नासिक येथे पंचवटी भागात शिवमल्हार सेवाभावी संस्थेतर्फे शक्ती नगर येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला या बारा गाड्या ओढण्याचे मानकरी विशाल खंडागळे होते. त्यांनी हळदीचा भंडारा उधळीत बारा गाड्या ओढल्या. बारा गाड्यांच्या मध्यभागी खंडेराव महाराजांचा मुखवटा ठेवण्यात आला होता.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांच्या हस्ते पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात झाली. बारा गाड्या ओढण्याच्या आधी देवतांची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होऊन रात्री जागरण व गोंधळाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांनी केले होते. यावेळी बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित होती. उदय गांगुर्डे, निवृत्ती जेऊघाले, राजेंद्र भडांगे, मंगेश चव्हाण, बाळू दादा पवार, गणेश कुमावत तसेच बरेचसे वाघे मंडळी ही उपस्थित होती.
बाळासाहेब वाकचौरे, नाशिक