डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘सबकुछ मधुसूदन ‘ 80990 वा प्रयोग सौ. वसुधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. तसेच विश्वविक्रमी डहाळी_596 व्या अंकाचा प्रकाशन सोहळा वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फे अध्यक्षा सौ.वसुधा नाईक यांच्या शुभ हस्ते झाला.उपस्थितांनी या कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली. निमंत्रक वैभव नाईक यांनी संयोजन केले. महिला सन्मानच्या पदाधिकारी सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपाराणी गोसावी आणि सुचेता प्रभुदेसाई या पदाधिकारी, काही बाल रसिक आणि पालक वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.
सौ.वसुधा नाईक यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार केला. डाॅ.मधुसूदन घाणेकर 2006 पासून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन डहाळी अनितकालिकाचा उपक्रम विनामूल्य राबवतात. सर्व मजकूर हाताने लिहितात. या माध्यमातून त्यांनी शेकडो नवोदित साहित्यिकांना डहाळीचे व्यासपीठ मुक्तपणे उपलब्ध करुन दिले आहे.
हृदयविकार तसेच कोरोना या प्रतिकुलतेवर मात करत त्यांनी दिलेले योगदान निश्चितच गौरवास्पद आहे.सर्व सामान्यांना हे अनितकालिक निश्चितच दिलासा देणारे आहे. सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले डाॅ.घाणेकर गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ देशविदेशियांना सबकुछ मधुसूदन ह्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमातून मनमुराद आनंद देत आहेत, असा त्यागी कलावंत होणे नाही ” या शब्दात सौ.वसुधा नाईक यांनी डाॅ.घाणेकर यांचा गौरव केला.’रमाची पाटी’ ह्या कचरा वेचणा-या विद्यार्थिनीवर आधारीत असलेल्या लघुपटाच्या कथेला सौ.वसुधा नाईक यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सौ.वसुधा नाईक यांच्या उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी त्यांचा हृद्द सत्कार केला.
गोड बोलणा-या बालांना मिठू मिठू पोपट आणि हसणा-या रसिकांना लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रदान केले. समारोप प्रसंगी सौ.वसुधा नाईक यांनी छान खाऊ, चेंडू , खोडरबरं देऊन खुष केले.बालकांचेही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. मुले खूप खूष झाली. पालक आनंदी झाले.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविंद्र सूर्यवंशी – संस्थापक युवा क्रांती संघटना पोलीस मित्र यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम इंटरनॅशनलच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसुधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.