परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील श्री नंदीकेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या २४ पट्टाभिषेक वर्धापनदिनाच्या औचित्याने वीरशैव समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्या २४ समाज बांधवांचा वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात माजलगांव येथील श्री. विलासअप्पा लांडगे व छत्रपती संभाजीनगर येथील श्री. देवीदादअप्पा उंचे यांचाही समावेश होता.
सोनपेठ येथील श्री नंदीकेश्वर मठ संस्थानच्या वतीने दरवर्षीच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्या समाज बांधवांना वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचे हे तीसरे वर्ष असून, आतापर्यंत श्री नंदीकेश्व मठ संस्थानच्या वतीने वीरशैव समाजातील सुमारे ७० मान्यवरांना वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर रोजी मठाचे मठाधिपती श्रीगुरू नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या २४ व्या पट्टाभिषेक वधार्पनदिनाच्या अनुषंगाने, त्यांच्या नेतृत्वाखाली सोनपेठ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या समारोहाला जिंतूर येथील श्रीगुरू अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी, देवणी येथील श्री म.नि.प्र. सिध्दलिंग शिवाचार्य स्वामाजी, आलमल जि.विजापूर येथील श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीनस्वामी मठ संस्थानचे पूर्वाचार्य लिं. श्रीगुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींचे विश्वासू शिष्य माजलगाव येथील विलासअप्पा लांडगे यांचा धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी बद्दल तर छत्रपती संभाजीनगर येथील देवीदासअप्पा उंचे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कागगिरी बद्दल यावेळी वीरशैवरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
त्या सोबतच वीरशैव समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप सोडणार्या सर्वश्री संतुकराव शिवणकर, राजेंद्र मुंडे, महेश स्वामी, दत्ताप्पा कसबकर, गुरूनाथ बेंडूरे, नारायण गौंडर, नारायण गौरकर, शिवानंद कथले, शिवशंकर भुरे, महादेव लामतुरे, ओंकार पंचाक्षरी, नागेश मिटकरी, जयश्री भुसारे, नारायण पळसे, प्रा.ओमप्रकाश झुरूळे, संजय हत्ते, भिमाशंकर बेंबळकर, नाररायण हसेगावकर, पृथा पंडित, दीपक उरगुंडे, प्रविण उमराणे, नागनाथ स्वामी काजळे, जगदिश बुरांडे या मान्यवरांनाही वीरशैवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा समारोह यशस्वी करण्यासाठी सोनपेठ येथील श्री नंदीकेश्वर मठ संस्थानच्या शिष्य परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply