Engage Your Visitors!

संविधानिक मूल्यांची जपणूक व्हावी- संघपाल महाराज

संविधानिक मूल्यांची जपणूकीची जेवढी जबाबदारी सरकारची आहे तेवढीच जनतेचे ही जबाबदारी आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य संघपाल महाराज पवनुरकर यांनी केले सदर कार्यक्रम साकेत बुद्ध विहार करंजी भोगे येथे 26 नोव्हेंबरला संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली या कार्यक्रमाला अतिथी म्हणून सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर कीर्तनाला सुरुवात झाली यामध्ये विविध सामाजिक विषयासोबतच संविधान जागृती आणि संत महापुरुषांचे विचार मांडण्यात आले राष्ट्रवंदनेने या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबोधनकार धम्मनाथ शिव जगताप सुकळीकर धनराज बलवीर राजू गेडाम विजय कोल्हे वर्षा ठोंबरे मानिक नागदेवते वर्षा थुल त्रिवेणी वाघमारे झांबरे साहेब प्राध्यापक खोब्रागडे कडूजी लांबसंगे सोनलताई भोगे सरपंच पूनम ताई मडावी पोलीस पाटील अखिल बहुजन संगीत कला मंच यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला बौद्ध उपासक उपाशीका समता सैनिक दल , किर्तन प्रेमी जनता व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रेग्युलस ताऱ्याची भेट – भाग २

डॉ. मधुसूदन घाणेकर हे संमोहन प्रयोग करतात. ब्रह्मध्यान प्रयोग करतात. ब्रह्मध्यान प्रयोग करताना आलेला माझा अनुभव प्रथम कथन करते. डॉक्टर घाणेकर यांच्या आईच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी ब्रह्मध्यान घेतले होते. या ब्रम्हध्यानामध्ये मी स्वतः हरवून गेले होते. प्रत्यक्ष अनुभव ब्रम्हध्यानाचा घेतलेला होता. कोणतेही काम ते स्वतःला झोकून करतात. मनापासून करतात त्यामुळे त्यांच्या कार्याला नेहमी पावती उत्तम मिळते. उत्तम प्रतिसाद मिळतो.परमोच्च आनंद त्यांना मिळतो. समोरच्याच्या चेहर्‍यावरील आनंदात ते हरवून जातात.

डॉ. घाणेकरांनी ‘नक्षत्र डॉट कॉम ‘ वर एक शॉर्ट फिल्म तयार केली होती ही फिल्म २७ स्क्वेअर फुट एरियातच तयार झाली होती. या फिल्मची संकल्पना,संकलन, कथा,पटकथा, गीत लेखन,प्रमुख भूमिका, दिग्दर्शन,संगीत गायन, शीळ वादन, आदी वीस जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे सत्तावीस अभिनेत्रींना बरोबर घेऊन त्यांनी आपली भूमिका चोख वठवलेली आहे. आणि एक ‘विश्वविक्रम ‘नोंदवलेला आहे.

‘पाऊस’ या लघुपटासाठी डॉक्टर घाणेकर यांनी वैयक्तिक आंतरराष्ट्रीय पातळीवर १२ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. जवळजवळ एकशे पन्नास हुन आंतरराष्ट्रीय परिषदा आणि महत्त्वपूर्ण साहित्य संमेलनाचे ‘अध्यक्षपद’ यांनी भूषविले आहे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, तलत, मुकेश, हेमंत कुमार, अमीन सायानी,देवानंद, पु. ल. देशपांडे, केशवसुत, शेक्सपियर, चार्ली चापलीन, आदींच्या नावाने यांना पुरस्कृत केलेले आहे. अशा ह्या रेग्युलस ता ऱ्याची अणि माझी भेट ही नक्कीच अविस्मरणीय आहे.

 

 वसुधा वैभव नाईक 

 धनकवडी,जिल्हा- पुणे 

मो. नं. 9823582116

जुन्या गाण्यांनी ज्येष्ठ राहतात चिरतरुण – डाॅ.मधुसूदन घाणेकर 

जुन्या गाण्यांनी आठवणी उजळून येतात. जुनी गाणी ऐकल्याने बहरतात आठवणी आणि त्यातून प्राप्त होत रहाते. चिरतारुण्य ! आणि म्हणून आयुष्याच्या तिन्हीसांजवेळी प्रत्येक ज्येष्ठाने गात रहावे, गुणगुणत रहावे ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे गायक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. सांजभेट संस्थेतर्फे ‘ गाते रहो ‘ ही संगीत संध्या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले.

अनघा सावनूर आगाशे (स्वरचित महात्मा फुले यांच्यावरील गीत), शलाका गाडगीळ(हृदयी प्रित जागते )अशोक चव्हाण (ओ मेरे सनम) मनीषा सराफ (त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे गं ) , अशोक चव्हाण (वो दिल कहाॅसे लाऊ ), माणिक कुलकर्णी (क्या फूल चढाऊ ),मधुकर्णिका (फुललेरे कमळ फुललेरे ), पद्मा वेदपाठक (आकाश पांघरुन जग शांत झोपले रे ) बाबा ठाकूर (ऐंशी वर्षाची असून म्हातारी) आदिंनी स्वरसंध्या गाजवली.

समारोपात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी जुन्या गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आंतरराष्ट्रीय प्राप्त झालेली काही किशोरकुमार , हेमंतकुमार यांची गाणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप शुक्ल यांनी आभार मानले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते सर्व गायक गायिकांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

‘हिरवं सपन’ कथासंग्रहाला प्रथम पुरस्कार कवी सातपुते यांचा जळगावत उद्या सत्कार

जळगाव – लातूर येथील सुप्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार, लेखक भारत सातपुते यांच्या मराठी भाषेतील ‘हिरवं सपन’ या कथासंग्रहाला जळगावच्या हिंदी साहित्य गंगा संस्थेचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून उद्या बहुभाषिक साहित्य संमेलनात जळगाव येथे प्रदान केला जाणार आहे अशी माहिती या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्रियंका सोनी ‘प्रीत’ यांनी कळवले आहे.डॉ.सुहास गाजरे, दलीचंद्र जैन, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा आहे. विविध भाषेच्या २०२३ मधील साहित्यकृतींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रोखरक्कम ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र हे पुरस्काराचे स्वरूप असून जळगाव येथे शनिवार व रविवार असे दोन दिवशीय दहावे बहुभाषिक साहित्य संमेलन संपन्न होत आहे .या संमेलनात मराठी, हिंदी ,गुजरातीसह अनेक भाषेतील मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत .चर्चासत्र, परिसंवाद ,कवीसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम असे संमेलनाचे स्वरूप असून बहुभाषिक कवी संमेलनाचे सूत्रसंचालनही लातूरचे कवी भारत सातपुते हे करणार आहेत.

साहित्याच्या विविध वांग्मय प्रकारात भारत सातपुते यांची पाच डझन पुस्तके प्रकाशित झाली असून कथासंग्रह प्रकारात त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हिरवं सपन हा त्यांचा गतवर्षी प्रकाशित झालेला कथासंग्रह आहे. भारत सातपुते यांना आज पर्यंत 67 पुरस्कार लाभले आहेत .

“दिव्य योगसाधना, यज्ञ आणि नामसंकीर्तन करून जन्मदिवस साजरा!”

विविध सामाजिक उपक्रमांची आवड असलेले तसेच युवा भारत जिल्हाप्रभारी योगप्रशिक्षक अक्षय धानोरकर यांच्या जन्मदिवसनिमित्य योगभवन राठीनगर येथे सकाळी 6 ते 8 या वेळी योग वर्ग ,यज्ञ आणि नामसंकीर्तनचे आयोजन करण्यात आले होते. युवकांच्या समोर विज्ञान बरोबर आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवण्यासाठी जन्मदिवसनिमित्य अशा सुंदर त्रिसूत्री कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मत सचि प्राण प्रभू ( संन्यासी इस्कॉन मंदिर, अमरावती) यांनी व्यक्त केले व शुभाशीर्वाद दिले!

योगप्रशिक्षक अक्षय धानोरकर राज्यामध्ये शाळा, कॉलेज, हॉस्टेल, हॉस्पिटल, मंदिर तसेच विवध ठिकाणी योग वर्ग घेत असतात. राठी नगर येथील नियमित वर्गातील योगसाधकांना योगभ्यासचा लाभ होत आहे. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्रिसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी अक्षयजी यांनी योगवर्गाला सुरवात केली.

“यज्ञ” विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वंदना ताई पराते यांनी केला. तसेच “नामसंकीर्तन” इस्कॉन मंदिरातील प्रभू सचिप्राण बरोबर सर्वांनी केले, कार्यक्रमामध्ये पतंजलि युवा भारत प्रांत सदस्य सुधीर जी आसटकर यांनी संचालन केले, भिमराव जी सांगोळे सर, योगशिक्षिका सारिका ताई वासनिक, अर्चना ताई डोईफोडे, डॉ.वैशाली राठोड, डॉ.भोजराज चौधरी सर, ह.भ.प प्रकाश महाराज घोडस्कर, ब्रह्माण्डनायक हॉटेल संचालक भूषण भाऊ भालसाखर, प्रा.प्रमोद बेले सर, श्री गणेश देशमुख, प्रा.सचिन जोशी, विवेकानंद केंद्र शाखा अमरावती मधून श्री संजयजी पितळे, श्री चारुदत्तजी चौधरी, जीवनव्रती कार्यकर्ता संतोष दादा , हेल्पिंग फाउंडेशन चे संस्थापक अक्षय जवंजाळ व आनंद बागडे सर , सर्व योगसाधक मंडळी उपस्थित होते. माजी नगरसेवक प्रमोद दादा महल्ले, सोबतच सोशल माध्यमातून सर्व योगसाधक परिवार,सर्व सामाजिक संघटन द्वारे अनेक शुभेच्छा दिल्यात.

पुणे येथे सर्व शाखीय, सर्व प्रांतीय धनगर समाजाच्या आंतरराज्य भव्य वधू वर मेळाव्याचे आयोजन

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम 

रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ११वाजता ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुणे येथील महालक्ष्मी लान्स,100 फुटी डीपी रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वे नगर,पुणे 52 या ठिकाणी सर्व शाखीय सर्व प्रांतीय धनगर समाजाच्या आंतरराज्य भव्य वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था पुणे अध्यक्ष अंकुशराव भांड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.धनगर समाजातील सर्वात पहिला मेळावा सन 2000 साला पासून दरवर्षी होत असतो, यंदाचा 23 वा वधू वर मेळावा आहे, वधू वर परिचय पुस्तिका रंगीत प्रकाशित केली जाते.

लग्न जमविण्याचे जास्तीत जास्त प्रमाण, उच्च शिक्षित वधूवरांचे मोठे प्रमाण, वधू वरांना व्यासपीठावर जास्तीत जास्त परिचय साठी वेळ दिला जातो, विनम्र, सुसंस्कृत, निर्व्यसनी, सेवा भावी कार्यकर्ते मदतीस,अंध, अपंग उमेदवारांना मोफत नोंदणी अशी अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.धनगर समाजातील सर्व शाखीय सर्व प्रांतीय वधू वर नोंदणी करु इच्छित असतील तर संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव भांड हडपसर पुणे मोबाईल 9890088038 उपाध्यक्ष नागेश राव तितर आकुर्डी पुणे मोबाईल 9158086022, मेळावा अध्यक्ष रमेश नाचणं भवानी पेठ पुणे मोबाईल 8087957346, उपाध्यक्ष मधुकर लंभाते पिंपळे गुरव पुणे मोबाईल 9822061862 यांचेही संपर्क साधावा असे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी कळविले आहे.

गुरूकृपांकीत परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांनी लिहिलेल्या ‘ब्रह्म साम्राज्यातील ऐश्वर्य योग’ या ग्रंथाचे प्रकाशन

गुरूकृपांकीत परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांनी लिहिलेल्या ‘ब्रह्म साम्राज्यातील ऐश्वर्य योग’ या ग्रंथाचे प्रकाशन, दिव्योन्मेष सत्संग – पुणे आयोजित करीत आहे. वरील ग्रंथ हा मानवी जीवनाच्या अध्यात्मिक मूल्यांना धरून वेद स्वरूपातील सनातन मूल्यांचा आधार स्वरूप आहे. महाविष्णूच्या अतिमानसिक जाणिवेतून स्पंदित झालेले प्रथम वेद म्हणजेच ‘चतुःश्लोकी भागवत’होय. एकट्या ब्रह्मदेवाला ससंवेद्य झालेले ईश्वरीय मार्गदर्शन, जे मानव जीवनास पूर्णयोगाप्रत कसे नेते याचे विलक्षण स्वरूप या ग्रंथाचा मूळ विषय आहे.

 तारीख – ५ जानेवारी २०२५, रविवार

 स्थळ – गांधी भवन बधाई स्वीटमार्ट चौकातून गणंजय सोसायटी, वुडलॅन्ड सोसायटीच्या पुढे, अंधशाळेसमोर, रोहनकाॅर्नर सोसायटी जवळ, महात्मा सोसायटीकडून कमिन्स कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता कोथरूड , पुणे.

 कार्यक्रमाची रूपरेषा

वेळ – सायंकाळी 

४.४५ ते ५.३० स्वागत, अल्पोपहार.

५.३० ते ७.३० ग्रंथ प्रकाशन.

 प्रसाद भेट.

ग्रंथ प्रकाशन खालील मान्यवरांच्या हस्ते होईल.

 परम पूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

(श्रुती सागर आश्रम, फुलगाव)

आदरणीय श्रीमती कल्याणीताई नामजोशी

(प्रख्यात प्रवचनकार, पुणे)

 परम श्रद्धेय आईसाहेब

(दिव्य जीवन वाटिका आश्रम, वडकी)

 आदरणीय जयंतराव देसाई

(कार्याध्यक्ष स्वरूपानंद सेवामंडळ, पावस)

 

 सर्वांनी वरील कार्यक्रमास जरूर उपस्थित राहून शुभेच्छा व शुभाशिर्वाद द्यावेत.

 

आपले

दिव्योन्मेष सत्संग

9503131202/ 9422987447

 

 स्वरूप स्वानंद एकचि जाणे, गुरुतत्वासी नित्य स्मरावे !!

राजेंद्रकूमार शेळके यांची एन.आर.आय.सेलच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती 

ज्येष्ठ कवि,लेखक पत्रकर राजेंद्रकूमार शेळके यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभाग – एन. आर. आय. सेलच्या राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राजेंद्रकुमार शेळके हे गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांना आजवर अनेक सामाजिक संस्थानी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉँग्रेस कमिटीसाठि त्यांचे विशेष योगदान असून राज्यातील अनेक लोकांचे प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून समाजापुढे मांडुन त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

त्यांच्या या विशेष कार्याची दाखल महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घेत त्यांची सांस्कृतिक एन. आर. आय. सेल विभागाच्या राज्य सचिव पदी नियुक्ती केली आहे. पक्ष प्रमुख सोनिया गांधी, जेष्ठ नेते राहुल गांधी व महाराष्ट्र राज्य कॉँग्रेस कमिटी एन. आर. आय. सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विद्या कदम यांनी श्री. राजेंद्रकूमार शेळके यांचे अभिनंदन करून त्याना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल पुणे वैभवचे मुख्य संपादक प्रा. किरण जाधव, मुख्य व्यवस्थापक विजय जगताप. अजय भिसे ,जेष्ठ ग्रामीण कथाकार बबनराव पोतदार, कलारंजनचे मुख्य संपादक सागर भोगे,पत्रकार महेश घोलप,मनोहर हिंगणे,अजित पानसरे,आदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सुप्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांचा वाढदिवस शुभेच्छा व काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याने संपन्न

एक वर्षात ३६५ पुस्तक प्रकाशन करण्याचा नक्षत्राचं देणं काव्यमंचचा संकल्पाला काव्यसंग्रह “जंगल गाणी “प्रकाशनानी सुरुवात. नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष -प्रा. राजेंद्र सोनवणे-कवी वादळकार यांनी सुप्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने अभिनव असा हा रेकॉर्ड होणारा संकल्प केला आहे. याची सुरुवात आज पहिल्या पुस्तकांनी करण्यात आली. पाठ्यपुस्तक कवी उत्तम सदाकाळ यांचा बालकाव्यसंग्रह “जंगल गाणी” कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला.. यावेळी संस्थेच्या वतीने गोयल यांना डायरी, पुष्पगुच्छ, पुस्तक,शाल देऊन यावेळी गौरवण्यात आले.

याप्रसंगी गोयल म्हणाले की,”माझ्या वाढदिवसाला अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला तसेच संस्थेने सुद्धा माझा गौरव केला. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. संस्थेच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये मी स्वतः साक्षीदार आहे. संस्थेचे कार्य कौतुकास पात्र आहे.”

एका वर्षात 365 पुस्तक प्रकाशित करण्याचा हा अभिनव प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यापूर्वी संस्थेने शंभर पुस्तकांचा संकल्प केला होता तो संकल्प पूर्ण केला आहे. वर्षभरात ३६५पुस्तके प्रकाशित झाल्यास. हा लिम्का बुक रेकॉर्डमध्ये किंवा महाराष्ट्र बुक रेकॉर्ड नोंद होणारा उपक्रम असेल अशी या निमित्त भावना व्यक्त करण्यात आली. 

यापूर्वी संस्थेच्या वतीने संस्थेच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच वेळी २४ पुस्तकांचे प्रकाशन करून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये संस्थेच्या कामाची नोंद झाली आहे. याचा अभिमान वाटत आहे. साहित्य व काव्य क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम करून संस्थेने आपल्या कामाची नोंद जनसामान्यांमध्ये केली आहे. भारतातील अभिनव असं “कवींचे कॅलेंडर “प्रकाशन करून सुद्धा संस्थेने आपल्या कामाची मोहर उमटवली आहे.

गेले सातत्यपूर्ण २५ वर्ष काम करणारी ही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जगातील एकमेव अशी कार्यक्षम संस्था आहे. हजारो कवींना घडवणारे हे एक हक्काचं आणि सन्मानाचे व्यासपीठ आहे. या रेकॉर्डमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या उपक्रमात ज्या कवींना आपल्या काव्यसंग्रह, कथासंग्रह ,कादंबरी अथवा इतर साहित्य प्रकाशित करायची इच्छा असेल ,त्यांनी संस्थेच्या अनुदान योजनेचा फायदा घेऊन या ३६५ पुस्तकांमध्ये आपल्या पुस्तकाची वर्णी लावून. या रेकॉर्डमय उपक्रमात सहभागी व्हावे. अशी संस्थेच्या वतीने संपूर्ण साहित्य विश्वातील साहित्यिकांना व कवींना यानिमित्ताने आवाहान करण्यात आले आहे. असा आगळावेगळा उपक्रम राबवणारा हा एकमेव कायमचे आहे. 

आत्तापर्यंत प्रकाशित केलेल्या प्रत्येक पुस्तकास पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दर्जेदार पुस्तक वाचकांना मिळावी तसेच दर्जेदार पुस्तकाची निर्मिती व्हावी. यासाठी आकर्षक मुखपृष्ठ परफेक्ट बांधणी, आयएसबीएन नंबर तसेच उत्तम कॉलिटी चा पेपर वापरून .सर्व पुस्तक निर्मिती करून कवी व साहित्यिकांच्या घरी टपाल खर्च न घेता विनामूल्य घरपोच पाठवण्यात येतात.

साहित्यिकांनी आपलं साहित्य मोबाईल टायपिंग अथवा बाय पोस्ट पाठवावे. त्यासाठी पुढील नंबर वर 9272156295संपर्क तसेच साहित्य पाठवण्यासाठी-आजच पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घ्या. अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे कळवली आहे.

इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे विदर्भाच्या गायत्रीचे नाव

साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देऊन गायत्री रोहनकर यांना गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पदक, शाल व श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरूप होते. संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे संत नगरी शेगांव येथील गायत्री वासुदेव रोहणकर यांना बेस्ट मॉडेल, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गोपाल देवांग, माजी नगरसेवक मनीष आनंद, बॉबी करनानी, योगेश गोंधळे, सुनील हिरूरकर, कर्नल महादेव घुगे, जयंत हिरे हे उपस्थित होते. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी केले. तर सूत्रसंचालन ॲनेट गोंसाल्विस यांनी केले.