युवा स्वयंरोजगारासाठी समाज विकास संस्थेची तपश्चर्या

Spread the love

येथील समाज विकास संस्थेच्या वतीने युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी निरंतर कार्य केले जाते वात्सल्या बालगृहाच्या माध्यमातून मुलांचं निवास भोजन शिक्षण आणि भविष्यकाळातील स्वयंरोजगारासाठी विशेष कार्य करत असताना. युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून नर्सिंग कॉलेज सुरू करून उमरगा लोहारा तालुक्यातील व परिसरातील युवकाना नर्सिंगच्या GDA माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जात आहे.

 तसेच ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या युवकांना ड्रायव्हिंग प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना लायसन मिळऊन दिले जाते.आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरणा दिली जाते. प्रशिक्षणासाठी होणारा खर्च समाज विकास संस्थां आणि वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत केला जातो. हा अनोखा प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील धाराराशिव कळंब,उमरगा आणि लोहारा या चार तालुक्यातून राबवला जातो.सध्या 25 युवकांची एक बॅच पूर्ण झाली असून त्यांना कायमस्वरूपी लायसन मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर नवीन 25 युवकांची बॅच सध्या प्रशिक्षण घेत आहे. हा अनोखा प्रयोग स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवला जात आहे.याची धन्यता पत्रकारांशी बोलताना समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केली.

 या प्रशिक्षण कार्यासाठी कुलकर्णी ड्राइविंग स्कूल धाराशिव उमरगा यांची मदत घेतली जात आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी, समाज विकास संस्थेच्या व्यवस्थापिका विद्याताई वाघ,अजित पाटील, गौरव मस्के, वात्सल्य ट्रस्ट मुंबई हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version