डॉ. मधुसूदन घाणेकर हे संमोहन प्रयोग करतात. ब्रह्मध्यान प्रयोग करतात. ब्रह्मध्यान प्रयोग करताना आलेला माझा अनुभव प्रथम कथन करते. डॉक्टर घाणेकर यांच्या आईच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी ब्रह्मध्यान घेतले होते. या ब्रम्हध्यानामध्ये मी स्वतः हरवून गेले होते. प्रत्यक्ष अनुभव ब्रम्हध्यानाचा घेतलेला होता. कोणतेही काम ते स्वतःला झोकून करतात. मनापासून करतात त्यामुळे त्यांच्या कार्याला नेहमी पावती उत्तम मिळते. उत्तम प्रतिसाद मिळतो.परमोच्च आनंद त्यांना मिळतो. समोरच्याच्या चेहर्यावरील आनंदात ते हरवून जातात.
डॉ. घाणेकरांनी ‘नक्षत्र डॉट कॉम ‘ वर एक शॉर्ट फिल्म तयार केली होती ही फिल्म २७ स्क्वेअर फुट एरियातच तयार झाली होती. या फिल्मची संकल्पना,संकलन, कथा,पटकथा, गीत लेखन,प्रमुख भूमिका, दिग्दर्शन,संगीत गायन, शीळ वादन, आदी वीस जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे सत्तावीस अभिनेत्रींना बरोबर घेऊन त्यांनी आपली भूमिका चोख वठवलेली आहे. आणि एक ‘विश्वविक्रम ‘नोंदवलेला आहे.
‘पाऊस’ या लघुपटासाठी डॉक्टर घाणेकर यांनी वैयक्तिक आंतरराष्ट्रीय पातळीवर १२ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. जवळजवळ एकशे पन्नास हुन आंतरराष्ट्रीय परिषदा आणि महत्त्वपूर्ण साहित्य संमेलनाचे ‘अध्यक्षपद’ यांनी भूषविले आहे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, तलत, मुकेश, हेमंत कुमार, अमीन सायानी,देवानंद, पु. ल. देशपांडे, केशवसुत, शेक्सपियर, चार्ली चापलीन, आदींच्या नावाने यांना पुरस्कृत केलेले आहे. अशा ह्या रेग्युलस ता ऱ्याची अणि माझी भेट ही नक्कीच अविस्मरणीय आहे.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा- पुणे
मो. नं. 9823582116