ये भरपूर मजा मस्ती केली सहल आयोजकांनी सर्व लेडीजचे आभार व्यक्त केले. 

 

भारती महाडिक यांना हास्यविद्यावाचस्पती उपाधि

भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष भारती महाडिक यांना नुकताच डाॅ.मधुसूदन घाणेकर विश्वहास्य पीठातर्फे , पहिल्या जागतिक हास्य परिषदेचे अध्यक्ष(2004) सबकुछ सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.  भारती महाडिक या सतत हसतमुख राहून राष्ट्रहित आणि आत्मनिर्भर भारत या अंतिम उद्दिष्टाचे भान ठेवून अविरतपणे कार्यरत असतात” असे गौरवोद्गार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी उपाधि प्रधान करताना काढले.

“हसण्यासाठी उपजत मोठे मन लागते, सकारात्मकता दुर्दम्य आशावाद त्यातुन साध्य होऊन संपूर्ण आयुष्यच सार्थक
ठरल्याचे आत्मिक समाधान मिळते” असे हास्ययोगाचे महत्व सांगुन विरोधाभासातून हास्य कसे खुलते याची मजेशिर व्यवहारिक उदाहरणे देऊन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मधुरंग इंटरनॅशनल फिल्मच्या निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले.

“भारतीय जनता पार्टी आणि उच्च आदर्शवादी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन कायम घडत असल्यानेच मी समाज विकासासाठी थोडेफार योगदान करु शकते” या शब्दात सत्काराला उत्तर देताना भारती महाडिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मधुरंगच्या कार्यध्यक्ष मंदाताई नाईक, आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या शीळवादक अनघा सावनूर आगाशे, वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष वसुधा नाईक, काव्यशिल्प संस्थेच्या माजी अध्यक्ष अपर्णा आंबेडकर, महिला सन्मान संस्थेच्या सचिव दीपाराणी गोसावी, युवा विश्व च्या सचिव सुचेता प्रभुदेसाई यांचीही भाषणे झाली.

भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग यांनी समारोप केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संमोहन तज्ञ सुभाष भागवत यांनी आभार मानले. युवा कार्यकर्त्या माधुरी भागवत यांनी आभार मानले. याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाचा विश्वविक्रमी 598 वा अंक प्रकाशित करण्यात आला.

मगर महाविद्यालयाची ऐश्वर्या पाटील कुलपती ब्रिगेड उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी – राजेंद्रकुमार शेळके

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु. ऐश्वर्या पाटील या विद्यार्थिनीस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे दि. ६ ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या आव्हान – २०२४ या राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरामध्ये आव्हान – २०२४ कुलपती ब्रिगेड उत्कृष्ट स्वयंसेविका हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या शिबिराच्या समारोप प्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते, जिल्हााधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. विद्या शर्मा या मान्यवरांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. या शिबिरात राज्यातील २३ विद्यापीठातील एकूण १०४८ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड संदिप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा.एल.एम. पवार , सहाय्यक सहसचिव मा. ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, यांनी ऐश्वर्या पाटील हिचे अभिनंदन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सदानंद भोसले यांनी कु. ऐश्वर्या पाटील हीचे कौतुक केले.

आमचे मुंबई प्रतिनिधी गीतकार भारत कवितके यांच्या लेखणीतून साकारलेले ” आठव आठव राणी…” प्रेम गीत युट्यूबवर रसिकांच्या भेटीला

आमचे मुंबई प्रतिनिधी गीतकार भारत कवितके यांच्या दमदार,सकस लेखणीतून साकारलेले” आठव आठव राणी..” हे प्रेम गीत युट्यूबवर रसिकांच्या भेटीला नुकतेच प्रसारित झाले आहे.अगदी थोड्या अवधीत या प्रेम गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.तरुणाच्या गळ्यातील ताईत बनलेले हे गीत वृध्दांना ही आपल्या तरुण वयातील आठवणी जाग्या करून जातात.

आठवणी ताज्या टवटवीत होतात.पीपी म्युझिक प्रेझेंट कंपनी व्दारा निर्माते श्रीराम घडे, गीतकार आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके, गायक विकास साळवे, संगीत चंदन कांबळे, आणि विशेष सहाय्य गौतम पुंडे,व प्रमोद सूर्यवंशी या सर्वांच्या परिश्रमाने हे गीत प्रेक्षणीय, श्रवणीय झाले आहे.छायाचित्रण, संगीत, शब्द,ताल,सूर, सादरीकरण सर्व बाजूंनी या गाण्याने रसिक मनाला भुरळ घातली आहे.भारत कवितके यांनी आपल्या वयाच्या ६५ व्या वर्षी हे प्रेम गीत लिहून आपल्या लेखणीचा चमत्कार दाखविला आहे.

भेटीचे बहाणे,नकारात होकार देणे, मंदिरात एकटीने जाणे,अंगास बिलगणे, लटक्या रागाने दूर जाणे, सुखासाठी नवस करणे, हुंकार प्रश्नांचे, पावसात चिंब चिंब भिजणे, वगैरे वगैरे शब्द प्रयोगामुळे तरुणां बरोबर वृद्धांच्या काळजाची धडधड वाढते.पावसात तरुणीचे बेधुंद, बेहोश होऊन नाचणे, तरुणीचे रोज नवे नवे बहाणे, गृहिणी चा साज शृंगार, या सर्व गोष्टी रसिकांना भुरळ पाडतात, एकंदरीत गीतकार भारत कवितके यांचे ” आठव आठव राणी..” हे प्रेम गीत रसिकांच्या पसंतीला उतरले असल्याचे रसिकांनी आपल्या प्रतिक्रिया मधून दिल्या आहेत.

 

युवा स्वयंरोजगारासाठी समाज विकास संस्थेची तपश्चर्या

येथील समाज विकास संस्थेच्या वतीने युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी निरंतर कार्य केले जाते वात्सल्या बालगृहाच्या माध्यमातून मुलांचं निवास भोजन शिक्षण आणि भविष्यकाळातील स्वयंरोजगारासाठी विशेष कार्य करत असताना. युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून नर्सिंग कॉलेज सुरू करून उमरगा लोहारा तालुक्यातील व परिसरातील युवकाना नर्सिंगच्या GDA माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जात आहे.

 तसेच ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या युवकांना ड्रायव्हिंग प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना लायसन मिळऊन दिले जाते.आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरणा दिली जाते. प्रशिक्षणासाठी होणारा खर्च समाज विकास संस्थां आणि वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत केला जातो. हा अनोखा प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील धाराराशिव कळंब,उमरगा आणि लोहारा या चार तालुक्यातून राबवला जातो.सध्या 25 युवकांची एक बॅच पूर्ण झाली असून त्यांना कायमस्वरूपी लायसन मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर नवीन 25 युवकांची बॅच सध्या प्रशिक्षण घेत आहे. हा अनोखा प्रयोग स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवला जात आहे.याची धन्यता पत्रकारांशी बोलताना समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केली.

 या प्रशिक्षण कार्यासाठी कुलकर्णी ड्राइविंग स्कूल धाराशिव उमरगा यांची मदत घेतली जात आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी, समाज विकास संस्थेच्या व्यवस्थापिका विद्याताई वाघ,अजित पाटील, गौरव मस्के, वात्सल्य ट्रस्ट मुंबई हे विशेष परिश्रम घेत आहेत.