मगर महाविद्यालयाची ऐश्वर्या पाटील कुलपती ब्रिगेड उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित

Spread the love

प्रतिनिधी – राजेंद्रकुमार शेळके

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु. ऐश्वर्या पाटील या विद्यार्थिनीस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे दि. ६ ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या आव्हान – २०२४ या राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरामध्ये आव्हान – २०२४ कुलपती ब्रिगेड उत्कृष्ट स्वयंसेविका हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या शिबिराच्या समारोप प्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते, जिल्हााधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. विद्या शर्मा या मान्यवरांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. या शिबिरात राज्यातील २३ विद्यापीठातील एकूण १०४८ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड संदिप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा.एल.एम. पवार , सहाय्यक सहसचिव मा. ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, यांनी ऐश्वर्या पाटील हिचे अभिनंदन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सदानंद भोसले यांनी कु. ऐश्वर्या पाटील हीचे कौतुक केले.

Exit mobile version