साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देऊन गायत्री रोहनकर यांना गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पदक, शाल व श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरूप होते. संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे संत नगरी शेगांव येथील गायत्री वासुदेव रोहणकर यांना बेस्ट मॉडेल, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गोपाल देवांग, माजी नगरसेवक मनीष आनंद, बॉबी करनानी, योगेश गोंधळे, सुनील हिरूरकर, कर्नल महादेव घुगे, जयंत हिरे हे उपस्थित होते. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी केले. तर सूत्रसंचालन ॲनेट गोंसाल्विस यांनी केले.