म.सा.प,पुणे शाखा – बार्शी आयोजित शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२४ ने कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले. हा बहुचर्चित व मानाचा समजला जाणारा पुरस्कार त्यांच्या ‘ कळ पाेटी आली आेठी ‘ या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहास देण्यात आला.
सदर पुरस्कार प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पी.टी.पाटील सर, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.विश्वास पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी डाॅ.बी.वाय.यादव,नंदन जगदाळे,अरूण देबडवार,जयकुमार शिताेळे,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्री. देविदास साैदागर यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती हाेती.संत तुकाराम सभागृह ,श्री.शिवाजी महाविद्यालय परिसर ,बार्शी याठिकाणी हा कार्यक्रम हर्षाेल्हासात पार पडला.हा साेहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पां.न.निपाणीकर, प्रा.डाॅ.रविराज फुरडे, प्रकाश गव्हाणे,प्रमिला देशमुख, बी.आर.देशमुख,प्रकाश महामुनी,आबासाहेब घावटे, इतर कार्यकारणी व स्वीकृत सदस्य,तसेच पुरस्कार प्रायाेजक यांनी माेलाचा हातभार लावला.
साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना हा एकविसावा राज्यस्तरीय पुरस्कार असून या कवितासंग्रहास हा दुसरा पुरस्कार आहे.ग्रामीण भागातील या प्रतिभावान लेखकाचे अवघ्या महाराष्ट्रातून विशेष काैतुक हाेत असून अभिनंदन व हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.