Engage Your Visitors!

१५ डिसेंबर रोजी रुई येथे कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित २१ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन 

रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता रुई येथील श्री हनुमान मंदिरात कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय २१ मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . संमेलन अध्यक्ष साहित्यिक डॉ देविदास तारू नांदेड सदस्य महारास्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे तथा सिद्धि निर्धारक राज्यपाल नियुक्त सदस्य्, उद्घाटक आमदार अशोकबापू माने, हातकणंगले मतदार संघ, प्रमुख पाहुणे कांदबरीकार डॉ श्रीकांत पाटील घुणकी ‘ कविसंमेलन अध्यक्ष कवि दिपक पवार सर रुकडी तर प्रतिमा पुजन सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड परभणी यांचे हस्ते करण्यात येणार आहे . तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना प्रा किसनराव कुऱ्हाडे गडहिंग्लज ‘अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहिंग्लज यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

संमेलनास प्रमुख उपस्थीती म्हणून प्रा डॉ सुरेश कुराडे गडहिंग्लज ‘ रमेशचंद्र म्हैसेकर छ संभाजी नगर डॉ मधूकर हुजरे धाराशिव अशोक मोहिते बार्शी ‘ डॉ मंजू राजेजाधव सिंदखेड ‘ प्रा गोविंद लहाने परभणी ‘ सौ शैलजा परमणे कोल्हापूर तानाजी आसबे वाळवे खुर्द ‘ नागोराव सोरकुसरे असणार आहेत .संमेलनात संमेलन विशेषांकाचे प्रकाशन प्रसिद्ध मान्यवरांचे हस्ते होणार आहे . तसेच त्याचप्रमाणे कविसंमेलन अध्यक्ष कवि दिपक पवार सर रुकडी यांचे अध्यक्षते खाली हेणार असून कोल्हापूर ‘ सोलापूर ‘ धाराशिव ,छ .संभाजी नगर ,पुणे  सातारा आदी जिल्ह्यातील कवि कवियत्री सहभागी होणार आहे . असे कवि सरकार यानी पत्रकद्वारे कळविले आहे .

परम पूज्य स्वामी विद्यानंद यांचे गरुकृपांकीत साधक स्वामी कृष्णानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन

परम पूज्य स्वामी विद्यानंद यांचे गरुकृपांकीत साधक स्वामी कृष्णानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे १० डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी श्री.संत यांच्या भुवनी सत्संगात प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्रीयुत आदरणीय किरण पांडे, श्रीयुत देवेन पांडे,व परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद ,श्रीयुत प्रम़ोद कुलकर्णी उपस्थित होते.छोट्या खाणी झालेला प्रकाशन सोहळा परमपूज्य श्री. स्वामी विद्यानंद चरित्रामृत या महान ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 

हा ग्रंथ स्वामी विद्यानंदांचा सर्वच साधकांना अधिक सद्गुरूंप्रती प्रेम श्रद्धा ,दृढ विश्वास वाढण्यास तसेच सद्गुरूंचे अनुभव वाचून आनंद देणारे हे चरित्र सत्य अनुभव लिखित केलेले पद्य रूपात, साकी बद्ध रचनेतून प्रकटलेले स्वामी साधकांचा हृदयात स्थितप्रज्ञ स्थितीत जाणवतील. मज हृदयी सद्गुरू या भूमिकेतून दिसतील यात शंका नाही. सर्व मान्यवरांचे संदेश त्यांचा वक्ततेतून झाले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व प्रसाद देऊन सांगता झाली.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गाजवला पुण्यातील लक्ष्मीरोड

पुण्यात 11 डिसेंबर पादचारी दिनानिमित्त डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पुण्यात लक्ष्मी रोडवर छोट्या गोड बोलणा-या बालांना मिठु मिठु पोपट ॲवाॅर्ड सर्टिफिकेट्स दिली.निखळ , दिलखुलास हसणा-या पादच्-यांना लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस् प्रदान केले.भेटेल त्या व्यक्तिंना विनोदी किस्से सांगितले. मिमिक्री सादर केली.देखाना हायरे सोचाना..हे गाणे साभिनय नृत्यासह सादर केले.

काही बालांबरोबर झिंग झिंग झिंगाट गाणेही नाचत सादर केले.सहीवरुन स्वभावदर्शन, जन्मतारखेवरुन-चेह-यावरुन भविष्यकथन केले. आपल्या कला आविष्कारातून लक्ष्मी रोडवरील भेटणा-या प्रत्येकास जिंकून डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी जिंकले. जिंदगी दोबारा नही होती असे सांगत आयुष्यात शाश्वत आनंद घेत रहा हा संदेशही विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सर्व पादचा-यांना दिला !

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे 39वतीने आपल्या अनुभवांच्या कवितांची व संवादाची मुक्त मैफल

चाळिशी-पन्नाशीनंतरचं प्रत्येकाचं जीवन म्हणजे अनुभवांचं एक मोठं भांडार असतं… सुख-दुःख, यश-अपयश, अपमान- अवहेलना, तसेच अडचणीच्या प्रसंगी कुणी दिलेला मदतीचा हात असो की, ऐन मोक्यावर कुणी दिलेला धोका असो..या साऱ्या अनुभवातून तावून सुलाखून गेल्यानंतर जी समज येते, जी जाणीव होते, ती प्रत्येकाच्या पुढील आयुष्याला वळण देत असते.

आलेला पैसा आणि गेलेला पैसा, नातलगांनी फिरविलेली पाठ आणि तर कधी नातेसंबंधामुळेच स्थिर झालेली जीवनाची गाडी.. अशा असंख्य गोष्टी या टप्प्यावरील वयात प्रत्येकाने अनुभवलेलं असतं किंवा पाहिलेलं असतं..!

जीवनातल्या या साऱ्या गमती जमती, उन्हाळे- पावसाळे हे सारं कधी तरी सांगावासं वाटतं, व्यक्त व्हावंसं वाटतं…

चला तर मग…? अशा मंडळीशी हितगूज करू? गप्पा मारू? त्यांच्याबरोबर एकत्र जेवण करू? आणि आपल्या जीवनातील एक दिवस त्यांच्याबरोबर व्यतीत करू या…!

कार्यक्रम आहे.

काही तरी बोलू आयुष्यावर ..

सहभाग -नक्षत्राचं देणं काव्यमंच बोल्ड नक्षत्र कवी व कवयित्री टिम

विशेष उपस्थिती -बोल्ड कवी म.भा. चव्हाण, पुणे (ज्येष्ठ साहित्यिक व धर्मशाळाकार)

सहभाग –

1.ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील (चिंचवड)

2.भारुडकार, नाटककार कवी परशुराम वाघचौरे-भूगांव

3. ज्येष्ठ भूजलतज्ञ, कवी दिलीप विधाटे-मावळ

4. कट्टर नक्षत्र कवी बालाजी थोरात-चिंचवड

5. निवेदिका, कवयित्री सौ. प्रीती सोनवणे-भोसरी

6. सुप्रसिद्ध रांगोळीकार कवयित्री सौ. रूपाली भालेराव ,आकुर्डी 

7. विद्यार्थी प्रिय शिक्षिका कवयित्री सौ. दिव्या भोसले-दिघी

8. गुणवंत कामगार कवी सुभाष चव्हाण-चिंचवड.

———————————-

स्थळ – कै. श्री. शिवाजीराव महामुलकर यांच्या स्मरणार्थ उभारलेले सहारा वृद्धाश्रम, कुसवली गाव, तालुका मावळ, पुणे

कार्यक्रम वेळ – सकाळी 9 ते 12 वा.

सायं. ६.०० पर्यंत.

रविवार दि. १५ डिसेंबर २०२४

——————————–

(रस्त्यावर सापडलेल्या व कुटुंबाने सोडून दिलेल्या आजी-आजोबांचे हक्काचे निवासस्थान असलेल्या मावळ तालुक्यातील निसर्गरम्य, डोंगरकुशीत असलेल्या या आश्रमात हा कार्यक्रम होणार आहे.)

प्रवेश शुल्क नाही, (आपल्या खर्चाने यायचे व जायचे)

(चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था ही जबाबदारी सहारा वृद्धाश्रमाच्या वतीने विनामूल्य केली जाईल.)

——————————-

कार्यक्रम संयोजक-

प्रा. राजेंद्र सोनवणे-

कवी-वादळकार: 9272156295

आयोजक-

विजय जगताप -9850905043

नि: शुल्क १९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय ,भोसरी ,पुणे ३९ च्या वतीने दरवर्षी मराठी साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या दिवाळी अंकांचा सन्मान करण्याचे आयोजन केले जाते .या १९ व्या वर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संपादकांनी २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती पुढील पत्त्यावर पाठवाव्यात .स्पर्धा विनामूल्य आहे. कसल्या प्रकारचे या ठिकाणी स्वागत मूल्य घेतले जात नाही. 

संपादकांनी आपल्या दोन दिवाळी अंकांच्या प्रति पुढील पत्यावर पाठविणे.

प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे

संस्थापक-राष्ट्रीय -अध्यक्ष

नक्षत्राचं देणं काव्यमंच

साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरी

पुणे -४११०३९.

पाठवण्याची अंतिम मुदत नाही. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक दिवाळी अंकांना फोर कलर सन्मानपत्र देण्यात येईल. विजेत्यांना समारंभपूर्वक सन्मानचिन्ह, गौरव पत्र ,पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठित असलेली हे दिवाळी अंक स्पर्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या दिवाळी अंकांना उत्तम प्रतिसाद दरवर्षी दिला जातो. यावर्षी सुद्धा संपादकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन, या स्पर्धेला यशस्वी करावे. अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कवी वादळकार ,पुणे यांनी कळविलेले आहे.

नासिक येथे पंचवटी भागात शिवमल्हार सेवाभावी संस्थेतर्फे हळदीचा भंडारा

नासिक येथे पंचवटी भागात शिवमल्हार सेवाभावी संस्थेतर्फे शक्ती नगर येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला या बारा गाड्या ओढण्याचे मानकरी विशाल खंडागळे होते. त्यांनी हळदीचा भंडारा उधळीत बारा गाड्या ओढल्या. बारा गाड्यांच्या मध्यभागी खंडेराव महाराजांचा मुखवटा ठेवण्यात आला होता.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांच्या हस्ते पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात झाली. बारा गाड्या ओढण्याच्या आधी देवतांची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होऊन रात्री जागरण व गोंधळाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांनी केले होते. यावेळी बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित होती. उदय गांगुर्डे, निवृत्ती जेऊघाले, राजेंद्र भडांगे, मंगेश चव्हाण, बाळू दादा पवार, गणेश कुमावत तसेच बरेचसे वाघे मंडळी ही उपस्थित होती.

 बाळासाहेब वाकचौरे, नाशिक

चांदवड येथे मौर्य क्रांती महासंघा व्दारा धनगर जागृती परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे आयोजन

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ऐतिहासिक नगरीत मौर्य क्रांती महासंघ , महाराष्ट्र राज्य व्दारा धनगर जागृती परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले यांनी प्रसारमाध्यमांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.” एकट्याने नाही तर एकीने लढू या”,” माझे शिक्षण माझ्या समाजा साठी” या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात मौर्य क्रांती महासंघ कार्यरत आहे, धनगर समाजाच्या विविध विषयांवर समाजातील तज्ज्ञ, विचारवंत या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.या पूर्वी मौर्य क्रांती महासंघाची दोन अधिवेशनाचे आयोजन जेजुरी या ठिकाणी करण्यात आले होते.

आता तिसरे अधिवेशन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे होत आहे, सुरुवातीला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे, धनगरी ओव्या, गजी नृत्य, लेझीम, धनगर समाजाच्या पारंपरिक कला, देवदेवतांच्या नावे घोषणा, मान्यवरांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार, आदी भरगच्च कार्यक्रम या तिसऱ्या अधिवेशनात होणार असून पुढील कार्यासाठी काही ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.आरक्षण अमंलबजावणी चा प्रश्न, शेळ्या मेंढ्या च्या चराऊ कुरणाचा प्रश्न, शिष्यवृत्ती, शासकीय आर्थिक योजनांचा लाभ,व धनगर समाजाच्या इतर समस्याचा या अधिवेशनात विचार विनिमय करण्यात येणार आहे.लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षात होळकर शाहीच्या पदकमलानी पावन अशा दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या चांदवड नगरीत होत असलेल्या तिसऱ्या अधिवेशनात सत्यशोधक विचाराचे अनुयायी मारोतरावजी पिसाळ यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रबोधनकार पुरस्कार प्रत्येक अधिवेशनात वेगवेगळ्या मान्यवरांना दिला जातो.

या वर्षी या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील नामवंत वक्ते प्रबोधन कार,प्रा.आर.एस.यादव सर यांना देण्यात येणार असल्याचे मौर्य क्रांती महासंघाने जाहीर केले आहे.या धनगर समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.

19 वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शन

साताऱ्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन कराड व जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत शेतीपासून थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यासाठी या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनाचा कालावधी 6 डिसेंबर पासून ते 10 डिसेंबर 2024 असा असून यात विविध विभागांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रदर्शनात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, विविध योजना, विविध व्यावसायिक क्षेत्रे, मिल्किंग मशीन, नर्सरी, मसाले, पंचकर्म, ठिबक सिंचन, वाहने, पशुपक्षी प्रदर्शन व बाजार, इत्यादी वेगवेगळ्या विभागांचे स्व आयोजन नागरिकांना अनुभवायला मिळाले. प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा ) यांच्यामार्फत संचालन करण्यात आले. समस्त सातारकर व कराड करांनी आपले बहुमोलाची उपस्थिती दर्शवली. ह्या संपूर्ण माहितीचा आढावा कला रंजन न्यूज पत्रकार सायली बाळू ढेबे ह्यांनी घेतला.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना विश्वगुरु उपाधि प्रदान !!!

भारतासह 20 देशात स्वखर्चाने मानवधर्म:सर्वश्रेष्ठ धर्म या प्रसारासाठी विश्वजोडो अभियानासह विनामूल्य चालता बोलता हिंडता फिरता असा ‘ सबकुछ.मधुसूदन ‘ हा विश्वविक्रम एकपात्री कार्यक्रम करुन हजारो रसिकांना दिलासा दिला. डाॅ.घाणेकर यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल डाॅ.मधुसूदन घाणेकर गौरव समिती तर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना जाहिररित्या , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ.न.म.जोशी यांच्या शुभहस्ते ‘ विश्वगुरु ‘ ही उपाधि प्रदान करण्यात आली.

सदर उपाधि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी वैश्विक शक्तिला प्रदान केली. ” दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय, भारतीय अध्यात्म, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय मजदूर संघ यांचे संस्कार घडल्यानेच सातत्याने विश्वजोडो अभियानाच्या माध्यमातून भेटेल त्या रसिकाला निरपेक्ष आनंद देण्याचे भाग्य मला मिळाले ” असे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सन्मानाला उत्तर देताना सांगितले. ” आनंदाचे वितरण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डाॅ.मधुसूदन घाणेकर होय. आयुष्यभर जो दुस-याला निरपेक्ष आनंद सातत्याने देत रहातो तोच खरा विश्वगुरु असतो,डाॅ.घाणेकर.

हे ‘ विश्वगुरु ‘ चेच कार्य करीत आहेत, असे गौरवोदगार डाॅ.न.म.जोशी यांनी उपाधि प्रदान करताना काढले. या प्रसंगी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त मिलिंद लेले , ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाईक, आंतराष्ट्रीय कीर्तिच्या शीळवादक अनघा सावनूर आगाशे, भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष भारती महाडिक , मधुरंग संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.मेघना मधुसूदन घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

याच सोहळ्यात डाॅ.घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाचा 600 वा अंक, डाॅ.घाणेकर यांचा मधुउवाच हा विश्वविक्रमी 50वा काव्यसंग्रह आणि हाहाहाहीहीहीहूहूहू व्यंगचित्र संग्रह याचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. वर्ल्ड क्वीन बीजच्या,अध्यक्ष सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले.डाॅ.घाणेकर यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन आणि प्रास्ताविक वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक यांनी केले.

स्वागत गीत मनीषा सराफ यांनी सादर केले. मिलिंद लेले, आघाडीच्या कवयित्री आणि निवेदिका ऋचा थत्ते, सौ.मेघना घाणेकर अनघा सावनूर आगाशे, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक -अध्यक्ष प्रिया दामले आदिंचीही भाषणे झाली. काव्यशिल्पच्या माजी अध्यक्ष अपर्णा आंबेडकर, महिला सन्मानच्या सचिव दीपाराणी गोसावी, युवा विश्वच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई , मंदा नाईक, मधुकर्णिका सारिका सासवडे आदिंनी डाॅ.घाणेकरांवर आधारीत स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ‘ सबकुछ मधुसूदन ‘ ह्या एकपात्री कार्यक्रमाचा 81, 000 वा प्रयोग सादर करुन उपस्थितांची मने जिंकली !

आभार प्रदर्शन वसुधा नाईक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष भागवत, माधुरी भागवत, योगेश हरणे , गौरव पुंडे, अजया मुळीक, मुकुंद भागवत आदिंनी विशेष योगदान दिले.

स्कुल ऑफ स्कॉलर्स बीर्ला काॅलनी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पिली आदरांजली 

अकोला – बिर्ला काॅलनी स्थित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षित व सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांद्वारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकराबद्दल भाषणाद्वारे माहिती दिली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षित यांनी विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घ्यावे. असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.