सप्तस्वर इंटरनॅशनल संस्थेतर्फे संस्थेचे सचिव आणि ज्येष्ठ गायक विश्वास धोंगडे यांच्या शुभहस्ते विश्व विख्यात शीळवादक आणि गायक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ऑनलाईन संगित मैफिलीत ‘स्वरमित्र ‘ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह नेपाळ,भूतान रशिया,मलेशिया,कंबोडिया इंडोनेशिया,हाॅलंड, मकाऊ, कंबोडिया,माॅरिशस,सिंगापूर न्यूझीलंड व्हिएतनाम आदि 20 देशात शीळवादन आणि जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी
विनामूल्य सादर करुन रसिकांना दिलासा देत सोबत
मानवधर्म:श्रेष्ठ धर्माचा प्रसार केला त्याबद्दल डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘ स्वरमित्र ‘ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्याचे विश्वास धोंगडे यांनी सांगितले. मधुस्वर इंटरनॅशनल संस्थेच्या निमंत्रक डाॅ.सुवर्णा सुत्रावे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी झालेल्या विशेष ऑनलाईन संगित मैफलीत डाॅ.मधुसूदन घाणेकर तसेच विश्वास धोंगडे, वर्षा चेके,यांनी सादर केलेल्या जुन्या हिंदी – मराठी गाण्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.