खास बालांसाठी नुकताच,डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा विश्वविक्रमी बे दुणे चकली हा एकपात्री धमाल विनोदी कार्यक्रम आयोजित केला होता.अध्यक्ष.स्थानी संस्थापक अध्यक्ष अभिनेत्री प्रिया दामले होत्या.सदर कार्यक्रम अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर – संतनगर येथे झाला.कार्यक्रमाचे संयोजन बाल सचिव अजया मुळीक हीने केले.युवा कार्यकर्ते महेश पवार यांनी प्रास्ताविक केले.
नीलेश पवार याने आभार मानले.अजयाने बालांना चाॅकलेटस दिली.याप्रसंगी कवी विजय सातपुते, माधवी कुंटे, वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे डाॅ.मधुसूदन घाणेकर स्वतःचा छान मिश्किल बाहुला झाले आणि स्वतःच बाहुल्याला काही प्रश्न विचारले आणि बाहुल्याने लहान खोडकर मुलासारखी मजेशीर उत्तरं दिली.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या या डबल.रोल साठी बाल चमुंनी भरभरुन मनमुराद हसून दाद दिली. विनोदी पाढे , गाणारा मुलगा , थापा मारणारे मित्र, विमानातली फेरी, मनाचे श्लोक म्हणणारे कलाकार , अर्जूना बाण मार वाक्य म्हणणारी खेड्यातील कलाकार मंडळी, बोलके प्राणी,बोलके पक्षी ..अशा विविधतेने नटलेल्या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा हा चकलीचा कार्यक्रम म्हणजे बाल नमुंना दिवाळीचा खास मनोरंजनाचा खुसखुशीत फराळच होता. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘ बे दुणे चकली’ ह्या एकपात्री. कार्यक्रमाचा झंजावती 22,999 वा प्रयोग होता.
Leave a Reply