अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने मतदान जागृतीसाठी मॅरॅथॉन

Spread the love

पुणे प्रतिनिधी – राजेंद्रकुमार शेळके

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने २१३ हडपसर विधानसभा मतदारसंघ मतदार जागरूकता अभियान अंतर्गत 213 हडपसर विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरॅथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवा या दृष्टीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आईवडील, नातेवाईक यांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र, मतदान जागृतीसाठी मॅरेथॉन, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मतदानाचे आवाहन, मतदान जागृतीसाठी पायी रॅली, घरोघरी भेटी देऊन मतदानासाठी प्रोत्साहन, मतदान कसे करावे यासाठी मार्गदर्शन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

213 हडपसर स्वीप टीम समन्व्यक अमरदीप मगदूम, सहाय्यक संजीव परदेशी, पंकज पालाकुडतेवार, प्रशांत कोळेकर यांच्या उपस्थित या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. प्रा. अनिल दाहोत्रे यांनी मतदान शपथीचे वाचन केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, कॅप्टन डॉ. धीरजकुमार देशमुख, प्रा. प्रीतम ओव्हाळ, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समनव्यक डॉ. सविता कुलकर्णी प्रा. अनिल दाहोत्रे, प्रा. आशा माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.

Exit mobile version